मुंबई : राज्यातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत काही प्रमाणात वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. राज्यात आज कोरोनाच्या 949 रुग्णांची नोंद झाली असून सहा जणांचा मृत्यू झाला आहे. तर राज्यात गेल्या 24 तासात 912 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
राज्यात आतापर्यंत 80,02,690 कोविड-19 रुग्णांना पूर्ण बरे झाल्यानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर 98.10 टक्के इतका झाला आहे. राज्यात आज कोरोनामुळे सहा जणांना आपला जीव गमवावा लागला असून राज्यातील मृत्यूचे प्रमाण 1.82 टक्के इतकं आहे.
राज्यात आतापर्यंत 8,68,16,941 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 81,57,293 चाचण्या पॉझिटिव्ह (09.40 टक्के) झाल्या आहेत. सध्या कोविडचा Omicron XBB.1.16 व्हेरियंट वाढत असून त्यामुळे एकूण 681 जणांना लागण झाल्याचे आढळून आले. या प्रकाराच्या प्रकरणांमध्ये चार मृत्यूची नोंद झाली आहे.
मृतांची संख्या:
1 जानेवारी 2023 पासून आतापर्यंत कोरोनामुळे 68 मृत्यूची नोंद झाली आहे. यापैकी 73.53 टक्के मृत्यू 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींमध्ये झाले आहेत. मृतांपैकी 57 टक्के लोकांमध्ये कोमॉर्बिडीटी आहे, 9 टक्क्यांमध्ये कोणतेही कोमॉर्बिडीटी नाही आणि मृतांपैकी 34 टक्के लोकांसाठी डेटा अनुपलब्ध आहे.
देशात नऊ हजार जणांना कोरोनाची लागण
देशात सोमवारी कोरोनाच्या 9 हजार 111 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली होती, तर आता मंगळवारी 7 हजार 633 नव्या कोरोनाबाधितांची नोंद (Coronavirus Cases) करण्यात आली आहे.
आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत कोरोना संसर्गामुळे 11 जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक राज्यांतील परिस्थिती अजूनही गंभीर आहे. 7 हजार 633 नव्या कोरोना रुग्णांसह, कोरोनाच्या एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 61 हजार 233 वर पोहोचली आहे. 24 तासांत 6 हजार 702 जण कोरोनामुक्त झाले आहेत.
गरज असेल तिथे मास्क वापरा...
सद्यस्थितीत आढळून येत असलेला व्हेरिएंट्स फारसा घातक नसून यात रुग्ण घरी उपचार घेऊन देखील बरा होत आहे. पेशंटला व्हेंटिलेटर किंवा आयसीयू बेडची गरज पडत नाही. परंतु पेशंटला मात्र काही प्रमाणात त्रास होतो आणि म्हणून पेशंट असेल किंवा सीनियर सिटीजन असतील, यांना देखील विशेष काळजी घेण्याचा आवाहन सरकारने केलेले आहे. गरज असेल तिथे मास्कचा वापर करा, विशेष करून गर्दीच्या ठिकाणी, हॉस्पिटलमध्ये, जिथे इन्फेक्शनचा धोका असतो, तिथे मास्क जर लावला पाहिजे असे देखील सूचना भारती पवार यांनी दिल्या आहेत.
ही बातमी वाचा: