Nana Patole : जी व्यवस्था देशाला उद्धवस्थ करत आहे, त्या व्यवस्थेला बाजूला करण्याची काँग्रेसची भूमिका असल्याचे मत पक्षाचे (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी व्यक्त केलं. सध्या जागावाटपाचा विषय नसून भाजपला सत्तेच्या बाहेर कसं करायचं हा विषय महत्वाचा असल्याचे पटोले म्हणाले. लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने जागा वाटपाबाबत कोणत्याही प्रकारचा निर्णय झाला नसल्याचे पटोले म्हणाले. नाना पटोलेंनी एबीपी माझाला (ABP Majha) मुलाखत दिली. त्यावेळी ते बोलत होते. 


भाजप महाराष्ट्रात आणि देशात असं वागत आहे की, आम्ही अमरपट्टा घेऊन आलो आहोत. पण चुकीचं आहे. लोकशाहीत अनेक चमत्कार होतात. दिवंगत इंदिरा गांधी, अटलबिहारी वाजपेयी यांचाही पराभव झाला होता. कसब्यामध्येही भाजप निवडून येईल असा दावा करत होता. पण त्याठिकाणी आमचा उमेदवार निवडून आल्याचे पटोले म्हणाले. 


प्रकाश आंबेडकरांचा अद्याप प्रस्ताव आला नाही


भाजपच्या विरोधात प्रामाणिकपणे जे असतील त्यांना सोबत घेण्याची आमची भूमिका आहे. वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांचा प्रस्ताव अद्याप आला नाही. त्यांचे नेमके मत काय आहे, हे समजल्याशिवाय आम्ही त्यांचीशी बोलणार नाही. आम्ही त्यांना कोणताही प्रस्ताव दिला नसल्याचे पटोले म्हणाले. कारण मागचा आमचा अनुभव मोठा असल्याचे पटोले म्हणाले. पुढच्या काळात कुठेही धोका होता कामा नये याची काळजी आम्ही घेत आहोत. कारण जनतेचा राग हा सत्तेत बसलेल्या लोकांच्या विरोधात आहे. त्या रागाला एकजूट करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे पटोले म्हणाले. 


महाराष्ट्रातही जुनी पेन्शन लागू व्हावी 


काँग्रसेच्या ताब्यात असणाऱ्या हिमाचल प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड या राज्यामध्ये आम्ही जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. कर्नाटक निवडणुकीच्या जाहीरनाम्यातही आम्ही जुन्या पेन्शनच्या योजनेचा उल्लेख करणार असल्याचे नाना पटोले म्हणाले. महाराष्ट्रातही जुनी पेन्शन लागू व्हावी हीच आमची भूमिका आहे. मूठभर लोकांचे कर्ज माफ करण्यासाठी सरकारजवळ पैसा आहे. जनतेची तिजोरी त्यांना लूटून द्यायची. मग शेतकरी, कर्मचारी, गरिब माणसासाठी या सत्तेत वाटा राहणार नाही का? असा सवाल नाना पटोलेंनी उपस्थित केला.      


झालं ते झालं, आता पुढं कसं जायंच यावर चर्चा होणं गरजेचं  


महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी मला विधानसभा अध्यक्ष होण्याची संधी दिली. 11 महिने त्या पदावर मी काम केलं. पण त्यानंतर पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसाठी मला त्यांनी पुढे येण्यास सांगितले. त्यामुळे विधानसभा अध्यक्षपद पद सोडून मला हे पद स्वीकारण्यास पटोलेंनी सांगितले. मला अध्यक्ष जे विधानसभा अध्यक्ष म्हणून अधिकार होते, तेच अधिकार उपाध्यक्षांनाही होते. त्याचा वापर का केला नाही? असा सवाल पटोलेंनी उपस्थित केला. पण ज्या गोष्टी आता झाल्या आहेत, त्यावर चर्चा करण्यापेक्षा आता पुढं कसं जाता येईल यावर चर्चा होणं गरजेचं असल्याचे पटोले यावेळी म्हणाले.


महत्त्वाच्या बातम्या:


Nana Patole : सत्तेत आलो तर जुनी पेन्शन योजना लागू करणार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचं आश्वासन