Ramesh Bornare: औरंगाबादच्या (Aurangabad) वैजापूर (Vaijapur) येथील शिवसेना आमदार रमेश बोरणारे यांच्याविरोधात वैजापूर पोलीस ठाण्यात (Vaijapur Police Station) गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यांच्यावर एका महिलेला मारहाण केल्याचा आरोप आहे.संबंधित महिला रमेश बोरणारे यांची भाऊजय असल्याची माहिती समोर येत आहे. भाजपच्या कार्यक्रमाला गेल्याचा राग मनात ठेवून रमेश बोरणारे यांनी त्यांच्या भाऊजयला मारहाण केल्याचं सांगितलं जातंय.
संबंधित महिला केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांच्या कार्यक्रमाला गेल्या होत्या. यामुळं रमेश बोरणारे रमेश बोरणारे त्यांची पत्नी भाऊ आणि इतर नातेवाईकांना त्यांना मारहाण केल्याचं तक्रातीर म्हटलंय. याप्रकरणी वैजापूर पोलिसांनी रमेश बोरणारे यांच्यासह 9 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. आमदाराच्या पीए यांनी भांडण सोडत असताना आपल्या जातीवाचक शिवीगाळ केली म्हणून महिलेविरोधात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केलाय.
चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया-
सदर घटनेनंतर चित्रा वाघ यांनी ट्वीटरच्या माध्यमातून शिवसेनेवर टीका केलीय. शिवरायांच्या महाराष्ट्रात वैजापूरचा शिवसेना आमदार रमेश बोरणारे यांनी भाजपच्या कार्यक्रमाला का गेली? असं म्हणत महिलेला बेदम मारहाण केली. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. परंतु, कोणतीही कारवाई झाली नाही.उलट पिडीतेवरचं ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. यावर महिलाधोरणकर्ते काही बोलणार का ? अजून किती बलात्कारी व महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना वाचवणार आहात? असा प्रश्न उपस्थित करत चित्रा वाघ यांनी सीएमओला टॅग केलंय. महाराज असते तर या सरकारचा कडेलोट केला असता.हे सरकार गोरगरीबांचं धार्जीणं नाही तर सरकारचे कलाकारी मंत्री आमदार खासदार व त्यांच्या बगलबच्चे धार्जीणं आहे, अशा शब्दात त्यांनी ठाकरे सरकारवर टीका केलीय.
चित्रा वाघ यांचं ट्वीट-
या प्रकारानंतर एबीपी माझाच्या प्रतिनिधींनी रमेश बोरणारे यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांनी कॅमेऱ्यासमोर बोलायला नकार दिला. तसेच हे आमचं घरगुती प्रकरणी असल्यांचं त्यांनी एबीपी माझाशी फोनवर बोलताना सांगितलंय. राज्यात शिवसेना आणि भाजपचा सध्या राडा सुरू आहे. त्यात आता या नव्या प्रकाराची भर पडली आहे. या प्रकारामुळं स्थानिक राजकारण तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हे देखील वाचा-
- Sanjay Raut on ED: केंद्रीय यंत्रणांची कार्यालये खंडणीखोर; पुढील आठवड्यात ईडीचा मोठा घोटाळा काढणार; संजय राऊत यांचा इशारा
- लाव रे तो व्हिडीओ! राऊतांचा राणेंवर हल्लाबोल; 'फडणवीसांनी राणेंवर केलेल्या आरोपांची चौकशी करा'
- Kolhapur Airport: 'कोल्हापूर विमानतळाचे 'महालक्ष्मी' नाहीतर 'छत्रपती राजाराम महाराज विमानतळ' असेच नामकरण' : भागवत कराड
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha