Maharashtra Covid-19 cases Live Updates : जाणून घ्या राज्यातील कोरोनाची जिल्हानिहाय आकडेवारी

Maharashtra Covid-19 cases Live Updates 15 January 2022 : राज्यातील आजची जिल्हानिहाय कोरोना आकडेवारी अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 16 Jan 2022 05:00 PM
उल्हासनगर पालिका क्षेत्रात 180 नवे कोरोनाबाधित

रविवारी उल्हासनगर पालिका क्षेत्रात 180 नवे कोरोनाबाधित आढळल्याने सक्रीय रुग्णांची संख्या 2 हजार 43 झाली आहे.

नागपूरात 2 हजार 285 नवे कोरोनाबाधित, तर 3 मृत्यू

नागपूरात आज नवे 2 हजा 285 कोरोनारुग्ण आढळले. ज्यामध्ये शहरात 1 हजार 722 आणि ग्रामीण भागात 486 तर जिल्ह्याबाहेरील 77 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तसचं तीन जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून 919 जण कोरोनामुक्तही झाले आहेत. 

ठाणे पालिका क्षेत्रात 1673 नवे कोरोनाबाधित

रविवारी समोर आलेल्या आकडेवारीनुसार ठाणे महानगर पालिका क्षेत्रात 1 हजार 673 नवे कोरोनाबाधित आढळले आहेत.  

ठाणे जिल्ह्यात 5 हजार 625 नवे कोरोनाबाधित

ठाणे जिल्ह्यात आज 5 हजार 625 नवे कोरोनाबाधित आढळले असून दोन जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

ठाणे जिल्ह्यात 5 हजार 625 नवे कोरोनाबाधित

ठाणे जिल्ह्यात आज 5 हजार 625 नवे कोरोनाबाधित आढळले असून दोन जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

पंढरपूरमध्ये आज 52 नवीन कोरोना रुग्णांची नोंद

पंढरपूरमध्ये आज पुन्हा 52 नवीन कोरोना रुग्ण, प्रशासन झाले सतर्क 


 

हिंगोली जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 74 कोरोना बाधित रुग्णांची नोंद

हिंगोली जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 74 कोरोना बाधित रुग्णांची नोंद,  7 रूग्ण कोरोनामुक्त, 722 जणांची कोरोना चाचणी, तर 216 जणांवर उपचार सुरू 


 

चंद्रपूर जिल्ह्यात आज 268 कोरोना बाधितांची नोंद

चंद्रपूर जिल्ह्यात आज 268 कोरोना बाधितांची नोंद, 106 जण कोरोनामुक्त 


 

अकोल्यात 24 तासांत आढळले 291 नवे कोरोना रूग्ण

आज दिवसभरात अकोल्यात आढळलेत 291 नवे कोरोना रूग्ण. सध्या जिल्ह्यात 1532 कोरोना रूग्णांवर उपचार सुरू. आज दोन पुरूष रूग्णांचा उचारादरम्यान मृत्यू. यातील एकाचं वय 84 वर्ष तर दुसर्याचं 55 वर्ष. आतापर्यंत 1145 रूग्णांचा कोरोनाने मृत्यू. आज होम आयसोलेशनमधील 90 जण झालेत कोरोनामुक्त. 


अकोला : गेल्या पाच दिवसांतील आढळलेले कोरोना रूग्ण :


12 जानेवारी : 196
13 जानेवारी : 284
14 जानेवारी : 260
15 जानेवारी : 236
16 जानेवारी : 199


पाच दिवसांत एकूण रूग्ण : 1175

पुणे जिल्ह्यात गेल्या 24 तासात 10102 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

पुणे जिल्ह्यात गेल्या 24 तासात 10102 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 8 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

नाशिकमध्ये कोरोना रुग्णसंख्येत धक्कादायक वाढ 

नाशिकमध्ये कोरोना रुग्णसंख्येत धक्कादायक वाढ 


- रविवारी जिल्ह्यात कोरोनाच्या 3 हजार 35 नव्या रुग्णांची नोंद 


- ग्रामीण भागातील वाढती रुग्णसंख्या चिंतेचा विषय 


- गेल्या 24 तासात नाशिक शहर 1678, नाशिक ग्रामीण 1185, मालेगाव 61 तर जिल्हा बाहेरील 111 जणांना लागण


- 1350 रुग्ण बरे झाले

आज राज्यात ४१,३२७ नवीन रुग्णांचे निदान.

आज ४०,३८६ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण ६८,००,९०० करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.  यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९४.३% एवढे झाले आहे.
आज राज्यात ४१,३२७ नवीन रुग्णांचे निदान.

आज राज्यात ४१,३२७ नवीन रुग्णांचे निदान.

आज ४०,३८६ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण ६८,००,९०० करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.  यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९४.३% एवढे झाले आहे.
आज राज्यात ४१,३२७ नवीन रुग्णांचे निदान.

सांगली जिल्ह्यात आज 431  नव्या कोरोनाबाधित रूग्णांची नोंद

सांगली जिल्ह्यात आज 431  नव्या कोरोनाबाधित रूग्णांची नोंद


सांगली महापालिका क्षेत्रांत मोठी रुग्णवाढ...आज तब्बल 246   रुग्ण आढळले


सध्या उपचाराखालील एकूण रुग्ण  2897

सांगली जिल्ह्यात आज 431  नव्या कोरोनाबाधित रूग्णांची नोंद

सांगली जिल्ह्यात आज 431  नव्या कोरोनाबाधित रूग्णांची नोंद


सांगली महापालिका क्षेत्रांत मोठी रुग्णवाढ...आज तब्बल 246   रुग्ण आढळले


सध्या उपचाराखालील एकूण रुग्ण  2897

सांगली जिल्ह्यात आज 431 नव्या कोरोनाबाधित रूग्णांची नोंद

सांगली जिल्ह्यात आज 431  नव्या कोरोनाबाधित रूग्णांची नोंद झाली आहे. तर सांगली महापालिका क्षेत्रात आज तब्बल 246 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. सध्या 2897 कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत. 

