Maharashtra Corona Update : राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत चढउतार पाहायला मिळत आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी राज्यात 2024 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर पाच रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. तर 2190 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर राज्यात सध्या 11906 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.


आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात आज 2190 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्यात आजपर्यंत एकूण 78,95,954 करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 98.01 टक्के एवढे झाले आहे. आज राज्यात 2024 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज पाच करोना बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.83 टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 8,33,60,768 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 80,55,989 (09.66 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.


सक्रीय रुग्णांची स्थिती काय?
राज्यात सध्या 11 हजार 906 सक्रीय रुग्ण आहेत. मुंबईमध्ये सध्या 2391 सक्रीय रुग्ण आहेत. तर पुण्यात 3138, नाशिक 519, ठाणे 873 तर नागपूरमध्ये 1294 रुग्ण सक्रीय आहेत. 


आज सर्वाधिक रुग्ण कुठे?
आज राज्यात 2024 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 80,55,989 झाली आहे. आज सर्वाधिक रुग्ण मुंबईमध्ये आढळले आहेत. मुंबईत आज 446 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर पुणे मनपा 254, पिंपरी चिंचवडमध्ये 110 आणि नागपूर मनपामध्ये 112 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.


देशात 20,551 नवीन कोरोनाबाधित
देशात गेल्या 24 तासांत 20 हजार 551 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. याशिवाय गुरुवारी दिवसभरात  53 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. बुधवारी देशात 19 हजार 893 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली. त्यामुळे तुलनेनं कोरोना रुग्णांच्या संख्येत  दिलासादायक बाब अशी की, कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे.  देशात मागील 24 तासांत 21 हजारांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. गुरुवारी दिवसभरात 21 हजार 595 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोना महामारी सुरु झाल्यास देशात एकूण 4 कोटी 34 लाख 45 हजार 624 जणांनी कोरोना संसर्गावर मात केली आहे. कोरोना रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक असणे ही दिलासादायक बाब आहे. सध्या देशात 1 लाख 35 हजार 364 सक्रिय कोरोनो रुग्ण आहेत.