Maharashtra Lockdown LIVE Updates: राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी 3 वाजता बैठक
Maharashtra Covid 19 Cases LIVE Updates : राज्यात कोरोनाचं संकट वाढत चाललं आहे. काल तर राज्यात एकाच दिवशी 40 हजारांच्या वर कोरोना रुग्ण समोर आले आहेत. राज्यात लॉकडाऊनला पर्याय म्हणून कडक निर्बंधांसह 'मिनी लॉकडाऊन' चा विचार सध्या सरकार दरबारी सुरू आहे.
Maharashtra Cabinet Meeting: राज्यात कोरोनाचा प्रकोप झाला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालल्याने राज्यातील अनेक शहरांमध्ये संचारबंदी घालण्यात आली आहे. आज लॉकडाऊन आणि कोरोनाची परिस्थिती यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाची बैठक बोलावण्यात आली आहे. आज दुपारी 3 वाजता ही बैठक होणार असून सर्व मंत्री व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे या बैठकीला उपस्थित असतील अशी माहिती आहे. 2 एप्रिल रोजी मुख्यमंत्र्यांनी केलेल्या संवादात येत्या दोन दिवसात लॉकडाऊनबाबत निर्णय घेणार असल्याचं म्हटलं होतं. आज मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांशी चर्चा करुन पुढील निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांची दादर मंडईला भेट, दादरमदील गर्दी पाहून पालकमंत्री नाराज, असं चित्र असेल तर कठोर निर्णय घ्यावेच लागतील आणि ते आजच घेतले जातील, पालकमंत्र्यांचे संकेत , नाईट कर्फ्यु आधी लावलाय, आता दिवसा सुद्धा कठोर निर्बंध लावाले लागतील, एकच जण 8 वाजता येणार आणि बोलणार असं चालणार नाही, आमचं सरकार सगळेजण एकत्र येतील आणि निर्णय घेतला जाईल , मुंबईत बेडची कमतरता नाही, आयसीयु, ऑक्सिजन बेड उपलब्ध आहेत, शेख यांची माहिती
राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी 3 वाजता बैठक, सर्व मंत्र्यांची ऑनलाईन बैठक, लॉकडाऊन आणि कोरोनाची परिस्थिती यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी बोलावली बैठक
प्रसिद्ध गायक उदित नारायण यांचा गायक मुलगा आदित्य नारायण आणि आदित्यची पत्नी श्वेता अग्रवाल दोघेही कोरोना पॉझिटिव्ह. आदित्यने सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली माहिती.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मल्टिप्लेक्स मालकांसमवेत दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक
बारामती शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव असल्यामुळे बारामती शहरात देखील सकाळी ९ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत दुकाने तसेच व्यवहार सुरू राहतील. तसेच बारामती तालुक्यात रात्री 6 ते सकाळी ९ संचारबंदी करण्यात आली आहे. कोरोनाची वाढती लोकसंख्या बारामतीकरांसाठी चिंतेची बाब ठरत आहे त्यामुळे बारामतीत देखील मिनी लॉकडाऊनचे नियम लागू करण्यात आले आहेत. हे नियम 9 एप्रिल पर्यंत लागू असतील. शहरातील मॉल, हॉटेल, रेस्टॉरंट, बार, चित्रपटगृह, नाट्यगृह, स्विमींगपूल, स्पा, जिम हे पुढील सात दिवस बंद असतील. सर्व आठवडे बाजारही या काळात बंद असतील. दूध, भाजीपाला, फळे, वृत्तपत्र सेवेसह जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणा-या पुरवठादारांसह हॉटेल पार्सल सेवेच्या व्यक्तींनाही यातून सूट देण्यात आली आहे.
कोरोनाच्या वाढत्या रूग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणेवर ताण पडू लागलाय. कोरोनाच्या नियमांचं नागरिक पालन करीत नसल्याने कोरोना रुग्णांचा आकडा दिवसागणिक वाढत चाललाय यामुळे पुन्हा एकदा लॉकडाऊनची शक्यता वर्तवण्यात येतंय .देशभरात राज्यात देखील लॉकडाऊनला विरोध होतोय. कल्याण डोंबिवली मध्ये देखीलकोरोना रुग्ण संख्येत लक्षणीय वाढ होताना दिसून येते एकट्या मार्च महिन्यामध्ये तेरा हजाराहून अधिक रुग्ण कल्याण डोंबिवली मध्ये आढळून आलेत. कोरोनाला आळा घालण्यासाठी पुन्हा एकदा लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याबाबत आज कल्याण डोंबिवलीतील नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या असता नागरिकांनी लॉकडाऊन नको मात्र निर्बंध आणखी कडक वेळेचे बंधन घालून द्या ,अंशतः लॉकडाऊन करा , अशा प्रतिक्रिया दिल्या
कल्याण डोंबिवलीत दररोज कोरोना रुग्णसंख्येने हजारी पार केलीय. मार्च महिन्यात तब्बल 13 हजार हुन अधिक रुग्णांची भर पडलीय .केडीएमसी कडून नागरिकांना मास्क वापरा ,सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा कोरोना नियमांचे पालन करा असे आवाहन केलं जातंय .मात्र बेजबाबदार नागरिकांना अजूनही कोरोनाचे गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे .आज डोंबिवली स्टेशन परिसरात अनेक नागरिक ,दुकानदार ,महिला या विनामास्क तर बहुतांश लोकं हनुवटीवर मास्क अडकवून फिरत होते त्यांना मास्क बाबत विचारण्याचा प्रयत्न केला तर काहींनी श्वास कोंडतोय ,काहींनी आताच काढला अस उत्तर दिलं तर काहींनी गप्प राहणं पसंत केलं
नाशिक शहरा पाठोपाठ जिल्ह्यातील ग्रामीण भागात ही कोरोनाचा उद्रेक वाढला असून त्यामुळे प्रशासनासह नागरिकांची चिंता वाढली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी व्हावा आणि कोरोनाची साखळी तुटावी यासाठी चांदवड नगर परिषद हद्दीत आजपासून 9 दिवसांचा जनता कर्फ्यु लावण्यात आला असून आज पहिल्या दिवशी या जनता कर्फ्युला चांगला प्रतिसाद मिळाला आहे
मुख्यमंत्री उद्या पत्रकार, व्यायाम शाळांचे मालक, नाट्य निर्माते संघाचे प्रतिनिधी, सिनेमागृहाचे मालक यांच्याशी चर्चा करणार
पनवेल शहरात सर्वाधिक ४३३ नवीन रुगणांची नोंद. अलिबाग तालुक्यात आढळले ५६ नवे रुग्ण. रायगड जिल्ह्यात दिवसभरात सात रुग्णांचा मृत्यू. रायगड जिल्ह्यात एकूण ४ हजार ३०३ ऍक्टिव्ह रुगण.
आतापर्यंत आपण संकटसमयी भगवान विष्णूनं घेतलेल्या अवतारांबाबत ऐकलेलं. पण, आता हा कोरोनाच्या विषाणूचा अवतार भेडसावत आहे.
आज मी पुन्हा एकदा सर्वांना आवाहन करतो आहे, विनंती करतो आहे. कारण राज्यातील जनतेनं माझं म्हणणं आजवर ऐकलं आहे. यामध्ये धार्मिक नेते, राजकीय मंडळी यांचाही समावेश आहे. पण, मधल्या काळात आपण काहीसे शिथील झालो. लग्नसमारंभ, पार्टी, मोर्चे हे सारंकाही कोरोना गेला याच अविर्भावात सुरु झालं. मी तेव्हाही सांगितलं की थोडा धीर धरा. पण, जी भीती वाटत होती तेच झालं- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
जगाची, राज्याची आर्थिक परिस्थिती बिघडली आहे. पण, या परिस्थितीतही राज्याचा पुढे नेण्याच्या मार्गावर मार्गस्थ होणारा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. त्यानंतर 'शिमग्याला' सुरुवात झाली.
मी तुम्हाला घाबरवण्यासाठी आलेलो नाही.., असं म्हणत बिकट परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी मी इथे आलो आहे असं आश्वासक वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केलं.
