मुंबई : राज्यातील  कोरोनाची रुग्णसंख्येत चढ-उतार दिसून येत आहे. गेल्या 24 तासात राज्यात कोरोनाच्या 1 हजार 635 नव्या रुग्णांची भर पडली आहे. दोन दिवसांपासून   रुग्णसंख्या स्थिर असून 40 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या 29 तासात 4 हजार 394  रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.


राज्यात आज एकाही ओमायक्रॉनबाधितांची नोंद  नाही


राज्यात आज एकाही ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झालेली नाही आतापर्यंत 4456 ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात  झाली आहे. त्यापैकी 3334 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे. सध्या राज्यात 1,122 ओमायक्रॉनचे रुग्ण अॅक्टिव्ह आहेत


राज्यात आज  29 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद


राज्यात आज 29 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 1.82 टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत 76 लाख  91 हजार 064 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.89 टक्के आहे.  सध्या राज्यात  2 लाख 22 हजार 920 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 1081  व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आजपर्यंत 7 कोटी 71 लाख 29 हजार 145 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.


शनिवारी मुंबईत 201 नव्या कोरोना रुग्णांची नोंद


मुंबई महानगरपालिकेने (Mumbai BMC) दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी मुंबईत 201 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. याचकालावधीत 345 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तसंच कोरोना रुग्ण दुपटीचा कालावधी 2870 दिवसांवर आला आहे.  मंगळवारी कोरोना रुग्ण दुपटीचा कालावधी 2407 इतका होता.  त्यामुळे सातत्याने मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याचे दिसत आहे. 


संबंधित बातम्या :


Rajesh Tope on Corona : मार्च महिन्यात कोरोना निर्बंध शिथिल होतील ; आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची माहिती 


Mumbai Corona Update : मुंबईतील कोरोना रुग्णसंख्या स्थिर, शनिवारी 201 रुग्णांची नोंद