Nana Patole : आम्ही सत्तेत आलो तर जुनी पेन्शन योजना (Old Pension Scheme) लागू करणार असल्याचे आश्वासन काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केलं. नाना पटोले यांनी एबीपी माझाला (ABP Majha) मुलाखत दिली. त्यावेळी ते बोलत होते. काँग्रसेच्या ताब्यात असणाऱ्या हिमाचल प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड या राज्यामध्ये आम्ही जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं महाराष्ट्रातही जुनी पेन्शन योजना लागू व्हावी असे पटोले म्हणाले. दरम्यान, भाजपला (BJP) दूर ठेवण्यासाठी एकला चलो रे ची भूमिका सोडल्याचा पुनरुच्चार देखील नाना पटोलेंनी केला.
भाजपविरोधातील सर्व लोकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न
महाराष्ट्रातूनच महात्मा गांधींनी इंग्रजांना 'चले जाओ'चा नारा दिला आहे. या राज्यात शाहू, फुले, आंबेडकरांची विचारधारा आहे. जेव्हा जेव्हा देशावर संकट येत त्यावेळी हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावून गेल्याचे आपण सांगतो. आता देशावर संकट आलं आहे, अशा परिस्थिती देशावर संकट आणणाऱ्या व्यवस्थेविरोधात सगळ्यांची मोट बांधण्याची काँग्रेसची भूमिका असल्याचे नाना पटोले म्हणाले. कालच्या बैठकीत महाविकास आघाडीच्या वतीने मोठ्या सभा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भाजपकडून ज्याप्रकारे सत्तेचा गैरवापर सुरु आहे. याप्रकाराला थांबवलं पाहिजे. त्याविरोधात आवाज उठवला जाणार असल्याचे पटोले म्हणाले.
महाराष्ट्रात अंसतोष
सध्या सरकारी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. राज्यात अंसतोष आहे. अर्थसंकल्पात 75 हजार नोकर भरतीची घोषणा करु असे सांगितले. पण सहा कंपन्यांना नोकर भरती करण्याचे कॉन्ट्रॅक्ट दिल्याचे नाना पटोले म्हणाले. काँग्रेसने सगळ्यांना सोबत घेण्याचे काम आतापर्यंत केलं आहे. देशासाठी काँग्रेसने समर्पण केल्याचे पटोले म्हणाले. भाजपविरोधात जे कोणी असतील ते सर्वच लोक महाराष्ट्रात एकत्र घेऊ. आमचं तळ्यात-मळ्यात अशी भूमिका नसल्याचे नाना पटोले म्हणाले. देशाची संविधान व्यवस्था वाचली पाहिजे त्यासाठी आमचा पुढकार असल्याचं पटोले म्हणाले.
जागा वाटपाबाबत कोणत्याही प्रकारचा निर्णय झाला नाही
येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने जागा वाटपाबाबत कोणत्याही प्रकारचा निर्णय झाला नाही. ही सगळी हवा आहे. एक ते दोन दिवसामध्ये मी दिल्लीला जाणार आहे. या सगळ्या गोष्टीवरील चर्चा मी काँग्रेस नेतृत्वाशी करणार आहे. त्यानंतर महाराष्ट्रातील मित्रपक्षांशी चर्चा करणार असल्याचं पटोलेंनी सांगितलं. आता मात्र, जागा वाटपाबाबत कोणताही चर्चा झाली नसल्याचं पटोलेंनी सांगितलं. सध्या सुरु असलेल्या वातावरणात काँग्रेस हाच एक पर्याय असल्याची लोकांची भावना झाली आहे. महाराष्ट्र हा नेहमी काँग्रेसच्या विचारांचा राहिला आहे. आमचे मित्रपक्ष देखील म्हणाले आहेत की, काँग्रेसशिवाय पर्याय नाही असे पटोले म्हणाले. त्यामुळे आम्ही सर्वांचा सन्मान ठेवून पुढे जाऊ असे पटोले म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या:
Old Pension Strike : जुन्या पेन्शन योजने संदर्भात स्थापन केलेली अभ्यास समिती सरकारी कर्मचारी संघटनांना मान्य नाही : विश्वास काटकर