मुंबई : आगामी लोकसभेच्या निवडणुका (Loksabha Election) डोळ्यासमोर ठेवून सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. काँग्रेसनेही जागांची चाचपणी करायला सुरुवात केली. तर दुसरीकडे मात्र काँग्रेसपक्ष अंतर्गत खांद्येपालट सुरूच आहे.मुंबई अध्यक्ष बदलल्यानंतर आता प्रभारी बदलण्याची हालचाल सुरू आहे. त्याचं सोबत प्रदेश अध्यक्ष पद टिकवण्यासाठी आणि बदलण्यासाठी दोन्हीही बाजूने जोरदार हालचाली सुरू आहे आणि त्यासाठी पुन्हा एकदा नेत्यांच्या दिल्लीवारी सुरू झालेल्या आहेत. नानापटोले गेले दोन दिवसांपासून दिल्लीमध्ये ठाण मांडून आहेत. 


काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जरी हा दावा केला असला तरी मात्र अद्याप ही पक्षाअंतर्गत सुरु असलेलं शितयुद्ध संपलेल नाही. यासाठी काँग्रेस नेत्यांच्या दिल्लीवारी  सुरूच आहे. काही दिवसांपूर्वी अशोक चव्हाण यांनी दिल्लीतील गाठाभेटी घेतल्यानंतर आता पुन्हा एकदा  प्रदेशाध्यक्ष नाना पटोले दोन दिवसांपासून दिल्लीमध्ये ठाण मांडून आहेत. 


 नाना पटोले यांना अध्यक्षपदावरुन हटवावा यासाठी काँग्रेसच्या काही नेत्यांनी दिल्लीमध्ये जाऊन सूर लावला होता. त्यानंतर दोन दिवस स्वतः अशोक चव्हाण हे दिल्लीमध्ये ठाण मांडून बसलेले होते. त्यानंतर नाना पटवले यांचे काही समर्थक नसीम खान यांच्यासह दिल्लीमध्ये जाऊन त्यांनी नाना पटोले यांची बाजू लावून धरली आणि आता पुन्हा एकदा दोन दिवसापासून दिल्लीमध्ये नाना पटोले ठाण मांडून  बसलेले आहेत. 


नाना पटोले यांच्यासाठी कोणती कमकुवत आणि जमेची बाजू काय आहे?


नाना पटोले एकला चलोराच्या भूमिकेत आहेत म्हणून महाराष्ट्रातील काही नेते नानांच्या विरोधामध्ये आहेत. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, केसी वेणुगोपाल आणि प्रभारी एचके पाटील यांच्याशीफार सौख्य नाही. नाना पटोले यांचा आक्रमक आणि एकला चलो रे स्वभावामुळे महाविकास आघाडीतील नेतेही फार चांगले संबंध नाही. ही जरी नाना पटोले यांची कमकुवत बाजू असली तरी राहुल गांधीच्या नजरेत नाना पटोले यांची इमेज अद्याप वेगळी पाहायला मिळते.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाट असताना नेतृत्वावर टीका करत त्यांनी राजीनामा दिला होता.महाराष्ट्रात प्रदेशाध्यक्ष बनल्यानंतर विधानपरिषद आणि विधानसभा पोटनिवडणुकांमध्ये चांगलं यश मिळालं होतं. महाविकास आघाडीत एक आक्रमक चेहरा म्हणुन नाना पटोले  यांची प्रतिमा आहे. त्यामुळे जागा वाटपाच्या बार्गीनिंगमध्ये पक्षास त्याचा फायदा होईल प्रतिस्पर्धी असलेल्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष हे ओबीसी समाजाचे आहेत. त्यामुळे नाना पटोले हेहीओबीसी म्हणून आगामी निवडणुकीत फायदा होईल अशी धारणा आहे



नाना पटोले यांच्यासाठी या सर्व बाजू असल्या तरी राज्यातील सत्तांतराच्यावेळी  बहुमत चाचणीसाठी अशोक चव्हाण काही आमदारांची अनुपस्थिती यावरून हाय कमांड अशोक चव्हाणयांच्यावर नाराज आहेत. तर अशोक चव्हाण हे माजी मुख्यमंत्री आहेत. आणि उत्तम समन्वय ठेवतीलअशी त्यांची प्रतिमा आहे. 


या सर्व बाजूंचा विचार करून महाराष्ट्रातील काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष बदलायचा की नाही किंवा आणखीकाही पर्याय द्यायचा यावर काँग्रेसचे पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील. मात्र सध्यातरी अध्यक्षपदटिकवण्यासाठी नाना  पटोले आणि अध्यक्षपद मिळविण्यासाठी अशोक चव्हाण यांच्या वारंवारहोणाऱ्या दिल्लीवारी पाहायला मिळते. मात्र यावर अंतीम निर्णय आता राहूल गांधी घेणार असल्याचीमाहिती समोर येतेय.