बुलढाणा : वस्तू व सेवा कर....अर्थात GST .....कर चोरी रोखण्यासाठी केंद्र सरकारने संपूर्ण देशात एकच कायदा आणला खरा मात्र यातही काही व्यापारी शासनाची दिशाभूल करून कोट्यावधी रुपयांचा कर बुडवत असल्याची घटना खामगाव औद्योगिक क्षेत्रातील देवकी अॅग्रो इंडस्ट्रीजमध्ये घडली आहे. या एकाच फर्मने फक्त जून 2017 ते मार्च 2018 या नऊ महिन्यांच्या तपासणीत शासनाचा जवळपास 1 कोटी 78  लाखांचा जीएसटी बुडविल्याच उघड झालं आहे. तहसीलदारांचे बनावट प्रतिज्ञापत्र बनवून  ते सादर करून हा कर चोरण्यात आला. आहे.


याप्रकरणी वस्तू व सेवाकर विभागाच्या सहाय्यक आयुक्तांनी खामगाव शहर पोलीसात दिलेल्या तक्रारीवरून डाळ व्यापार करणाऱ्या देवकी अॅग्रो कंपनीचा मालक नितीन मोहनलाल टावरी याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे नितीन टावरी यांच्या अजून अनेक फर्म आहेत ज्यांचे ऑडिट वस्तू व सेवा कर विभागाकडून करण्यात येत आहे. त्यामुळे हा कर चोरीचा आकडा जवळपास 100 कोटींच्या वर जाण्याची शक्यता वस्तू व सेवा कर उपायुक्त डॉ.चेतनसिंह राजपूत यांनी वर्तविली आहे.  यामुळे मात्र करचोरी करणाऱ्या व्यापाऱ्यात खळबळ उडाली आहे.


विशेष म्हणजे डाळ उद्योगावर कर आकारणारा देशातील पहिला आदेश खामगाव येथील वस्तू व सेवा कर कार्यालयाने घेतल्याची माहिती उपायुक्त डॉ.चेतनसिंह राजपूत यांनी दिली आहे. त्या नुसार डाळ व्यापाऱ्यांना जर करातून मुक्तता हवी असल्यास त्यांनी आपल्या ब्रँड , ट्रेंड मार्क , पेटंट याचा त्याग करावा अन्यथा जीएसटी भरावा असा हा आदेश होता. या आदेशानुसार संबंधित देवकी अॅग्रो इंडस्ट्रीजच्या टावरी यांनी खोट व बनावट प्रतिज्ञापत्र सादर करून कर माफी करून घेतली होती. अशा प्रकरणातून केलेल्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा पण होऊ शकते. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :