Pune Science Film News: पुणे हे शिक्षणाचं माहेरघर आहे. प्रत्येक क्षेत्रात पुण्यातील विद्यार्थ्यांनी आपलं नाव कमावलं आहे. पुण्यातील तरुण दिग्दर्शक सिध्दार्थ बाळकृष्ण दामले यांच्या 'जिवो जिवस्य जीवनम्' या  माहितीपटाची अकराव्या इंडिया नॅशनल सायन्स फिल्म फेस्टिव्हलसाठी निवड झाली आहे. हा फेस्टिव्हल भोपाळ  येथे 22 ते 26 ऑगस्ट दरम्यान होणार आहे.


महितीपट नक्की कशावर आधारित आहे? 
परसबागेतील बुलबुल पक्ष्याच्या जोडीकडून घरट्याची निर्मिती करतानाची प्रक्रिया कॅमेऱ्यात कैद केली आहे. अनेक दिवस ही प्रक्रिया कॅमेऱ्यात कैद करत होता. अक दिवस अचानक त्यावर बहिरी ससाण्याचा हल्ला, उरलेल्या अंडयातून होणारे प्रजनन , पुढे जाणारे जीवन हे सगळं कॅमेऱ्यात कैद केली आहे. यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे बहिरी ससाण्याचा हल्ला हा दुर्मिळ मानला जाणारा शॉट कॅमेऱ्यात कैद झाल्याने त्याच्या माहितीपटाची इंडिया नॅशनल सायन्स फिल्म फेस्टिव्हलसाठी निवड झाली आहे.


सिध्दार्थ बाळकृष्ण दामले हा पुण्यात डिप्लोमा करतो आहे. त्याचे वडिल डॉ. बाळकृष्ण दामले हे दिग्दर्शन आणि निर्मिती क्षेत्रात काम करतात. त्याच्या वडिलांनी अमेरिकेतील नामवंत अकॅडमीतून शिक्षण घेतलं आहे. त्यामुळे लहानपणीपासून चित्रपटाचं बाळकडू मिळालं. वडिलांबरोबर त्याने लहानपणापासून विविध विषयांवरच्या फिल्ममध्ये काम केलं आहे. त्यामुळे मोठं झाल्यावर त्याने फिल्ममेकींग करण्याचा निर्णय घेतला. मुलाने केलेल्या या माहितीपटाची देश पातळीवर निवड झाली. मला लहानपासून चित्रपटाची आवड आहे. त्यामुळे मी त्याचं शिक्षण घेतलं. याचा उपयोग माझ्या मुलाने नक्की चांगल्या प्रकारे केला. त्यामुळे मला त्याचा कायम अभिमान वाटतो, असं सिध्दार्थचे वडिल सांगतात.


इंडिया नॅशनल सायन्स फिल्म फेस्टिव्हल
इंडिया नॅशनल सायन्स फिल्म फेस्टिव्हल हे फिल्म फेस्टिव्हल विज्ञानावर आधारित नव्या प्रयोगांवरील माहितीपटासाठी भरवण्यात येतं. विज्ञानात वेगवेगळे प्रयोग व्हावे, तरुणांना संशोधन आणि विज्ञान क्षेत्रातील विविध विषयांवर मोकळे पणाने काम करता यावं, त्यागोष्टी प्रेक्षकांना सहज सोप्या रितीने कळाव्या, असा या फेस्टिव्हलचा हेतू आहे.