नांदेड जिल्ह्यात गेल्या 24 तासात 643 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

नांदेड जिल्ह्यात गेल्या 24 तासात 643 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 95 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. गेल्या 24 तासात एकाही कोरनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला नाही. 

चंद्रपूरमध्ये आज 268 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

चंद्रपूरमध्ये आज 268  कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 106 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या चंद्रपूरमध्ये 1496 सक्रिय रुग्ण आहेत. 

हिंगोली जिल्ह्यात मागील 24 तासात 74 कोरोना बाधित रुग्णांची नोंद

हिंगोली जिल्ह्यात मागील 24 तासात 74 कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 7 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या  216 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 

मुंबईत मागील 24 तासांत 7 हजार 895 नवे कोरोना बाधित रुग्णांची नोंद तर 21 हजार 25 रुग्णांनी केली कोरोनावर मात

मुंबईतील कोरोना (Corona) महामारीमुळे वाढणारे रुग्ण आज काही प्रमाणात कमी आढळले आहेत. मागील काही दिवसांच्या तुलनेतील ही रुग्णसंख्या दिलासादायक असल्याने नागरिक आणि पालिका प्रशासनाला दिला मिळाला आहे. मुंबईत मागील 24 तासांत 7 हजार 895 नवे कोरोना बाधित आढळले असून जवळपास याहून तीनपटीने अधिक म्हणजेच 21 हजार 25 रुग्णांनी कोरोनावर मात देखील केली आहे.

धारावीत आज 32, दादरमध्ये 69 तर माहीममध्ये 93 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

गेल्या 24 तासात धारावीत 32, दादरमध्ये 69 तर माहीममध्ये 93 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. 

पंढरपूरमध्ये आज 52 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, प्रशासन सतर्क

पंढरपूरमध्ये आज पुन्हा 52 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे प्रशासन सतर्क झाले आहे. 

पार्श्वभूमी

Maharashtra Corona Update :  गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये मोठी वाढ होत आहे. शुक्रवारी राज्यात कोरोनाच्या 43, 211 नव्या रुग्णांची भर झाली असून 19 जणांचा मृत्यू झाला आहे.  शनिवारी  राज्यात कोरोनाच्या 42,462 नव्या रुग्णांची भर झाली असून 23 जणांचा मृत्यू झाला आहे.  गेल्या काही दिवसांपासून सलगपणे राज्यात 40 हजारांहून अधिक रुग्णांची नोंद होतेय. त्यामुळे राज्याच्या चिंतेत भर पडली आहे.


राज्यात 125 ओमायक्रॉनबाधितांची नोंद
दक्षिण आफ्रिकामध्ये उदयास आलेल्या ओमायक्रॉन व्हेरियंटने महाराष्ट्राची चिंता वाढवली आहे. महाराष्ट्रात दररोज ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.  राज्यात शनिवारी 125 ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झालेली आहे.  आतापर्यंत 1730 ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात  झाली आहे. त्यापैकी 879 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे. 


राज्यात आज 23 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद
राज्यात आज 23 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 1.97 टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत 67 लाख 60 हजार 514 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.28 टक्के आहे.  सध्या राज्यात 22 लाख 108 रुग्ण होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 6102 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आजपर्यंत 7,17,64,226   प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे. राज्यात शुक्रवारी सापडेलल्या रुग्णांपैकी 197 रुग्ण हे पुण्यातील  आहेत. त्यानंतर पिंपरी-चिंचवडमधील 32, पुणे ग्रामीण आणि नवी मुंबईत प्रत्येकी तीन, मुंबई दोन, अकोल्यातील एक रुग्ण सापडला आहे. राज्यात आज  आढळलेल्या १६०५ रुग्णांपैकी ८५९ रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे.


ओमायक्रॉनच्या प्रसारामुळे कोरोना हा सर्वसाधारण आजार बनेल; तज्ज्ञांचं मत - 
ओमायक्रॉन व्हेरियंटमुळे कोविड रुग्णसंख्या वाढीचे उच्चांक मोडले. मात्र याच ओमायक्रॉनमुळे कोविड आजार हा सर्वसामान्य आजाराप्रमाणे व्हायला मदत करेल असं तज्ज्ञांचं मत आहे. डेल्टा व्हेरियंटमुळे झालेल्या मृत्युच्या थैमानाशी तुलना करता ओमायक्रॉन हा सौम्य लक्षणी असल्याचं दिसून आलंय.त्यामुळे कोविडच्या महाभयंकर संकटाची जीवघेणी गंभीरता ओमायक्रॉन व्हेरियंटमुळे कमी होतेय असं तज्ज्ञांकडून निरीक्षण मांडलं जातंय. डेल्टा आणि ओमायक्रॉन व्हेरियंटची तुलना केली तर ओमायक्रॉनमुळे बाधित रुग्णांना हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करण्याची फारशी वेळ आली नाही. तसंच तज्ञांच्या मते, ओमायक्रॉन विषाणू फुफ्फुसांना डेल्टाप्रमाणे हाणी पोहोचवू शकला नाही. ओमायक्रॉन हा विषाणू कोरोनाला एक सर्वसामान्य आजारांप्रमाणे व्हायला कारणीभूत ठरु शकेल. जितक्या झपाट्यानं सध्या रुग्णसंख्या वाढ दिसली, तितक्याच झपाट्यानं ती खाली येईल असे भाकीत देखील वर्तवले गेले आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.