वाशिम : वाशिमच्या रिसोड तालुक्यातील देगावच्या एका आदिवासी हॉस्टेलमधील 229 विद्यार्थ्यांना आणि कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. बहुतांश कोरोना बाधित विद्यार्थी बाहेरच्या जिल्ह्यातील आहेत,. हॉस्टेलमध्ये सध्या एकूण 327 विद्यार्थी आहेत. हॉस्टेलला प्रशासनाने भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला आहे आणि अधिकची चौकशी सुरू केली आहे.


हॉस्टेल भावना पब्लिक स्कूल नावाने असून यवतमाळ वाशिमच्या खासदार भावना गवळी यांचं आहे. आणखी रुग्ण वाढ होऊ नये याकरिता  जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी काल तातडीने या निवासी शाळेला भेट देत येथील परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच कोरोना बाधित विद्यार्थ्यांना योग्य उपचार व इतर आवश्यक सुविधा पुरवण्याबाबत सूचना केल्या. खबरदारीचे उपाय म्हणून येथील परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलं आहे.


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील तिसरी ते आठवीच्या परीक्षा रद्द


काल राज्यात जवळपास 9 हजार रुग्णांची नोंद


महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढतच आहे. काल 24 फेब्रुवारीला  पुन्हा एकदा कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ पाहायला मिळाली. मागील 24 तासाच महाराष्ट्रात 8 हजार 807 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. सोबतच आज कोरोनामुळे 80 जणांचा मृत्यू झाला आहे. आज 2772 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. राज्यात एकूण 20 लाख 08 हजार 623 रुग्ण बरे घरी परतले आहेत. सध्या राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 59 हजार 358 आहे. तर राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 94.70 टक्के झालं आहे.


महाराष्ट्रात 23 फेब्रुवारी रोजी दिवसभरात 6 हजार 218 कोरोनाबाधितांची वाढ झाली होती तर 51 जणांचा मृत्यू झाला होता. महाराष्ट्रात आज मागील वर्षी 18 ऑक्टोबरनंतरची ही सर्वाधिक वाढ आहे. 18 ऑक्टोबर रोजी राज्यात 9 हजार 060 कोरोनाबाधितांची नोंद झाली होती.


School children | विद्यार्थी कोरोनाच्या विळख्यात, अनेक जिल्ह्यात शालेय विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण