मुंबई : कोरोनाबाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत घट पाहायला मिळत आहे. राज्यात आज  3,105 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 3 हजार 164  रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 63 लाख 74  हजार 892  रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.27 टक्के आहे. 
 
राज्यात आज 50 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.  राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 9, 021  अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. जळगाव (09), नंदूरबार (6),  धुळे (3), जालना (51), परभणी (60), हिंगोली (17), नांदेड (13),  अकोला (25), वाशिम (07), बुलढाणा (07), यवतमाळ (08),   वर्धा (6), भंडारा (2), गोंदिया (4), चंद्रपूर (100),   गडचिरोली (16 ) या  जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे.


राज्यात सध्या 36 हजार 371 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सध्या राज्यात 2,42,110 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 1,355  व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.  आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5, 89, 10, 564  प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 65,53, 961(11.13 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.


मुंबईत गेल्या 24 तासात 418 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद 


मुंबईत गेल्या 24 तासात 418 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 360 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 7,19,992 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे. तर मुंबईत गेल्या 24 तासात सहा रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 4810 सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 1159 दिवसांवर गेला आहे. 


गेल्या 24 तासात 27 हजार रुग्णांची नोंद तर 277 जणांचा मृत्यू 


 देशातील कोरोना रुग्णसंख्या कमी होत आहे असं वाटत असतानाच आता पुन्हा एकदा रुग्णसंख्येचा आलेख वर जाताना दिसतोय. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासात कोरोनाच्या 26 हजार 727 नव्या रुग्णांची भर पडली आहे तर 277 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. गेल्या 24 तासात एकूण 28 हजार 246 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. त्या आधी बुधवारी देशात 23 हजार 529 रुग्णांची नोंद झाली होती तर 311 जणांचा मृत्यू झाला होता.