चंद्रपूर : जिल्ह्यात वाढता कोरोना संसर्ग बघता जिल्हा प्रशासनाचा नवा निर्णय, 5 ते 30 एप्रिल पर्यंत पाचवी ते नववी व अकरावीचे वर्ग बंद मात्र ऑनलाईन वर्ग सुरू राहणार सुरू, इयत्ता दहावी व बारावीचे वर्ग पूर्वीप्रमाणे राहणार सुरू, हे वर्ग कोव्हीड-19 च्या सर्व सुरक्षा विषयक नियमांचे पालन करुन पुर्वीप्रमाणेच राहतील सुरु, आदेशाची अंमलबाजवणी करण्यास टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधीताविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा, भारतीय दंड संहिता तसेच साथरोग कायदा अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा
मुंबईत 8832 नवे कोरोनाबाधित आढळून आल्यामुळं चिंता पुन्हा एकदा वाढली आहे. नागरिकांनी सर्व कोरोनमा नियमांचं काटेकोरपणे पालन करण्याचं आवाहन आरोग्य यंत्रणेकडून सातत्यानं करण्यात येत आहे.
कल्याण डोंबिवलीत कोरोनाचा उद्रेक. कोरोना रुग्णसंख्या हजार पार. आज आढळून आला आतापर्यंतचा उच्चांक. कल्याण डोंबिवली क्षेत्रात आज 1108 कोरोना बाधित रुग्णांची नोंद. उपचार घेत असलेले रुग्ण 9235. तर एका दिवसात 715 कोरोना बाधित रुग्णांना डीस्चार्ज. 24 तासांत कोरोनाबाधित 3 रुग्णांचा मृत्यू. कल्याण पूर्व - 146 ,कल्याण पश्चिम - 369, डोंबिवली पूर्व - 405 ,डोंबिवली पश्चिम - 142, मांडा टिटवाळा - 34 , मोहने - 12
सोलापूर जिल्ह्यात एकाच दिवसात तब्बल 887 नवीन कोरोना बाधित रुग्ण, तर 15 जणांचा मृत्यू. आतापर्यंत एका दिवसात झालेली सर्वाधिक वाढ. आज आढळलेल्या रुग्णांपैकी 579 रुग्ण ग्रामीण भागातील तर 308 रुग्ण शहरातील. आज शहरातील 10 जणांचा मृत्यू, तर ग्रामीण भागातील 5 जणांनी गमावला जीव
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत वर्षा बंगल्यावर राज्यातील सर्व विभागांचे मुख्य सचिव, कोविड १९ संसर्ग टास्क फोर्सचे वरीष्ठ वैद्यकिय अधिकारी आणि राज्याचे मुख्य सचिव यांच्या सोबत महत्वाची बैठक सुरू
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बगाड यात्रा काढू नये असे आदेश असताना देखील साताऱ्यातील बावधन येथे बगाड यात्रा काढण्यात आली. महाराष्ट्रातील सर्वात मोठी यात्रा म्हणून या बगाड यात्रेचा लौकिक आहे.
कोरोना संकटामुळे चार राज्यातील भाविकांच्या उपस्थितीत होणारा बाळुमामाचा भंडारा यंदा रद्द करण्यात आला आहे. आदमापूर येथील देवालय समिती आणि ग्रामस्थांच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. 5 एप्रिल ते 13 एप्रिल बाळुमामाचा भंडारा उत्सव होणार होता. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि गोव्यातील लाखो भाविक येत असतात.
भिवंडीत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा धोका वाढल्याने मनपा प्रशासनाने शहरात कडक निर्बंध लागू केले असून शासन नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येत असल्याचे मनपा आयुक्त डॉ पंकज आशिया यांनी जाहीर केल आहे. विशेष म्हणजे महानगरपालिका स्तरावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत असून नागरिकांची एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी महानगरपालिकेत येणारे सर्वसामान्य नागरिक यांच्या गर्दीवर देखील नियंत्रण राखण्यासाठी महानगरपालिकेत येणाऱ्या नागरिकांना पुढील आदेश होईपर्यंत प्रवेश बंद करण्यात आले आहे. |
पंढरपुरात विठ्ठल मंदिरात येणाऱ्या भाविकांची नगरपालिका करणार कोविड तपासणी , मंदिर समितीशी चर्चा करून दोन दिवसात मंदिरात सुरू होणार तपासण्या
पुण्यात मिनी लॉकडाऊन! हॉटेल्स, बार, रेस्टॉरंट, मॉल, थिएटरसह पीएमपीएमपीएलची बससेवा पुढील सात दिवसांसाठी बंद, कंपन्या त्यांच्या कर्मचाऱ्यांना ने आण करण्यासाठी खाजगी वाहनांचा उपयोग करु शकतील., संध्याकाळी सहा ते पहाटे सहावाजेपर्यंत पुणे जिल्ह्यात उद्यापासून सात दिवस संचारबंदी
नाशिक- पालकमंत्री छगन भुजबळ अॅक्शन मोडवर, सिव्हील सर्जन रत्ना रावखंडे यांना पाठवले सक्तीच्या रजेवर, कोविडच्या पार्श्वभूमीवर जिल्हा रुग्णालयातील गलथान कारभाराबाबत भुजबळ संतप्त, आरोग्य मंत्र्यांशी चर्चा करत तातडीने कारवाई
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत सुरू असलेल्या बैठकीत पुण्यात लॉकडाउन न करता निर्बंध कडक करण्याकडे कल. वेगवेगळ्या पक्षातील लोकप्रतिनिधींनी लॉकडाउन न करता निर्बंध कडक करावेत असं मत व्यक्त केलंय. सकाळी दहा वाजता सुरू झालेली बैठक अद्याप सुरू आहे.
