मुंबई : राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्येत चढ-उतार दिसून येत आहे. गेल्या 24 तासात राज्यात कोरोनाच्या 39 हजार 207 नव्या रुग्णांची भर झाली असून 53 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या 24 तासात 38, 824 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. या आधी रुग्णसंख्या 40 हजारांच्या वर असायची, त्यात आता घट होत असल्याचं दिसून येतंय.
राज्यात आज एकाही ओमायक्रॉनबाधितांची नोंद नाही
राज्यात आज एकाही ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झालेली नाही. आतापर्यंत 1860 ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात झाली आहे. त्यापैकी 1001 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे.
राज्यात आज 53 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद
राज्यात आज 53 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 1.95 टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत 68 लाख 68 हजार 816 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.32 टक्के आहे. सध्या राज्यात 23 लाख 44 हजार 919 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 2960 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आजपर्यंत 72 लाख 82 हजार 128 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.
मुंबईत 6 हजार 149 नवे कोरोनाबाधित
मुंबईत सोमवारी 5 हजार 556 नवे कोरोना बाधित आढळले होते पण आज मात्र 6 हजार 149 नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे प्रशासनाने दिलेले सतर्क राहण्याचे आवाहन पाळणे गरजेचे आहे. मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईत मंगळवारी 6 हजार 149 नवे रुग्ण आढळले असून 7 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. ज्यामुळे कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या 16 हजार 476 झाली आहे. तर नव्या बाधितांच्या तुलनेत जवळपास दुप्पट रुग्ण म्हणजेच 12 हजार 810 जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या मुंबईचा रिकव्हरी रेट वाढून 94 टक्के इतका आहे.
महत्वाच्या बातम्या
- जो न्याय नारायण राणेंना, तो नाना पटोलेंना का नाही? चंद्रकांत पाटलांचा राज्य सरकारला सवाल
- नाना तुमच्या स्वागताला आम्ही उत्सुक, पुण्यात फ्लेक्सबाजी करत भाजपचे पटोलेंना आव्हान
- Nana Patole : माझ्याकडून चूक झाली असेल तर पोलिसांनी कारवाई करावी : नाना पटोले
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha