मुंबई : राज्यात आज तब्बल 57 हजार  640 कोरोनाबाधित रुग्णांचे निदान झाले. तर 57 हजार 006 कोरोना रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले. राज्यात आजपर्यंत एकूण 41,64,098 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचेप्रमाण (Recovery Rate) 85.32% एवढा झाला आहे. तर आज राज्यात  दरम्यान आज 920 कोरोना बाधित रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. सध्या राज्यातील मत्यूदर 1.49% एवढा आहे.


आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 2,83,84,582 प्रयोगशाळा नमुन्याांपैकी 48,80,542 (17.19 टक्के)नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 38,52,501 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 32,174 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 


मुंबईत आज 3879 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद


मुंबईत आज एकूण 3879 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 3686 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या 5 लाख 98 हजार 545 आहे. बरे झालेल्या रुग्णांचा दर 90 टक्के आहे. मुंबईत सध्या एकूण सक्रिय रुग्ण 51 हजार 472 आहे. कोरोना दुप्पटीचा दर आता 123 दिवसांवर गेला आहे. तर कोरोना वाढीचा दर (28 एप्रिल-3 मे) 0.55 टक्क्यांवर गेला आहे. 


कोरोनाची तिसरी लाट अटळ 


केंद्र सरकारचे प्रधान वैज्ञानिक सल्लागार विजय राघवन यांनी तिसर्‍या लाटेचा इशारा दिला आहे. तसेच तिसरी लाट नक्की येणार असा दावाही त्यांनी केला आहे. विजय राघवन यांनी म्हटलं की, कोरोना व्हायरसच्या संसर्गाच्या बऱ्यास केसेस समोर येत आहेत. दुसऱ्या लाटेत संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोरोनाची तिसरी लाट कधी येईल हे सांगता येणार नाही. पण ती नक्की येणार हे नक्की आहे. त्यामुळे आपल्याला तिसऱ्या लाटेच्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी तयार राहिलं पाहिजे. आरोग्य मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेत त्यांनी म्हटलं की कोरोनाची तिसरी लाट टाळता येणार नाही.


इतर बातम्या