Maharashtra Covid-19 cases Live Updates 14 January 2022 : राज्यात कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ, पाहा जिल्हानिहाय आकडेवारी

Maharashtra Covid-19 cases Live Updates 14 January 2022 : राज्यातील जिल्हानिहाय कोरोना आकडेवारी अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 14 Jan 2022 06:48 PM
सांगली  जिल्ह्यात आज 571  नव्या कोरोनाबाधित रूग्णांची नोंद

सांगली  जिल्ह्यात आज 571  नव्या कोरोनाबाधित रूग्णांची नोंद झाली आहे. सांगली महापालिका क्षेत्रांत  256 रुग्ण आढळले आहेत.  सध्या उपचाराखालील एकूण रुग्ण  2084 रुग्ण आहेत.

परभणी जिल्ह्यात आज 96 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची भर

परभणी जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या 500 पार गेली आहे.  24 तासात 3 हजार 111 तपासण्यात 96 नवीन बाधित रुग्णांची भर पडली आहे. तर  13 जणांना  डिस्चार्ज  देण्यात आला. जिल्ह्यात सध्या एकूण 518 रुग्णांवर उपचार सुरू

अकोल्यात आज 260 नवे कोरोना रूग्ण आढळले

आज दिवसभरात अकोल्यात 260 नवे कोरोना रूग्ण आढळले आहेत.  सध्या जिल्ह्यात 1176 कोरोना रूग्णांवर उपचार सुरू आहे आतापर्यंत 1143 रूग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. 


गेल्या पाच दिवसांतील आढळलेले कोरोना रूग्ण :


10 जानेवारी : 57
11 जानेवारी : 199
12 जानेवारी : 196
13 जानेवारी : 284
14 जानेवारी : 260

अमरावती जिल्ह्यात आज 253 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, डॉ पंजाबराव देशमुख महाविद्यालय प्रयोगशाळा, रॅपिड अँन्टीजन टेस्ट तसेच विविध प्रयोगशाळेच्या अहवालनुसार अमरावती जिल्ह्यात  253 नवे कोरोना बाधित रूग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने दिली आहे. एकूण रूग्णांची संख्या 97 हजार 445 झाली.


मागील काही दिवसातील आकडेवारी


10 तारखेला 56 रुग्ण 
11 तारखेला 91 रुग्ण 
12 तारखेला 186 रुग्ण
13 तारखेला 192 रुग्ण
14 तारखेला 253 रुग्ण

पार्श्वभूमी

Maharashtra Corona Update :  संपूर्ण जगासह देशात कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉननं धाकधुक वाढवली आहे. सध्या राज्यातही कोरोनाच्या दैनंदिन आकड्यांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. राज्यात काल तब्बल  46 हजार 406 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 34 हजार 658 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. मागील  दोन दिवसांपासून कोरोनाची संख्या ही कमी होताना दिसत आहे.


राज्यात  आज  ओमायक्रॉनच्या एकाही रुग्णांची नोंद झालेली नाही.   आतापर्यंत 1367 ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात  झाली आहे. त्यापैकी 775 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे. 


 राज्यात आज  36  रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.  राज्याचा मृत्यूदर 2 टक्के झाला आहे. राज्यात सध्या 2 लाख 21 हजार 477 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यात आतापर्यंत 66 लाख 83 हजार 769 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.39 टक्के आहे.   सध्या राज्यात 17 लाख 95  हजार  631  व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 9124 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 7, 13 , 59,  539  प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.


मुंबईत गुरुवारी नव्या कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्तांचे प्रमाण जास्त


मागील 24 तासांत 13 हजार 702 नवे कोरोनाबाधित सापडले असून 6 जणांचा मृत्यू झाला आहे. बुधवारच्या तुलनेत ही संख्या जवळपास तीन हजाराने कमी असली तरी अजूनही रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत असल्याने कोरोनाचा धोका मुंबईकरांना कायम आहे. त्यामुळे योग्य काळजी घेऊन नियम पाळणं महत्त्वाचं झालं आहे.


 

























































































तारीखमुंबईतील रुग्णसंख्या
24 डिसेंबर683
25 डिसेंबर757
26 डिसेंबर922
27 डिसेंबर809
28 डिसेंबर1377
29 डिसेंबर2510 
30 डिसेंबर3671
1 जानेवारी6347
2 जानेवारी8063
3 जानेवारी8082
4 जानेवारी10860
5 जानेवारी15166
6 जानेवारी20181
7 जानेवारी20971
8 जानेवारी20,318
9 जानेवारी19474
10 जानेवारी13,648
11 जानेवारी11,647
12 जानेवारी16,420
13 जानेवारी13, 702

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.