Mumbai University :  एबीपी माझानं ऑनलाइन परीक्षेत कॉपीबहाद्दरांचा पंचनामा केल्यानंतर आता मुंबई विद्यापीठानं एक मोठा निर्णय घेतला आहे. मुंबई विद्यापीठ आता टप्प्याटप्प्यानं ऑनलाईन परीक्षांचा (Online Exam Scam) पर्याय थांबवणार आहे. आता टप्प्या-टप्प्याने आम्ही ऑनलाईन परीक्षा बंद करून ऑफलाईन परीक्षेकडे जात आहोत अशी प्रतिक्रिया मुंबई विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. विनोद पाटील यांनी दिली आहे. आणखी काय म्हणाले पाटील?


ऑनलाइन परीक्षांचा पर्याय टप्प्याटप्प्याने थांबणार 


मुंबई विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ विनोद पाटील म्हणाले, ऑनलाइन परीक्षा मध्ये कॉपी होते हे प्रकरण गंभीर असून याची कल्पना शिक्षकांना असली तरी घरी विद्यार्थी सहजपणे कॉपी करू शकतात आणि तंत्रज्ञानाचा दुरुपयोग करत आहेत. त्यामुळे नाईलाजास्तव सरसकट नाही तर टप्प्याटप्प्याने ऑनलाइन परीक्षांचा पर्याय आता थांबवण्याचा विचार विद्यापीठ करत आहे. मुंबई विद्यापीठाच्या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या ( इंजीनियरिंग, फार्मसी, लॉ, एमबीए, एमसीए यांसारखे अभ्यासक्रम) परीक्षा पुढील सेमिस्टर पासून पूर्णपणे ऑफलाइन होणार आहे, त्यासाठीचे नियोजन विद्यापीठ करत आहे. टप्प्या-टप्प्याने आम्ही ऑनलाईन परीक्षा बंद करून ऑफलाईन परीक्षेकडे जात आहोत.


कॉपीला बसणार आळा


मुंबई विद्यापीठाचे व्यावसायिक अभ्यासक्रम अर्थात इंजीनियरिंग, फार्मसी, लॉ, एमबीए यांच्या  परीक्षा पुढील सेमिस्टर पासून पूर्णपणे ऑफलाइन करण्यासाठी विद्यापीठाचं नियोजन सुरू आहे. ऑनलाइन परीक्षा मध्ये कॉपी होते हे प्रकरण गंभीर असून याची कल्पना शिक्षकांना असली तरी घरी विद्यार्थी सहजपणे कॉपी करू शकतात आणि तंत्रज्ञानाचा दुरुपयोग करता त्याला आळा घालण्यासाठी आता मुंबई विद्यापीठानं (Mumbai University) पावलं उचलायला सुरुवात केली आहे.


कॉपीबहाद्दरांकडून व्हॉट्सअॅप ग्रुपवर बातमीविरोधात मोहीम 


एबीपी माझानं ऑनलाईन परीक्षेत होणाऱ्या कॉपीचा पर्दाफाश केल्यानंतर, या कॉपीबहाद्दरांनी व्हॉट्सअॅप ग्रुपवर एबीपी माझाच्या बातमीविरोधात मोहीम सुरु केली आहे. ही बातमी ब्लॉक करण्यासाठी आपल्या ग्रुप मेंबर्सना चिथावू लागले. एबीपी माझानं केलेल्या बातमीचा व्हिडीओ यूट्यूबवर रिपोर्ट करण्याचं आवाहन ग्रुपमधील काही लोक करत आहेत. जेणेकरुन व्हिडीओ ब्ल़ॉक झाल्यानंतर कमीत कमी लोकांपर्यंत जाईल असं असे मेसेज देखील ग्रुपवर केले जात आहेत. एबीपी माझाकडे या ग्रुपमधील काही स्क्रिनशॉट आले आहेत. 


ऑनलाइन परीक्षांमध्ये सर्रास कॉपी होत असल्याचा प्रकार उघडकीस


मागील दोन वर्षांपासून विद्यापीठ, महाविद्यालयात ऑनलाइन परीक्षा होत आहेत. मात्र, या परीक्षांमध्ये मिळणारे गुण कितपत ग्राह्य धरायचे हा प्रश्न उपस्थित झाला आहे. कारण, पदवी पदव्युत्तर ऑनलाइन परीक्षांमध्ये सर्रास कॉपी होत असल्याचा प्रकार उघडकीस आणला. एबीपी माझाने कॉपी बहाद्दरांचा पर्दाफाश केला होता. इंजिनिअरिंग असो किंवा मग लॉ चा पेपर, बीकॉम असूद्यात किंवा बीएससी जवळपास सर्वच अभ्यासक्रमांमध्ये पैसे मोजून ऑनलाईन परीक्षामध्ये कॉपीबहाद्दर कॉपी करून चांगल्या गुणांनी पास होत आहेत. एबीपी माझाच्या टीमला ऑनलाईन पेपरमध्ये कॉपी होत असल्याच्या तक्रारीचा कॉल आला होता.  विद्यार्थ्यांना कॉपी करण्यासाठी आणि पास करण्यासाठी काही विद्यार्थी पैसे सुद्धा घेत असल्याचं या कॉलमधून समजले. यानंतर एबीपी माझानं नेमका या परीक्षांमध्ये ऑनलाइन कॉपीचा प्रकार कसा घडतो ? हे उघडकीस आणले.


संबंधित बातम्या:


ABP Majha Impact : ऑनलाईन परीक्षेत कॉपीसाठी मदत करणाऱ्यांवर कारवाई करणार, उदय सामंतांची माहिती


ऑनलाईन परीक्षेतील कॉपी बहाद्दरांचा 'एबीपी माझा'कडून पंचनामा, विद्यार्थ्यांनी पैसे मोजून ऑनलाईन उत्तर मिळवल्याचं उघड


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha