Maharashtra Corona Update : राज्यातील नव्याने आढळणारी कोरोना रुग्णांची संख्या बऱ्यापैकी आटोक्यात आली आहे. राज्यात आज नव्या 113 रुग्णांची नोंद झाली आहे. याशिवाय मागील 24 तासांत राज्यात 283 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यात आजपर्यंत एकूण 77,23,288 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 98.11% एवढे झाले आहे. तसंच राज्यात केवळ एका रुग्णाचाच कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ज्यामुळे राज्यातील मृत्यूदर 1.82 टक्क्यावर पोहोचला आहे.


सक्रीय रुग्ण कुठे किती?


नव्याने आढळलेल्या रुग्णांमुळे राज्यातील सक्रीय रुग्णसंख्या 1 हजार 354 झाली आहे. राज्यात सर्वाधिक सक्रीय रुग्ण पुण्यात आहेत. पुण्यात 420 सक्रीय रुग्ण आहेत. त्यानंतर मुंबईत 298, ठाणे 152, अहमदनगरमध्ये 137 सक्रीय रुग्ण आहेत. नंदुरबार, धुळे, हिंगोली, यवतमाळमध्ये एकही सक्रीय रुग्ण नाही.


मुंबईतील रुग्णसंख्येत मोठी घट


मुंबईत आज केवळ 27 नवे कोरोनाबाधित आढळले असून मुंबई पालिका क्षेत्रात (BMC) आज देखील एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार मुंबईत नवे 27 कोरोनाबाधितांसह 54 जण कोरोनामुक्त झाले आहेत. नव्याने आढळलेल्या कोरोना रुग्णांमुळे मुंबईतील सक्रिय रुग्णसंख्या देखील कमी झाली असून आज ही संख्या 298 इतकी झाली आहे. मुंबईत रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही 98 टक्क्यांवर गेले आहे. आज नव्याने सापडलेल्या 27 रुग्णांपैकी केवळ एका रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने पालिकेकडील 28 हजार 495 बेड्सपैकी केवळ 49 बेड सध्या वापरात आहेत.


हे ही वाचा -



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha