एक्स्प्लोर

प्रत्येक जिल्ह्यात दिव्यांग भवन उभारणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती

Eknath Shinde : सर्व जिल्हा परिषदा, महानगरपालिका आणि स्थानिक आमदार निधी यांच्या अर्थसहाय्याने हे दिव्यांग भवन बांधण्यात येणार अशी माहिती यावेळी शिंदे यांनी दिली.

Eknath Shinde : गाव-खेड्यांमधील दिव्यांगांना शासकीय योजनांचा लाभ त्वरित मिळण्यासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये दिव्यांग भवन तथा जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र उभारण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. सर्व जिल्हा परिषदा, महानगरपालिका आणि स्थानिक आमदार निधी यांच्या अर्थसहाय्याने हे दिव्यांग भवन बांधण्यात येणार असून त्याचा सर्वंकष आराखडा तयार करुन तो मंत्रिमंडळासमोर मान्यतेसाठी ठेवण्याच्या सूचनाही यावेळी त्यांनी दिल्या आहेत. दिव्यांगांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभाग निर्माण करण्यात येणार असल्याचेही यावेळी शिंदे यांनी सांगितलं.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आयोजित बैठकीत दिव्यांगांच्या विविध प्रश्नांवर महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यावेळी ते बोलत होते. 

राज्यात सध्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अखत्यारित दिव्यांग कल्याण आयुक्तालय कार्यरत असून त्यामाध्यमातून दिव्यांगांसाठीच्या विविध कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करण्यात येते, सध्या दिव्यांगांच्या कार्यक्रम खर्चासाठी 1130 कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पित केली आहे. लवकरच राज्यात स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभाग निर्माण करण्यात येणार आहे. या प्रस्तावित विभागासाठी मनुष्यबळ, साधनसामुग्री आणि इतर बाबींचा सविस्तर प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. 

दिव्यांगांच्या शिष्यवृत्तीमध्ये होणार वाढ
दिव्यांग विद्यार्थ्यांना देण्यात येणारी शिष्यवृत्तीची रक्कम ही कमी असून ती मागासवर्गीय विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती इतकी करण्यात येईल, त्यासाठी विभागाने प्रस्ताव तयार करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिले. 

घरोघरी जाऊन दिव्यांगांचे सर्वेक्षण करणार
अकोला आणि ठाण्याच्या धर्तीवर घरोघरी जाऊन दिव्यांगांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या सर्वेक्षणामुळे दिव्यांगांची माहिती संकलित होऊन त्यांना योजनांचा लाभ देणे सुलभ होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 

दिव्यांगांचे वैश्विक ओळखपत्र परिवहन विभागाने ग्राह्य धरावे
एसटी बस आणि बेस्ट बसमधून प्रवास करीत असताना दिव्यांगांसाठी दिलेले वैश्विक ओळखपत्र ग्राह्य धरले जात नसल्याने दिव्यांगांना अडचणींचा सामना करावा लागतो, त्यांची ही अडचण दूर करण्यासाठी दिव्यांगाचे वैश्विक ओळखपत्र एसटी आणि बेस्ट बसने ग्राह्य धरण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी परिवहन विभागाचे प्रधान सचिव पराग जैन-नैनुतिया यांना दूरध्वनीवरुन दिले. परिवहन महामंडळाच्या बसमधून प्रवास करतांना दिव्यांगांसोबतच्या व्यक्तींना ५० टक्के सवलत देण्यात येते, त्या सवलतीची अंमलबजावणी करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.  खाजगी क्षेत्रांमध्ये दिव्यांगांना नोकरीत आरक्षण देण्यासाठी नियुक्त समितीने दिव्यांगांयोग्य नोकऱ्यांचे वर्गीकरण करण्याच्या सूचना देतानाच वसतीगृहात निवासाची सुविधा न मिळालेल्या विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेचा लाभ देण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री शिंदे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदके मिळविणाऱ्या दिव्यांग खेळाडूंना थेट नोकरी देण्याच्या प्रस्तावावर मुख्य सचिवांनी कार्यवाही करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. 

महत्त्वाच्या बातम्या

देवाभाऊंनी देशाचं नेतृत्व करावं, आषाढीला आपण पांडुरंगाला साकडं घालू; दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य
देवाभाऊंनी देशाचं नेतृत्व करावं, आषाढीला आपण पांडुरंगाला साकडं घालू; दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य
Devendra Fadnavis on Farmers: देवाभाऊंची मोठी घोषणा, शेतकऱ्यांची वीजबिलाची पाटी कोरी केली, थकित वीजबिल माफ
देवाभाऊंची मोठी घोषणा, शेतकऱ्यांची वीजबिलाची पाटी कोरी केली, थकित वीजबिल माफ
Raju Shetti : कर्जमाफीआधीच मुख्यमंत्र्यांचा सत्कार; राजू शेट्टी म्हणाले, स्वतःची पाठ स्वतः थोपटून घेण्याचा प्रकार, कर्जमाफीच्या अंमलबजावणीवरून सरकारला दिला अल्टिमेटम
कर्जमाफीआधीच मुख्यमंत्र्यांचा सत्कार; राजू शेट्टी म्हणाले, स्वतःची पाठ स्वतः थोपटून घेण्याचा प्रकार, कर्जमाफीच्या अंमलबजावणीवरून सरकारला दिला अल्टिमेटम
विलासरावांचा पुढाकार, मनमोहनसिंगाची धडपड; सोनम वांगचूकांची तब्येत खालवताच राजू शेट्टींना अण्णा आंदोलनाची आठवण
विलासरावांचा पुढाकार, मनमोहनसिंगाची धडपड; सोनम वांगचूकांची तब्येत खालवताच राजू शेट्टींना अण्णा आंदोलनाची आठवण

व्हिडीओ

Sachin Ahir UNCUT Speech : वरळीकरांकडून जंगी सत्कार, ठाकरे पिता-पुत्रांवर टीका, सचिन अहिरांचं भाषण!
Uddhav Thackeray Nagpur Ramraksha Andolan : नागपुरात रामरक्षा आंदोलनाची नवी कक्षा Special Report
Zero Hour Full : राष्ट्रवादीतील अंतर्गत कलह ते नागपुरात रामरक्षा आंदोलन, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
Eknath Shinde Delhi Visit to Meet Amit Shah : दिल्लीवारीचं कारण विस्तार की राजकारण? Special Report
Praful Patel On Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना पक्षातूनच चॅलेंज, थेट नोटीसही पाठवली; आता प्रफुल पटेल यांची पहिली प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raju Shetti : कर्जमाफीआधीच मुख्यमंत्र्यांचा सत्कार; राजू शेट्टी म्हणाले, स्वतःची पाठ स्वतः थोपटून घेण्याचा प्रकार, कर्जमाफीच्या अंमलबजावणीवरून सरकारला दिला अल्टिमेटम
कर्जमाफीआधीच मुख्यमंत्र्यांचा सत्कार; राजू शेट्टी म्हणाले, स्वतःची पाठ स्वतः थोपटून घेण्याचा प्रकार, कर्जमाफीच्या अंमलबजावणीवरून सरकारला दिला अल्टिमेटम
देवाभाऊंनी देशाचं नेतृत्व करावं, आषाढीला आपण पांडुरंगाला साकडं घालू; दत्तात्रय भरणेचं मोठं वक्तव्य
देवाभाऊंनी देशाचं नेतृत्व करावं, आषाढीला आपण पांडुरंगाला साकडं घालू; दत्तात्रय भरणेचं मोठं वक्तव्य
विलासरावांचा पुढाकार, मनमोहनसिंगाची धडपड; सोनम वांगचूकांची तब्येत खालवताच राजू शेट्टींना अण्णा आंदोलनाची आठवण
विलासरावांचा पुढाकार, मनमोहनसिंगाची धडपड; सोनम वांगचूकांची तब्येत खालवताच राजू शेट्टींना अण्णा आंदोलनाची आठवण
Supriya Sule on NCP: राष्ट्रवादी काँग्रेस मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला पाठिंबा देणार असल्याच्या बातम्या निराधार, आमच्याकडे कोणतीही डील आलेली नाही: सुप्रिया सुळे
राष्ट्रवादी काँग्रेसकडून मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला पाठिंबा देण्याच्या बातम्या निराधार, आमच्याकडे कोणतीही डील आलेली नाही: सुप्रिया सुळे
Dhule News: रक्ताच्या पिशव्या येण्यापूर्वीच प्रुसतीसाठी ऑपरेशन टेबलवर घेतलं, धुळ्यातील रुग्णालयात डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू
रक्ताच्या पिशव्या येण्यापूर्वीच प्रुसतीसाठी ऑपरेशन टेबलवर घेतलं, धुळ्यातील रुग्णालयात डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू
Shiv Puran: मृत्यूपूर्वी मनुष्याला मिळतात 'हे' 10 संकेत, शिवपुराणातील असे वर्णन, जे कलियुगातही लोकांना आश्चर्यचकित करते, जाणून घ्या...
मृत्यूपूर्वी मनुष्याला मिळतात 'हे' 10 संकेत, शिवपुराणातील असे वर्णन, जे कलियुगातही लोकांना आश्चर्यचकित करते, जाणून घ्या...
Railway Ticket Booking IRCTC : रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा! तिकीट बुकिंगमधील कॅप्चा कोडची कटकट संपणार; IRCTC संकेतस्थळात महत्त्वाचे बदल
रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा! तिकीट बुकिंगमधील कॅप्चा कोडची कटकट संपणार; IRCTC संकेतस्थळात महत्त्वाचे बदल
Tukaram Mundhe News: तुम्ही जेव्हा बाहेर जातात, तेव्हा कोणतं फूड खाता, तुमचं आवडतं खाणं काय?, तुकाराम मुंढे म्हणाले...
तुम्ही जेव्हा बाहेर जातात, तेव्हा कोणतं फूड खाता, तुमचं आवडतं खाणं काय?, तुकाराम मुंढे म्हणाले...
Embed widget