नागपूर :  दहावी बारावीच्या बोर्ड परीक्षांसाठी वर्ग देण्यास शिक्षण संस्था महामंडळाने नकार दिला आहे. नागपूर आणि अमरावती विभागातील सर्व जिल्ह्यांच्या शिक्षण संस्था संचालक मंडळातील पदाधिकाऱ्यांची बैठक आज नागपुरात झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.


राज्यातील अनुदानित शाळांना  वेतनेत्तर अनुदान दिले जात नाही. त्यामुळे शाळांचा खर्च  निघत नाही त्यामुळे महामंडळाने दहावी आणि बारावीच्या परीक्षांसाठी इमारती आणि इतर सोयी न देण्याचा निर्णय घेतला आहे.  थकीत वेतनेतर अनुदान तातडीने देण्यात यावा अशी मागणी महामंडळाने केली आहे. अन्यथा  आम्ही आमच्या शाळांच्या इमारती दहावी आणि बारावीच्या परीक्षांसाठी देणार नाही असा इशाराच शिक्षण विभागाला देण्यात आला आहे. राज्यात सुमारे 64 हजार अनुदानित शाळा आहे. बहुतांश शाळा आमच्यासोबत असल्याचा दावा ही शिक्षण संस्था महामंडळाने केला आहे. त्यामुळे दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेण्यासाठी परीक्षा केंद्र कुठून आणायचे असा पेच शिक्षण विभागासमोर निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 


परीक्षेचा कालावधी


 बारावीची लेखी परीक्षा  4 मार्च 2022 ते 30 मार्च 2022 यादरम्यान होणार आहे. तर श्रेणी, प्रात्यक्षिक, तोंडी परीक्षा, अंतर्गत मूल्यमापन 14 फेब्रुवारी 2022 ते 3 मार्च 2022 यादरम्यान होणार आहे. दहावीची लेखी परीक्षा 15 मार्च 2022 ते चार एप्रिल 2022 होणार आहे. तर श्रेणी, प्रात्यक्षिक, तोंडी परीक्षा, अंतर्गत मूल्यमापन 25 फेब्रुवारी ते 14 मार्च यादरम्यान होणार आहे. 


विषय, माध्यम व प्रश्नपत्रिका संख्या 


मंडळाची परीक्षा सार्वत्रिक स्वरुपाची असून संपूर्ण राज्यात एकाच वेळी एकसमान प्रश्नपत्रिकेवर आयोजित केली जाते. यामध्ये वस्तुनिष्ठ, लघुत्तरी व दिर्घोत्तरी प्रश्नांचा समावेश असतो. बारावीसाठी 356 तर दहावीसाठी 158 प्रश्नपत्रिका असतील. 


इतर महत्त्वाच्या बातम्या :


SSC HSC Exam : दहावी, बारावीच्या परीक्षा कशा होणार? पाहा संपूर्ण माहिती


HSC SSC EXAM: दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांच्या सरावासाठी प्रश्नपेढी; विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, शिक्षणमंत्र्यांचं आवाहन