Maharashtra News : आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. निवडणुकांच्या अनुषंगाने हळूहळू सर्वच पक्षांकडून उमेदवारांची नावे जाहीर करण्यात येत आहेत. तर महाविकास आघाडीतील (Maha Vikas Aghadi) जागावाटपाबाबतचा तिढा अद्याप कायम आहे. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये जागावाटप अद्याप जाहीर झालेला नसलं तरी काँग्रेस (Congress) पक्षाने राज्यातील 19 मतदारसंघात जोरदार तयारी सुरू केल्याचे चित्र आहे. मुंबईतील सहा मतदार संघ वगळून उर्वरित महाराष्ट्रातील 19 मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची विशेष बैठक उद्या म्हणजेच 5 मार्च रोजी मुंबईत बोलावली आहे. या बैठकीत काँग्रेसच्या वतीने आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महत्वपूर्ण चर्चा होणार असल्याचे बोलले जात आहे. 


राज्यातील 19 मतदारसंघासाठी काँग्रेसची जोरदार तयारी 


यात विदर्भातून नागपूर, रामटेक, चंद्रपूर, गडचिरोली,भंडारा-गोंदिया, अमरावती, अकोला, यवतमाळ-वाशीम या आठ मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांना बोलावण्यात आले आहे. या बैठकीत 19 मतदारसंघातील तयारीचा आढावा घेतला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच या 19 मतदार संघात विजय मिळवण्यासाठी आणखी काय करायला हवं, यासंदर्भात प्रदेश नेतृत्व या मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत विशेष मंथन करणार असल्याचे देखील बोलले जात आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या मतदारसंघातील सर्व जिल्हाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस, आजी-माजी आमदार तसेच विविध आघाड्यातील जिल्हा पातळीवरील अध्यक्ष यांना या बैठकीत बोलावण्यात आले आहे.


महाविकास आघाडीत जागावाटपावरून मतभेद कायम


महाविकास आघाडीतील जागांमध्ये 15 जागांवर मतभेद कायम असल्याची माहिती समोर येत आहे. कांग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात अजूनही 15 जागांवर सहमती नाही, असं माहिती आहे. 12-12-9 प्रमाणे तिन्ही पक्षांकडून जागावाटप पूर्ण झालं आहे, पण इतर 15 जागांबाबत अजून संभ्रम कायम आहे.


मविआची 15 जागांवर अजूनही सहमती नाही


महाविकास आघाडीत 33 जागांसंदर्भात वाटप पूर्ण झालं असून 15 जागांचा तिढा मात्र कायम आहे.10 जागांवर कांग्रेस विरुद्ध शिवसेना मतभेद तर उर्वरीत 5 जागांवर तिन्ही पक्षांकडून दावा करण्यात येत आहे. उद्धव ठाकरे, शरद पवार, प्रकाश आंबेडकर आणि कांग्रेस नेत्यांच्या 5 किंवा 6 मार्च रोजी होणाऱ्या बैठकीत अंतिम फाॅर्म्युल्यावर शिक्कामोर्तब होणार आहे.


मविआची संभाव्य उमेदवारांची यादी


लोकसभेसाठी मविआची संभाव्य उमेदवारांची यादी समोर आली आहे. शरद पवार गटाकडून एकनाथ खडसे, कोल्हेंना संधी मिळण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाकडून चंद्रकांत खैरे, अमोल कीर्तीकरांना संधी मिळण्याची शक्यता आहे. तर शरद पवार गटाकडून एकनाथ खडसे, कोल्हेंना संधी मिळण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे. काँग्रेसकडून नाना पटोले, रविंद्र धनगेकरांना संधी मिळण्याचं बोललं जात आहे.


तर महत्वाच्या बातम्या 


CM Eknath Shinde : नेहमी गंभीर असणारे मोदी तुमच्यासोबत हसत-खेळत कसे दिसतात? मुख्यमंत्री शिंदेंनी केमिस्ट्री सांगितली