Dhananjay Munde Cricket : भारतामध्ये अनेकांना क्रिकेटची प्रचंड आवड आहे. लहान-थोरांपासून राजकारणी, सेलेब्रिटी आणि व्यावसायिकही अनकेदा क्रिकेट खेळताना पाहिले आहे. क्रिकेट सामना पाहण्यासाठी अनेकदा कलाकार आणि राजकीय मंडळींनी उपस्थिती दर्शवल्याचे पाहिले आहे. अनेक राजकीय नेते क्रिकेटच्या मैदानावरही दिसले आहेत. त्यांचे व्हिडीओ अनेकदा व्हायरल झाले आहेत. आता राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांचा क्रिकेट खेळतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.


राज्याचे सामाजिक न्याय मंत्री आणि बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांचा फलंदाजी करताना व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चाचा विषय आहे. धनंजय मुंडे यांनी चौफेर फटकेबाजी केली आहे. पण अवघ्या 11 धावानंतर ते क्लीन बोल्ड झाले. राजकीय मैदानात चौकार-षटकार मारणारे धनंजय मुंडे यांनी प्रत्यक्ष मैदानात उतरून फलंदाजी केली. धनंजय मुंडे यांनी दोन चौकारासह अकरा धावा चोपल्या. त्यानंतर ते क्लीन बोल्ड झालेय 


पाहा व्हिडिओ ...



कैलासवासी पंडित अण्णा मुंडे यांच्या स्मृति प्रित्यर्थ परळीत सरपंच प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. परळी शहरातील तहसील कार्यालयासमोरील मैदानावर ही स्पर्धा सध्या सुरू आहे. या स्पर्धेवेळी धनंजय मुंडे यांनी हजेरी लावली होती. धनंजय मुंडे यांना यावेळी फलंदाजी करण्याचा मोह आवरला नाही. धनंजय मुंडे फलंदाजीसाठी मैदानात उतरले. त्यांनी दोन खणखणीत चौकार लगावले. पण त्यानंतर ते क्लीन बोल्ड झाले. 


परळी शहरामध्ये आयोजित केलेल्या सरपंच प्रीमियर क्रिकेट लीगच्या उपांत्य फेरीचा शनिवारी सामना होता. त्यावेळी धनंजय मुंडे यांनी हजेरी लावली. फक्त हजेरीच लावली नाही तर स्वतः बॅट घेऊन मैदानात उतरले. धनंजय मुंडे यांनी यावेळी सात चेंडूचा सामना केला. यामध्ये दोन वेळा चेंडूला सीमारेषाबाहेर लावले. धनंजय मुंडे यांनी 11 धावा केल्या. पण त्याचवेळी एका यॉर्कर चेंडूवर ते क्लीन बोल्ड झाले.  धनंजय मुंडे फलंदाजी करत असताना उपस्थित प्रेक्षकांनी दाद दिली. दोन चौकार लगावल्यानंतर उपस्थित असणाऱ्या प्रेक्षकांनी टाळ्या वाजवत दाद दिली.