मुंबई :  राज्यात आज 3482 कोरोनाच्या नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर आज दिवसभरात एकूण 3566 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. आज नोंद झालेल्या रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण हे मुंबईतील आहे. मुंबईत  आज सर्वाधिक म्हणजे 1210  रुग्णांची भर पडली आहे. 


पाच कोरोनाबाधितांचा मृत्यू


राज्यात आज पाच कोरोनाबाधित रुग्णाने आपला जीव गमवाला. त्यामुळे राज्यातील मृत्यूदर हा 1.85 टक्के इतका झाला. तर आतापर्यंत राज्यामध्ये 77,91,555 कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 97.83 टक्के इतकं झालं आहे. 


 राज्यात बी ए.5 आणि बी ए. 4 व्हेरीयंटचे आणखी 9  रुग्ण


राज्यात पहिल्यांदाच बीए5  व्हेरीयंट आणि बीए 4 व्हेरीयंटचे नऊ रुग्ण आढळले आहेत.  या रुग्णांमध्ये सहा पुरूष आणि तीन स्त्रिया आहेत. राज्यात आतापर्यंत आढळलेलल्या बी ए 5 आणि बी ए. 4 रुग्णांची संख्या 63 झाली आहे. यातील 15 पुण्यातील, मुंबईतील 33, नागपूर, पालघर ठाण्यातील चार  रुग्ण आहेत तर रायगडमधील तीन रुग्ण आहेत


राज्यात आज एकूण 25,481  सक्रिय रुग्ण


राज्यात आज एकूण 25,481  सक्रिय रुग्ण संख्या आहे. त्यामध्ये मुंबईत सर्वाधिक म्हणजे 11988  इतके रुग्ण असून त्यानंतर ठाण्यामध्ये 5931  सक्रिय रुग्ण आहेत.


 देशात कोरोना रुग्णांची संख्या घटली


गेल्या 24 तासांमध्ये नव्याने नोंद झालेल्या रुग्णांची संख्या कमी झाली असली तर, सक्रिय रुग्णांची संख्या मात्र वाढली आहे. सोमवारी दिवसभरात 11 हजार 793 नवीन रुग्णांची नोंद झाली असून 27 जणांचा मृत्यू झाला आहे. भारतात गेल्या 24 तासात 11,793 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली असून कोरोनाच्या एकूण रुग्णांची संख्या 4 कोटी 34 लाख 18 हजार 839 झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नव्याने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात सध्या कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 96 हजार 700 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत 27 रुग्णांच्या मृत्यूनंतर देशातील एकूण कोरोना मृतांची संख्या 5 लाख 25 हजार 47 वर पोहोचली आहे.