Maharashtra Coronavirus : गेल्या दीड ते दोन वर्षांपासून कोरोनामुळे महाराष्ट्राची वाट बिकट झाली होती. आता कोरोनाची लाट ओसरल्यामुळे सर्व बाजारपेठा, शाळा, महाविद्यालय आणि मंदिरं उघडण्यात आली आहे. तसंच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यताही मावळली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज महत्त्वाची बैठक बोलावली असून महत्त्वाची घोषणा करण्याची शक्यता आहे.
गणेशोत्सव, नवरात्री आणि दसऱ्यापाठोपाठ दिवाळीचा सण येत आहे. महाराष्ट्रात हा सण मोठ्या उत्सवात साजरा केला जातो, गेली दोन वर्ष कोरोनाचं सावट असल्यानं दिवाळी आणि बाजारपेठांवर अनेक निर्बंध होते. पण हळुहळु सणवार लक्षात घेता निर्बंध कमी होऊ लागले आहेत. सध्याची कोरोनीची संख्या लक्षात घेता दुकानांच्या वेळा, ट्रेनची सवलत पर्यटन आणि ॲाफिसेसच्या वेळा याबाबत महत्वाचे निर्णय होऊ शकतात.
अहमदनगर आणि इतर काही जिल्ह्यांमध्ये कोविड-19 संसर्गाचे रुग्णं संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे नगरमध्ये लॉकडाऊन लावण्यात आला आहे. पण त्याचा परीणाम तिसऱ्या लाटेत होऊ नये तसंच इतर सुरक्षित जिल्ह्यातील अर्थव्यवस्था पुन्हा पुर्ववत करण्यासाठी सुरक्षित उपाययोजना करून सुरु असलेले निर्बंध उठवण्यासंदर्भात महत्वाची चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
राज्य पुन्हा एकदा अनलॉक करून अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी राज्य सरकार सुरक्षित उपाययोजनांचा आढावा घेऊन निर्णय जाहीर करणार असल्याची माहितीही देण्यात आली आहे. दरम्यान, दसरा झाला आणि आता दिवाळीसारखा मोठा सण तोंडावर आहे. यादरम्यान मोठ्या प्रमाणावर लोक गर्दी करतात, मंदिर उघडलेली आहेत अनेक कार्यक्रमांना परवानगी दिलेली आहे आणि चित्रपटगृहे देखील उघडणार यासर्व पार्श्वभूमीवर कोरोना संख्या कशी वाढते याचा अभ्यास करून कोविड निर्बंधांतून सूट देण्याबाबत मुख्यमंत्री स्तरावर निर्णय होऊ शकतो, असं संकेत राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिले होते.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Maharashtra Unlock : दिवाळीनंतर कोरोनाच्या एकाच लसीच्या डोसवर मुक्त संचार! राजेश टोपेंची महत्वाची माहिती
- Mumbai Corona : जिनोम सिक्वेन्सिंगमध्ये लसीकरणाचा मोठा फायदा, मुंबईत डेल्टा व्हेरीयंट जवळपास निष्प्रभ
- Mumbai Corona Update : दिलासादायक... मुंबईत काल 'शून्य' कोरोना मृत्यू; तर रुग्ण दुपटीचा कालावधी 1214 दिवसांवर