मुंबई : कोरोनाबाधितांच्या (Coronavirus) दैनंदिन रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ पाहायला मिळत आहे.   राज्यात आज तब्बल  40 हजार 925 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 14, 256 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. मागील  काही दिवसांपासून कोरोनाची संख्या ही हजाराच्या पुढेच येत आहे. आज रुगणसंख्येने 40 हजाराचा आकडा देखील ओलंडला आहे.  तसेच ओमायक्रॉन व्हेरियंटनेही चिंता वाढवली आहे. देशातील सर्वाधिक ओमायक्रॉन बाधित रुग्ण महाराष्ट्रात आहेत.  


राज्यात आज  ओमायक्रॉनबाधितांची  एकही रुग्ण नाही


राज्यात  आज  एकाही ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झालेली नाही  आतापर्यंत 876 ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात  झाली आहे. त्यापैकी 435 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे. 


मागील  पाच  दिवसातील  रूग्ण संख्या 


6 जानवारी - 36,265  रूग्ण
5 जानेवारी -   26, 538  रूग्ण
4 जानेवारी - 18, 466 रूग्ण
3 जानेवारी - 12, 160 रूग्ण
2 जानेवारी - 11, 877 रूग्ण
1 जानेवारी - 9,170 रूग्ण
31 डिसेंबर - 8067 रूग्ण


राज्यात आज 20 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद


 राज्यात आज  20  रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.  राज्याचा मृत्यूदर 2.07 टक्के झाला आहे. राज्यात सध्या 87  हजार 505 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यात आतापर्यंत 65 लाख 47 हजार 410 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.08 टक्के आहे.   सध्या राज्यात 7 लाख 42 हजार  684  व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 1463 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 7, 01 , 46, 329 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.


शुक्रवारी मुंबईत 20 हजार 971  रुग्णांची नोंद


शुक्रवारी मुंबईत 20 हजार 971  रुग्णांची नोंद झाल्याने प्रशासनासह (Mumbai BMC) नागरिकांची चिंता वाढली आहे. मागील काही दिवसांपासून रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. पण दररोज हजारोंच्या तुलनेत वाढणारी रुग्णसंख्या कालच्या तुलनेत आज केवळ 790 ने वाढल्याने कोरोना रुग्णसंख्या आज कुठेतरी स्थिरावल्याचं समोर आलं आहे. मुंबई महामगरपालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईत शुक्रवारी 8 हजार 490 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. ज्यामुळे मुंबईत कोरोनावर मात केलेल्या रुग्णांची संख्या 7 लाख 64 हजार 53 वर पोहोचली आहे. त्यामुळे मुंबईचा रिकव्हरी रेट 87 टक्के इतका झाला आहे. तर मागील 24 तासांत 6 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या 16 हजार 394 झाली आहे. सध्या मुंबईत 91 हजार 731 सक्रीय रुग्ण आहेत. 


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha



इतर महत्त्वाच्या बातम्या :


Maharashtra Corona : पोलिसांनाही आता 'वर्क फ्रॉम होम', पोलिसांसाठी गृह विभागाचा मोठा निर्णय


Mumbai Corona Update : मुंबईतील कोरोना रुग्णांचा आलेख चढताच, मागील 24 तासांत 20 हजार 971 नवे रुग्ण


Corona : मास्कच्या वापरात देशात मुंबई पहिल्या क्रमांकावर, पुणे दहाव्या क्रमांकावर