सोलापूर : ज्ञानवापीसंदर्भात (Gyanvapi Masjid) वाराणसी सत्र न्यायालय आणि सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकांवर सुनावणी झाली. दोन्ही कोर्टाच्या सुनावणीकडे अख्ख्या देशाचं लक्ष होतं. ज्ञानवापी मशिदीत शिवलिंग सापडल्याचा दावा हिंदू पक्षकारांनी केला होता. कोर्टानं दिलेल्या आदेशानुसार मशिदीची व्हिडीओग्राफी झाली आणि आता दोन दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश कोर्टानं कमिटीला दिलेत. शिवाय दोन महत्त्वाच्या याचिकांवर उद्या सुनावणी होणार आहे. मात्र सध्या चर्चेत असलेल्या या ज्ञानव्यापी मशीदीचा आणि महाराष्ट्राचा देखील संबंध आहे. ज्ञानव्यापी मंदिरांच्या  पुर्नबांधणीसाठी मल्हारराव होळकरांनी प्रयत्न केल्याची माहिती  शिवचरित्रकार डॉ. शिवरात्न शेटे यांनी दिली आहे.  


ज्ञानवापी मशीद आणि महाराष्ट्राचा काय संबंध? 


औरंगजेब हा मुळात धर्मवेडा होता मात्र 1666 नंतर त्याचं धर्मवेड आणखी वाढलं. त्याला अनेक कारणं आहेत. 17 ऑगस्ट 1666 साली छत्रपती शिवाजी महाराजांची आग्र्याहून सुटका झाली. सतनामीचे बंड ही नैमित्तीक कारण आहे. पण अशा अनेक गोष्टीमुळे औरंगजेब  धर्मवेड अधिक वाढले  आणि 9 एप्रिल 1669 ला त्याने एक फतवा काढला. यामध्ये हिंदू देवालय विध्वंस करण्याचा आदेश त्यांनी दिला. त्यामुळे मला असे वाटते की, अनेक कारणांमध्ये छत्रपतींची आग्र्याहून सुटका आणि सतनामीचे बंड या कारणामुळे देखील काशी विश्वनाथाचे मंदिर पाडून ज्ञानव्यापी उभारली गेली असावी.


ज्ञानवापी मशिदीच्या ठिकाणी पुन्हा जीर्णोद्धार करण्यासाठी अहिल्यादेवी होळकर यांनी काय प्रयत्न केले?


काशी विश्वनाथाचे  मंदिर पाडून औरंगजेबाने ज्ञानवापी मशीद उभारली. औरंगजेबाने जी चूक केली ती  सुधारण्यासाठी आणि मशीद पाडून काशीतील मंदिराच्या पुर्नबांधणीसाठी 27 जुन 1742 मल्हारराव होळकर 20 हजार सैनिक घेऊन काशीत पोहोचले.  मात्र स्थानिक पुरोहितांनी विनंती केली की, आपण मशीद पाडून येथे पुर्नबांधणी केल्यानंतर पुन्हा एकदा औरंगेजेब आणि मुघल आमचा कतलेआम करतील  या भीतीने त्यांनी मल्हाररावांना थांबावले.  मल्हाररावांनी पुरोहितांच्या विनंतीला मान दिला आणि रिकाम्या हाताने परतले. दुसरा प्रयत्न अहिल्यादेवी होळकर यांनी जिर्णोद्धार करण्याचा दुसरा प्रयत्न केला केला. इतकंच काय तर महादजी शिंदे घराण्याच्या सुनबाई बैजाबाई शिंदे यांनी तेखे ज्ञानवापी मंडप बांधला.


संबंधित बातम्या :



Gyanvapi Mosque Case : वाराणसी कोर्टात महत्त्वाची घडामोड, कोर्ट कमिशनरला कोर्टाने हटवले


Gyanvapi Masjid: ज्ञानवापी प्रकरणी सुप्रीम कोर्टाचा मोठा आदेश; शिवलिंग सापडलेली जागा सुरक्षित ठेवावी, नमाज पठण करण्यास बंदी नाही