मुंबई: राज्यातील शाळा यंदा 15 जून रोजी सुरू होणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी दिली आहे. तर विदर्भात उन्हाची तीव्रता जास्त असल्याने त्या ठिकाणी 30 जून रोजी शाळा सुरू होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. मुलांना आपल्या सुट्या व्यवस्थित प्लान करता याव्यात यामुळे हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती दिपक केसरकर यांनी दिली. 


दिपक केसरकर म्हणाले, केंद्राचा नवभारत साक्षरता कार्यक्रम घेतला जाणार आहे. यापुढे शासकिय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये पहिली ते आठवी मुलांचे शाळेचे कपडे, वह्या, शूज आणि सॉक्स हे शासनातर्फे मोफत दिले जाणार आहेत. तसेच प्रत्येक धड्यानंतर आता एक पान कोरे ठेवले जाणार आहे. 


येत्या शैक्षणिक वर्षात एकत्रित कुटुंब पद्धतीमुळे 'आजी आजोबा दिवस' साजरा केला जाणार आहे असं दिपक केसरकर यांनी माहिती दिली. ते म्हणाले की, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षण दिले जाणार. 20 मे पर्यंत सर्व त्रूटी पूर्ण करणाऱ्या शिक्षकांना अनुदान देण्यात येणार आहे.  शिक्षक सेवकांच्या पगारात वाढ करण्यात आली आहे. शिष्यवृत्तीमध्येही वाढ करण्यात आली आहे.


विद्यार्थ्यांच्या सर्वागिण विकासासाठी इंटरनेटद्वारे माहिती दिली जाईल आणि स्पर्धा घेतल्या जाणार असल्याचं दिपक केसरकर म्हणाले. ते म्हणाले की, शाळांमध्ये interactive TV लावले जाणार. कमी पटसंख्येंच्या शाळा बंद कराव्या लागू नयेत यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. पायाभूत सुविधा वाढवल्या जाणार आहेत. मराठीकडे आकर्षित करण्यासाठी उच्च शिक्षणही मराठीमध्ये करणार आहोत. मुलाच्या शाळेतील पहिल्या पावलाचे स्वागत केलं जाणार.


वृद्धापकालीन व्यक्तींसाठी डे केअर सेंटर सुरू करण्याबाबत विचारधीन असल्याचं दिपक केसरकर म्हणाले. ते म्हणाले की, बालभारती पुस्तक आम्ही 90 टक्के मुलांना मोफत पुस्तक देतोय. पण कागदाच्या किंमती वाढत असल्याने त्याच्या किमतीत 30 टक्के वाढ करण्यात आली आहे  गरजूंना आम्ही पुस्तक मोफत देतोय. सर्वांना देणं शक्य नाही. ज्या खासगी शाळांची फी भरू न शकलेल्या मुलांची स्कूल लिविंग सर्टिफिकेट अडवून ठेवली आहेत त्याबद्दल तक्रारी आलेल्या आहेत. याबाबत समिती नेमणार आहोत. कोविड ड्युटीवर असताना मृत्यू पडलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना, शिक्षकांसह या सर्वांना मदत दिलेली आहे. कोण राहिलं असेल  तर त्याचीही पडताळनी करु. 


ही बातमी वाचा :