Maharashtra Cabinet Expansion: राज्यातला मंत्रिमंडळ (Maharashtra Cabinet) विस्तार का रखडला याची माहिती आता समोर येऊ लागली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्याशी चर्चा झाल्यानंतरच मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती मिळतेय. अमित शाह आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यात याबाबत अजूनही चर्चा झाली नसल्यानं विस्तार रखडल्याची माहिती मिळाली आहे. विस्ताराबाबत अंतिम निर्णय अमित शाह घेणार असल्यानं त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतरच विस्ताराचा मुहूर्त ठरणार आहे.
चर्चेसाठी अमित शाह आणि एकनाश शिंदेच
मंत्रिमंडळाचा अंतिम निर्णय हा अमित शाह घेणार आहेत. पण अजून अमित शाह यांच्यासोबत शिंदे यांची चर्चा अजूनही झालेली नाही, म्हणून मंत्री मंडळ विस्तार रखडला असल्याची माहिती आहे. या चर्चेसाठी अमित शाह आणि एकनाश शिंदेच फक्त बसणार आहेत. या बैठकीला देवेंद्र फडणवीस देखील नसणार अशी माहिती आहे. भाजपकडे स्वतःचे आणि अपक्ष असे 115 आमदार आहेत. शिंदे यांच्याकडे शिवसेना आणि अपक्ष असे 50 आमदार आहेत. शिंदे सोबत जे मोठे नेते आलेले आहेत त्यांना मंत्री करावेच लागणार आहे. तसेच शिंदे यांना प्रादेशिक समतोल बघावा लागणार आहे. आलेले लोक शिवसेनेत डावलले जाते म्हणून आलेत, त्यामुळे सर्वांची अपेक्षा मोठी आहे. एकूण 42 मंत्री असावे लागतात त्यापैकी 2 म्हणजे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री झाले आहेत, आता राहिले 40. आता या 40 मध्ये 50 लोकांचे पारडे जड की 115 चे ही कसरत आहे. यांचा अंतिम निर्णय अमित शाह घेणार असल्याचं कळतंय. पण अजून अमित शाह यांच्यासोबत चर्चा अजूनही झालेली नाही, म्हणून मंत्रिमंडळ विस्तार रखडला असल्याचं बोललं जात आहे.
उद्धव ठाकरे यांची विधान परिषदची जागा कोणाकडे जाणार?
मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आपल्या विधान परिषद सदस्यत्वाचा देखील राजीनामा दिला होता. आता उद्धव ठाकरे यांची रिक्त झालेली विधान परिषदची जागा कोणाकडे जाणार? असाही सवाल आहे. विधान परिषदेतील कुणी मंत्री करणार का? असाही सवाल आहे. मग रामदास कदम यांना विधान परिषद आणि मंत्री पद मिळणार का? असं बोललं जात असलं तरी जर ते झाले तर त्याला विरोध होण्याची शक्यता आहे. कारण मागील वेळेस असंच झाला होता, विधान परिषदेतील दिवाकर रावते, सुभाष देसाई, रामदास कदम यांना मंत्री पद दिल्याने विधानसभेतील आमदार नाराज होते. त्यामुळे रामदास कदम यांना जर मंत्री पद मिळाले तर या बंडखोर आमदारांची भूमिका काय असेल? असाही सवाल आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
Maharashtra Cabinet Expansion : राज्यात मंत्रिमंडळाचा विस्तार लांबणीवर? शिंदेंचा दिल्ली दौरा रद्द