मुंबई :  राज्यात आज 1515 कोरोनाच्या (Corona) नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर आज दिवसभरात एकूण 2062 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. आज नोंद झालेल्या रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण हे मुंबईतील आहे. मुंबईत सध्या 431 सक्रिय रुग्ण आहेत. 


तीन कोरोनाबाधितांचा मृत्यू


राज्यात आज तीन कोरोनाबाधित रुग्णांनी आपला जीव गमवाला. त्यामुळे राज्यातील मृत्यूदर हा 1.85 टक्के इतका झाला. तर आतापर्यंत राज्यामध्ये 78,16,933 कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 97.87 टक्के इतकं झालं आहे.  


राज्यात आज एकूण 21,935 सक्रिय रुग्ण


राज्यात आज एकूण 21,935 सक्रिय रुग्ण संख्या आहे. त्यामध्ये मुंबईत सर्वाधिक म्हणजे 7040  इतके रुग्ण असून त्यानंतर पुण्यात 4605 सक्रिय रुग्ण आहेत.


देशात 16 हजार 135 नवे कोरोना रुग्ण, 24 रुग्णांचा मृत्यू


देशातील कोरोनाच्या संसर्गात किंचित वाढ झाली आहे. गेल्या 24 तासांत देशात 16 हजार 135 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 24 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रविवारी दिवसभरात 13 हजार 958 रुग्ण कोरोना संसर्गातून बरे झाले आहेत. देशातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. सध्या भारतात 1 लाख 13 हजार 864 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. देशातील कोरोना रुग्णांचा सकारात्मकता दर 4.85 इतका आहे. देशात शनिवारी दिवसभरात 16 हजार 103 नवीन कोरोनाबाधितांची नोंद आणि 31 रुग्णांचा कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे मृत्यू झाला. त्याच्या तुलनेनं रविवारी समोर आलेली रुग्णांची संख्या कमी आहे. पण देशातील कोरोना संसर्ग अद्याप कायम आहे.