Maharashtra Coronavirus Update : राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत चढउतार पाहायला मिळत आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी राज्यात दोन हजार 944 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. तर गुरुवारी राज्यात दोन हजार 678 रुग्णांची तर बुधवारी राज्यात 3142 नव्या रुग्णांची नोंद झाली होती. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी राज्यात तीन हजार 499 रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे राज्यात आजपर्यंत एकूण 78,31,851 करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.  यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 97.91% एवढे झाले आहे.


सात कोरोनाबाधितांचा मृत्यू –
राज्यात शुक्रवारी सात करोना बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली आहे. त्यामुळे सध्या राज्यातील मृत्यूदर 1.84% एवढा आहे. गुरुवारी राज्यात आठ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला होता तर बुधवारी राज्यात सात कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला होता.


राज्यातील ॲक्टिव्ह रुग्ण -
राज्यात सध्या 18851 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. सर्वाधिक ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या मुंबई, ठाणे आणि पुण्यात आहे. मुंबईमध्ये चार हजार 427 तर ठाण्यात दोन हजार 829 आणि पुण्यात सहा हजार 197 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.


मुंबई-पुण्यात सर्वाधिक रुग्ण -
आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, राज्यात आज दोन हजार 944 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात आद सर्वाधिक रुग्ण पुणे आणि मुंबईमध्ये आढळले आहेत. मुंबईत आज 530 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर नवी मुंबई 118, पुणे 197, पुणे मनपा 641, पिंपरी चिंचडवड मनपामध्ये 194 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. इतर ठिकाणी कोरोना रुग्णांची संख्या शंभर पेक्षा कमी आहे.


देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 1 लाख 22 हजारांपार
देशातील सक्रिय रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. सध्या देशात 1 लाख 22 हजार 335 रुग्ण कोरोनो संक्रमित आहेत. तर गुरुवारी दिवसभरात 15 हजार 899 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यासह आतापर्यंत भारतात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 4 कोटी 29 लाख 37 हजार 876 वर पोहोचली आहे.