महत्वाच्या दहा बातम्यांचा आढावा या स्मार्ट बुलेटिनच्या माध्यमातून घेतला जातो. दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो.
1. मुंबई कोरोना प्रादुर्भावात घट, मुंबईत काल 'शून्य' कोरोना मृत्यू; तर रुग्ण दुपटीचा कालावधी 1214 दिवसांवर
Mumbai Corona Update : देशासह राज्यातीलही कोरोनाचा प्रादुर्भाव मंदावताना पाहायला मिळत आहे. कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची आकडेवारी यामागील प्रमुख कारण असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. काल (रविवारी) राज्यात 1 हजार 715 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद (Coronavirus) झाली. तर 2 हजार 680 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे, काल देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरात कोरोनामुळे एकही मृत्यू झालेला नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाल्यापासूनच संपूर्ण राज्याचा विचार केला तर तुलनेनं मुंबई शहरात सर्वाधिक दैनंदिन कोरोनाबाधितांची नोंद केली जात होती. अशातच कोरोना प्रादुर्भावाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत पहिल्यांदाच मुंबईत कोरोनाची झीरो डेथ नोंदवण्यात आली आहे.
2. जिनोम सिक्वेन्सिंगमध्ये लसीकरणाचा मोठा फायदा, मुंबईत डेल्टा व्हेरीयंट जवळपास निष्प्रभ; महापालिकेच्या वैद्यकीय यंत्रणेचं निरीक्षण
काल मुंबईत कोरोनाचा प्रवेश झाल्यानंतर पहिल्या लाटेतील सुरुवातीचे काही दिवस वगळता दीर्घकालानंतर मुंबईत प्रथमच कोरोनाची झीरो डेथ फीगर आली. मोठा दिलासा देणाऱ्या या बातमीसह आणखी एक चांगली बातमी काल समोर आली आहे. ती आहे जीनोम सिक्वेसिंगसंदर्भातील. जिनोम सिक्वेन्सिंगमध्ये लसीकरणाचा फायदा होत असल्याचा निष्कर्ष समोर आला आहे. 50 टक्के डेल्टा व्हेरीयंट असूनही गंभीर रुग्णाचं प्रमाण कमी आहे. मुंबईत डेल्टा व्हेरीयंट जवळपास निष्प्रभ होत असल्याचं समोर आलं आहे.
नेक्स्ट जनरेशन जिनोम सिक्वेसिंग करणारी वैद्यकीय यंत्रणा महानगरपालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात कार्यान्वित आहे. या यंत्रणेने आजवर दोन तुकड्यांमध्ये चाचण्या केल्यानंतर आता तिसऱ्या तुकडीतील चाचणीचे निष्कर्ष जाहीर करण्यात आले. तिसऱ्या तुकडीमध्ये एकूण 343 रुग्णांमधील कोविड विषाणू नमुन्यांचा अभ्यास करण्यात आला. यात ‘डेल्टा व्हेरिअंट’ चे 54 टक्के, ‘डेल्टा डेरिव्हेटीव्ह’ चे 34 टक्के तर इतर प्रकारांचे 12 टक्के रुग्ण आढळले आहेत. कोविड लसीकरणाचा प्रभाव म्हणून साथ पूर्णपणे नियंत्रणात असल्याचे या निष्कर्षांवरुन आढळत आहे. त्यामुळे सर्व पात्र नागरिकांनी कोविड लस घेणे आवश्यक असून कोविड प्रतिबंधक निर्देशांचे कठोरपणे पालन करणे आवश्यक आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
3. एक डोस घेतलेल्यांनाही लोकल, कॉलेज, मॉल्समध्ये प्रवेश मिळण्याचे संकेत; दिवाळीनंतर आढावा घेऊन दोन डोसची अट शिथिल करण्याचा विचार, आरोग्यमंत्र्यांची माहिती
4. राज्यावर पुन्हा संकटांचं आभाळ, 20 जिल्ह्यांना यलो अलर्ट, परतीच्या पावसामुळं काढणीला आलेल्या पिकांचं मोठं नुकसान
5. भविष्यात कोणत्याही प्रकारची युती किंवा आघाडी शक्य, पहाटेच्या शपथविधीवर किरीट सोमय्यांचं वक्तव्य, तर कितीही यंत्रणा मागे लावा तरी सरकार कोसळणार नाही, पवारांचं वक्तव्य
पाहा व्हिडीओ : एबीपी माझा स्मार्ट बुलेटिन : 18 ऑक्टोबर 2021 : सोमवार : ABP Majha
6. केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात शेतकरी आंदोलक आज रेलरोको करणार, रेल्वे प्रशासन सज्ज
7. केरळमध्ये पावसाचा कोप, आतापर्यंत 26 जणांचा मृत्यू, आजही 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट, तर 7 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, मुख्यमंत्री विजयन यांच्याकडून मोदींनी घेतला आढावा
8. जम्मू काश्मीरमध्ये पुन्हा दहशतवाद्यांकडून सर्वसामान्य लक्ष्य, कुलगाममध्ये अंदाधुंद गोळीबारात बिहारच्या दोन मजुरांची हत्या, एक गंभीर जखमी
9. परभणीत सुटकेचा थरार; पुरात ट्रॅक्टरसह पाच जण वाहून गेले, किर्र अंधारात गावकऱ्यांनी जीवाची बाजी लावून वाचवले प्राण
10. टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला अटक, जातीवाचक वक्तव्य केल्याप्रकरणी हरयाणा पोलिसांची कारवाई, जामिनानंतर काही वेळातच सुटका