मुंबई : राज्यातील  कोरोनाची रुग्णसंख्येत चढ-उतार दिसून येत आहे. गेल्या 24 तासात राज्यात कोरोनाच्या 6 हजार 436  नव्या रुग्णांची भर पडली असून 24  जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या 24 तासात 18 हजार 423  रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.  


राज्यात आज एकाही ओमायक्रॉनबाधितांची नोंद  नाही


राज्यात आज एकाही ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झाली नाही.आतापर्यंत 3334 ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात  झाली आहे. त्यापैकी 1701 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे. 


राज्यात आज 24 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद


राज्यात आज 24 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 1.83 टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत 75 लाख  57 हजार 034  रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.76 टक्के आहे.  सध्या राज्यात  6 लाख 73 हजार 875 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 2383  व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आजपर्यंत 7 कोटी 56 लाख 55 हजार 012 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.


गेल्या 24 तासांत एक लाख 7 हजार नवे रुग्ण, 865 बाधितांचा मृत्यू


केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, सध्या देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 12 लाख 25 हजार 11 इतकी झाली आहे. त्याचबरोबर कोरोनाच्या साथीमुळे प्राण गमावणाऱ्यांची संख्या 5 लाख 1 हजार 979 झाली आहे. आकडेवारीनुसार, काल दोन लाख 13 हजार 246 लोक बरे झाले, त्यानंतर 4 कोटी 4 लाख 61 हजार 148 लोक संसर्गमुक्त झाले आहेत.


संबंधित बातम्या :