Mumbai : राज्यात कोरोना रुग्णांचा (Corona Update) आकडा हळूहळू वाढताना दिसत आहे. दिवसेंदिवस महाराष्ट्र राज्यातील रूग्णांच्या संख्येत काहीशा फरकाने वाढ होतेय. मात्र, असे असले तरी राज्यात रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.12 टक्क्यांवर आले आहे. याचाच अर्थ  राज्यात आजही नवीन कोरोना रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे. आज 550 कोरोनाच्या नव्या रुग्णांची भर पडली तर 772 रुग्ण कोरोनामुक्त  झाले आहेत. त्यामुळे कोरोना रूग्णांची संख्या काहीशी स्थिर पाहायला मिळतेय. 


राज्यात 772 रुग्ण कोरोनामुक्त (Maharashtra Corona Update) 


राज्यात मंगळवारी 550 कोरोनाच्या (Maharashtra Corona Update) नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर आज दिवसभरात एकूण 772 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. 


दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू (Maharashtra Corona Death) 


राज्यात दोन कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यूदर हा 1.82 टक्के इतका झाला. तर आतापर्यंत राज्यामध्ये 79,63,854 कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 98.12 टक्के इतकं झालं आहे. 


राज्यात एकूण 4,216 सक्रिय रुग्ण (Maharashtra Corona Active Cases) 


राज्यात एकूण 4,216 सक्रिय रुग्ण संख्या आहे. त्यामध्ये पुण्यात सर्वाधिक म्हणजे 1232 इतके रुग्ण असून त्यानंतर मुंबईत 936 सक्रिय रूग्ण आहेत. तर, ठाण्यामध्ये 647 सक्रिय रुग्ण आहेत.


कोरोना संक्रमण आटोक्यात येत असताना राज्य सरकारकडून खबरदारी म्हणून लोकांसाठी जारी केलेल्या ‘प्रमाणित संचालन पद्धती’ (एसओपी) मध्ये मास्कसक्ती अनिवार्य करण्यात आली होती. याच मास्कसक्तीचा परिणाम काहीसा राज्याच्या आकडेवारीवर होताना दिसतोय. 


महत्वाच्या बातम्या :