Eknath Shinde and Devendra Fadnavis Delhi Visit : महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आजपासून दिल्ली दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पहिल्यांदाच दिल्ली दौऱ्यावर आहेत. यावेळी ते पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि गृहमंत्री गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेणार आहेत. हा दिल्ली दौरा दोन दिवसांचा असणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दिल्लीत एक दिवस मुक्काम असेल. दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी ते संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेतील. त्यानंतर ते दिल्लीहून थेट पुण्याला पोहोतील. पुण्याहून मुख्यमंत्री पंढरपूरला जाणार आहेत. तेथे त्यांच्या हस्ते आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल-रखुमाईची पूजा होईल. त्यानंतर ते मुंबईला परतील.
गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकाळी मंत्रालयात आपल्या दालनात प्रवेश करत कामकाजाला सुरूवात केली. शपथविधीनंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी तातडीने कामकाजाला सुरुवात केली होती. परंतु, गुरुवारी प्रथमच मुख्यमंत्री राज्याचे प्रशासकीय मुख्यालय असलेल्या मंत्रालयातील आपल्या दालनात दाखल झाले. मुख्यमंत्र्या स्वागतासाठी मंत्रालयाच्या दालनाला आकर्षक सजावट करण्यात आली होती. त्यानंतर रितसर पूजा पार पडल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी कामकाजास सुरुवात केली.
मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर विधिमंडळातील पहिल्याच भाषणात एकनाथ शिंदे यांनी आपल्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचा पूर्ण पाठिंबा असल्याचे सांगितले होते. पर्वतासारखे आम्ही तुमच्या पाठिशी आहोत, असे अमित शाह यांनी सांगितल्याचे एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले होते. त्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह या दोघांची भेट घेणार आहेत. त्यामुळे या भेटीकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या
- Ashok Chavan : शिंदे सरकारने स्वतःची प्रतिमा "स्थगिती सरकार अशी होऊ देऊ नये, अशोक चव्हाणांचा निशाणा
- Car Insurance : आता विसरा कारचा महागडा विमा, फक्त बचत होणार, जाणून घ्या IRDAI चे 'हे' नवे नियम
- Sugar Exports : साखर निर्यातीबाबत कारखानदारांना दिलासा, 8 लाख मे टन निर्यातीला मुदतवाढ, केंद्र सरकारचा मोठा निर्णय