एक्स्प्लोर

Maharashtra Corona Cases : राज्यात कोरोना रुग्णसंख्या पुन्हा वाढतेय; कोल्हापूर हॉटस्पॉटच्या मार्गावर

राज्यात कोरोना रुग्णसंख्या पुन्हा वाढताना दिसत आहे. आज राज्यात 9,812 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. यात कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक 1551 रुग्ण आढळलेत.

मुंबई : राज्यात निर्बंध शिथिल केल्यानंतर काही दिवसांनंतर पुन्हा एकदा काही जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. राज्यात आज 9,812 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 8,752 कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यात कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक 1551 रुग्ण आढळले. त्यामुळे कोल्हापूर जिल्हा पुन्हा एकदा हॉटस्पॉटच्या मार्गावर असल्याचे दिसत आहे. तिसऱ्या लाटेचा धोका पाहता सोमवारपासून राज्यात नवीन निर्बंधांची घोषणा करण्यात आली आहे.

दुसऱ्या लाटेत पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा आणि कोल्हापूरमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना संसर्ग पसरला होता. या तीन्ही जिल्ह्यात रोज हजारच्या घरात नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद होत होती. शासनाने कडक निर्बंध लावल्यानंतर तीन्ही जिल्ह्याची दैनदिन रुग्णसंख्या हजारच्या आत आली होती. मात्र, आता पुन्हा एकदा कोल्हापूर जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. शनिवारी (26 जून) जिल्ह्यात 1551 नवीन बाधित आढळले आहेत तर 21 मृत्यूची नोंद झाली आहे. यामुळे प्रशासनाच्या चिंता वाढल्या असून कडक निर्बंध लावले जाण्याची शक्यता आहे.

राज्यात पुन्हा रुग्णसंख्या वाढतेय 
राज्यात पुन्हा रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. 9 हजारावर जरी आकडा दिसत असला तरी कालपेक्षा आज रुग्णसंख्येत वाढ झालीय. त्यामुळे प्रशासनाच्या चिंता वाढत आहेत. राज्यात आता बरे होणाऱ्यांची संख्या आता 57,81,551 इतकी झाली आहे. आज 179 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 2 टक्के इतका झाला आहे. राज्यात सध्या 1,21,151 अॅक्टिव्ह केसेस आहेत.  

राज्यात सोमवारपासून नवीन निर्बंध
राज्यामध्ये कोरोनाची आकडेवारी कमी झाल्यानंतर सरकारनं पाच टप्प्यांमध्ये निर्बंध शिथिल केले होते. मात्र, निर्बंधांमध्ये शिथिलता आल्यानंतर काही दिवसातच कोरोनाबाधित आणि मृतांच्या आकड्यांमध्ये काही प्रमाणात वाढ झाल्याचं समोर येत आहे. सोबतच राज्यात डेल्टा प्लस व्हेरियंटचा धोका देखील वाढू लागला आहे. त्यामुळं राज्य सरकारकडून आधीच्याच नियमावलीमध्ये नवीन बदल केले आहेत. आता राज्यातील सर्व जिल्हे आणि महानगरपालिकांचा समावेश तिसऱ्या गटाच्या वरच ठेवण्यासंदर्भात राज्य सरकारनं निर्णय जारी केला आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Manisha Mhaiskar : महिला अधिकारी नको म्हणत मंत्र्याने डावलले, ते धक्कादायक होतं; मनीषा म्हैसकरांनी सांगितली 'ती' आठवण
महिला अधिकारी नको म्हणत मंत्र्याने डावलले, ते धक्कादायक होतं; मनीषा म्हैसकरांनी सांगितली 'ती' आठवण
महिला व बाल विकास विभागाचा मोठा निर्णय, तब्बल 23 वर्षांनंतर 8 हजार 669 नियमित पदे भरण्यात येणार 
महिला व बाल विकास विभागाचा मोठा निर्णय, तब्बल 23 वर्षांनंतर 8 हजार 669 नियमित पदे भरण्यात येणार 
आयुष्यात बाळासाहेब ठाकरेंचं फार मोठं स्थान, घरी बोलावून त्यांनी मला पदं दिली : नारायण राणे
आयुष्यात बाळासाहेब ठाकरेंचं फार मोठं स्थान, घरी बोलावून त्यांनी मला पदं दिली : नारायण राणे
Narayan Rane : नारायण राणे म्हणजे मोजमाप न ठेवणारा दिलदार माणूस; मुख्यमंत्र्यांकडून स्तुतीसुमने, 74 वा वाढदिवस उत्साहात साजरा
नारायण राणे म्हणजे मोजमाप न ठेवणारा दिलदार माणूस; मुख्यमंत्र्यांकडून स्तुतीसुमने, 74 वा वाढदिवस उत्साहात साजरा

व्हिडीओ

Police Bharti Special Report : फाटक्या चपलातली दांडगी जिद्द, पोलिस भरतीवेळी थक्क करणारी घटना
Ashok Kharat Special Report : खरातविरोधात 160 जीबीचे पुरावे, त्या 19 फोल्डर्समध्ये काय दडलंय?
Arvind Sawant Shivsena: भगवा घेऊन आलोय, भगवा पांघरुन जाणार, संतापलेले अरविंद सावंतानी भर पत्रकारपरिषदेत पत्रही लिहलं,
Sanjay Raut on Eknath Shinde Operation Tiger: देवेंद्र फडणवीसांनी शिंदे गटाची डेडबॉडी केलीय, ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चेवर संजय राऊतांचा जोरदार पलटवार
Karuna Sharma Baramati Exclusive : अर्ज बाद करण्यासाठी मुंबईतील वकील पाठवला, धनूभाऊंवर आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manisha Mhaiskar : महिला अधिकारी नको म्हणत मंत्र्याने डावलले, ते धक्कादायक होतं; मनीषा म्हैसकरांनी सांगितली 'ती' आठवण
महिला अधिकारी नको म्हणत मंत्र्याने डावलले, ते धक्कादायक होतं; मनीषा म्हैसकरांनी सांगितली 'ती' आठवण
Nitin Gadkari : मुंबई गोवा महामार्गाचं काम मे महिना संपण्याअगोदर पूर्ण करणार, नारायण राणेंसमोर नितीन गडकरींचा शब्द
मुंबई गोवा महामार्गाचं काम मे महिना संपण्याअगोदर पूर्ण करणार पण उद्घाटनाला येणार नाही, नितीन गडकरींनी कारण सांगितलं
Stock Market : शेअर बाजारात सेन्सेक्स- निफ्टीत 5 वर्षातील सर्वात मोठी तेजी, गुंतवणूकदारांच्या कमाईत एका आठवड्यात 29 लाखांची कमाई
शेअर बाजारात सेन्सेक्स- निफ्टीत 5 वर्षातील सर्वात मोठी तेजी, गुंतवणूकदारांच्या कमाईत एका आठवड्यात 29 लाखांची कमाई
Donald Trump : चर्चा निष्फळ ठरली तर हल्ला करु, सर्वात धोकादायक शस्त्र तयार, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला धमकी
चर्चा निष्फळ ठरली तर हल्ला करु, सर्वात धोकादायक शस्त्र तयार, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला धमकी
Personal Loan : वैयक्तिक कर्ज घ्यायचा विचार करताय? 'या' 7 गोष्टींबाबत सतर्क राहा, अन्यथा मोठं नुकसान होण्याची शक्यता 
वैयक्तिक कर्ज घ्यायचा विचार करताय? 'या' 7 गोष्टींबाबत सतर्क राहा, अन्यथा मोठं नुकसान होण्याची शक्यता 
मोठी बातमी : मोदी, शाहांसोबत शरद पवार, अडीच वर्षांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या पोस्टरवर थोरल्या पवारांचा फोटो
मोदी, शाहांसोबत शरद पवार, अडीच वर्षांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या पोस्टरवर थोरल्या पवारांचा फोटो
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 एप्रिल 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 एप्रिल 2026 | शुक्रवार
SIP : गुंतवणूकदारांचा एसआयपीवरील विश्वास वाढला, SIP खात्यांची संख्या 10 कोटींच्या पार, 2025-26 मध्ये विक्रमी गुंतवणूक
गुंतवणूकदारांचा एसआयपीवरील विश्वास वाढला, SIP खात्यांची संख्या 10 कोटींच्या पार, 2025-26 मध्ये विक्रमी गुंतवणूक
Embed widget