Dhule Fire News : धुळे जिल्ह्यातील (Dhule) चिखली पाडा येथील मेणबत्तीच्या कारखान्याला आग (Candle Factory Fire) लागल्याची घटना घडली असून यात चार महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर दोन महिला गंभीर जखमी झाल्याचे समजते आहे. शॉर्टसर्किटमुळे (short-circuit) आग लागल्याची प्राथमिक माहिती असून धुळे शहरापासून जवळपास शंभर किलोमीटर ही मेणबत्ती बनविण्याऱ्या कंपनीत घटना घडली. 


सध्या उन्हाळ्याचे दिवस असून तापमानाचा (Temperature) पारा दिवसेंदिवस वाढत आहे. धुळे जिल्ह्यात (Dhule Distrioct) तापमानाचा पारा चाळीस अंशावर असून साक्री तालुक्यातील निजामपूर पासून तीस किलोमीटर अंतरावर चिखलीपाडा येथे मेणबत्ती बनविण्याचा कारखाना आहे. या मेणबत्ती बनविण्याच्या कारखान्यात आज दुपारच्या सुमारास शॉर्टसर्किट होऊन आग लागल्याची घटना घडली. यात चार महिलांचा जागीच मृत्यू झाला असून दोन महिला गंभीर जखमी आहेत. त्या जखमी महिलांना नंदुरबार (Nandurbar) शहरात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तसेच धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक देखील घटनास्थळी रवाना झाल्याची माहिती आहे. दरम्यान मेणबत्तीच्या कारखान्यात लागलेली आग भीषण असून आग लागण्याचे प्राथमिक कारण शॉर्टसर्किट सांगितले जात असले तरीही अद्याप चौकशीतून नेमके कारण समोर येणार असल्याचे समजते. 


निजामपूर जवळील चिखलीपाडा येथे एका पत्र्याच्या शेडमध्ये हा मेणबत्ती बनविण्याचा कारखाना सुरु होता. या कारखान्यात मुख्यत्वे मेणबत्तीसह वाढदिवसाला फोडण्यात येणाऱ्या तुडतुडे मेणबत्त्या बनविण्यात येत होत्या. यासाठी जवळच्या जैताणे गावातील महिला कामगार कामासाठी येत होत्या. आज दुपारच्या सुमारास अचानक आग लागल्याची घटना घडली. यात महिलांना बाहेर निघणे कठीण झाले, शिवाय मदतीला कदेखील कोणीही नसल्याने चार महिलांचा आगीत होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला तर अन्य दोन महिला गंभीररीत्या भाजल्या आहेत. दरम्यान या प्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे. तर आग कशी लागली? मेणबत्ती बनविताना ज्वालाग्राही पदार्थाचा वापर करण्यात येत होता का? या पदार्थांचा वापर करण्यासाठी परवानगी घेतली होती का? याबाबत तपास सुरु असल्याची माहिती पोलीस अधीक्षक संजय बारकुंड दिली आहे.


आकर्षक मेणबत्तीनं घेतला जीव 


धुळे जिल्ह्यातील चिखलीपाडा गावामध्ये एका मेणबत्ती बनवायच्या कारखान्याला लागलेल्या आगीत चार महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर दोन महिला गंभीररित्या भाजल्या आहेत. मयतांमध्ये आशाबाई भैया भागवत आणि राजश्री भैया भागवत, नयना संजय माळी, सिंधुबाई धुडकू राजपूत या चौघींचा समावेश असल्याचे बोलले जात आहे. चौकशीतच आगीच नेमकं कारण समोर येणार असल्याचं पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी सांगितल आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतल असून, जखमींना नंदुरबार येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या मयत महिलांमध्ये एक अल्पवयीन मुलीचाही समावेश असल्याने त्या संदर्भातही पोलीस तपास करीत आहेत.