मुंबईत दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्येमध्ये वाढ होत आहे. गुरुवारी मुंबईतील कोरोना बाधितांची संख्या तब्बल साडे आठ हजारांच्या आसपास होती. त्यामुळे मुंबईच्या महापौर किशोर पेडणेकर यांनी लोकल सेवेवर निर्बंध आणावे लागतील अशा पद्धतीचे संकेत दिलेले आहेत. किशोरी पेडणेकर यांच्या माहितीनुसार केवळ अत्यावश्यक सेवेत काम करणारे कर्मचारी यांनाच लोकलने प्रवास करण्याची मुभा दिली जाईल. यासोबतच धार्मिक स्थळे, मॉल्स, बाजारपेठा या ठिकाणीदेखील निर्बंध आणण्यासंदर्भात चर्चा सुरू असल्याची माहिती किशोरी पेडणेकर यांना दिली आहे. दुकानदारांना देखील दिवसाआड दुकान सुरू ठेवण्यासाठी परवानगी दिली जाईल असे देखील संकेत पेडणेकर यांनी दिले आहेत. दुसरीकडे मुंबईतील अनेक रेल्वे स्थानकांमध्ये आजही मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी पाहायला मिळत आहे ही गर्दी अशीच कायम राहिली तर कोरोना बाधित रुग्णांची संख्या नियंत्रणात आणणे कठीण होऊन जाईल. त्यामुळे लोकलच्या बाबतीत कडक निर्णय घ्यावा लागेल असे देखील महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या आहेत.
पार्श्वभूमी
Maharashtra Corona cases Updates: : राज्यात कोरोनाचं संकट वाढत चाललं आहे. काल तर राज्यात एकाच दिवशी 40 हजारांच्या वर कोरोना रुग्ण समोर आले आहेत. कोरोनाचं संकट वाढल्यानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आज महत्त्वाची बैठक बोलावली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे आज 11 सर्वाधिक कोरोनाबाधित राज्यांच्या मुख्य सचिवांसोबत केंद्रीय कॅबिनेट सचिवांची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेणार आहेत.
महाराष्ट्रात कोरोनाचा कहर वाढत असताना जनतेत लॉकडाऊनची धास्ती कायम आहे. गेल्या वर्षभराच्या तुलनेत यंदा मार्च महिन्यात महाराष्ट्रात कोरोना आकड्यांनि नवा उच्चांक गाठला. जवळपास 6.6 लाख कोरोनाग्रस्त आढळून आले असून तब्बल 400% वाढ फक्त एका महिन्यात नोंद झाली आहे. अशा परिस्थितीत लॉक डाऊन 'टू बी ऑर नॉट टू बी' असा यक्षप्रश्न ठाकरे सरकार समोर उभा टाकला आहे.
मात्र लॉक डाऊन करण्यावरून ठाकरे सरकारमध्येच मतभेद समोर आले आहेत. तर दुसरीकडे आनंद महिंद्रा सारख्या मोठ्या उद्योगपतींपासून ते हातावर पोट असलेल्या गोर गरीब मजुरांपर्यंत अशा सर्व स्तरातून लॉकडाऊनच्या विरोधात सूर आवळलेत. त्यामुळे राज्यात लॉकडाऊनला पर्याय म्हणून कडक निर्बंधांसह 'मिनी लॉकडाऊन' चा विचार सध्या सरकार दरबारी सुरू आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -