मुंबई : राज्यात दैनंदिन कोरोना (Maharashtra corona cases) बाधित रुग्णांची संख्या काही दिवसांपासून दहा हजारांच्या आत येऊ  लागली आहे.  राज्यात आज 13, 452 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला तर 7,761  नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर राज्यातील अॅक्टिव्ह केसेस 1 लाख 1 हजार 337 वर आहेत. आज मालेगाव, भंडारा, गोंदियामध्ये एकही कोरोना रुग्णांची नोंद सरकारी आकडेवारीनुसार झालेली नाही. तर कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक 1085 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. आज सरकारी आकडेवारीनुसार राज्यातील 26 शहरं आणि जिल्ह्यांमध्ये एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही.

Continues below advertisement


राज्यात आज 167 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.04 टक्के झाला आहे.  नंदूरबार (47),जालना (37),  हिंगोली (59), यवतमाळ (21), गोंदिया (66), चंद्रपूर (16) या सहा जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 16, 925 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.  


आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4,50,39,617 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 61,97, 018 (13.76 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 5,85, 967 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 4,576 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 


मुंबईत गेल्या 24 तासात 446 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद


मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कोरोना नियंत्रणात असल्याचं पाहायला मिळत आहे.   मुंबईत गेल्या 24 तासात 446 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 470 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 7,05,234 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 96 टक्के झाला आहे. तर मुंबईत गेल्या 24 तासात11 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 6,973 सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 951 दिवसांवर गेला आहे.