मुंबई : मुंबईतल्या मुलुंडमध्ये गेल्याच आठवड्यात पडलेल्या दरोड्याची उकल करण्यात मुंबई पोलिसांना यश आलं आहे. याप्रकरणी आठजणांच्या टोळीला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. या टोळीच्या नावावर महाराष्ट्रासह वेगवेगळ्या राज्यांमध्ये गुन्ह्यांची नोंद आहे. मुलुंडच्या पाच रस्ता परिसरातल्या व्ही पी इंटरप्रायजेस या अंगडियाच्या कार्यालयावर दिवसाढवळ्या दरोडा पडला होता. त्या दरोड्यात चारजणांनी बंदुकीचा धाक दाखवून तब्बल 70 लाख रुपयांची लूट केली होती. त्यानंतर पोलिसांच्या हाती लागू नये म्हणून टोळीतल्या काही सदस्यांनी आपली वेशभूषा बदलली होती. या टोळीकडून पोलिसांनी 37 लाख रुपयांची रोख रक्कम, सहा पिस्तुलं आणि 27 काडतुसांसह आणखीही मुद्देमाल जप्त केला आहे.


तीन दिवसांपूर्वी मुलुंडच्या पाच रस्ता येथे व्ही पी इंटरप्रयजेस या अंगाडीया यांच्या कार्यालयावर दरोडा पडला होता. चार जण बंदुकीचा धाक दाखवत कार्यालयात घुसले. बंदुकीचा धाक दाखवून तब्बल 70 लाख रुपयांची लूट करून पळ काढला होता. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. या वरून मुलुंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आणि तब्बल 12 पथके या टोळीच्या मागावर लागली.


गुन्ह्यात वापरलेली इको गाडीची  बनावट नंबर प्लेट सारखी  एका इको गाडीची होती. यामुळे या गुन्हेगारांना पोलिसांना गुंगारा देता येईल असे वाटले होते. मात्र मुंबई पोलिसांच्या चाणक्ष नजरेत ही गाडी आली आणि तिचा खरा मालक पोलिसांनी शोधून काढला.  या गाडीचा चालक मालक असलेल्या मनोज कलानला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीवरून पुढे निलेश सुर्वे, निलेश चव्हाण यांना पोलिसांनी शिताफीने अटक केली. तर या टोळीचा मास्टर माईंड वसीउल्लह चौधरी याला डोंबिवली आणि या टोळीचा सगळ्यात खतर्नाक उत्तर प्रदेश मधील कुख्यात गुंड मोनू उर्फ बिपीनकुमार सिंग आणि रत्नेश उर्फ गगन सिंग यांना पोलिसांनी उज्जैन येथून बेड्या ठोकल्या. तर  या टोळीतील कुख्यात गुंडाना उत्तर प्रदेश मधून अटक करण्यात आली आहे.


या टोळीकडून पोलिसांनी आता पर्यंत 37 लाख रोख रक्कम आणि सहा पिस्तूल आणि 27 जिवंत काडतुसे तीन वाहने आणि इतर मुद्देमाल हस्तगत केला आहे. महराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी ही टोळी असे दरोडे टाकण्याच्या प्रयत्नात होती. काही ठिकाणी त्यांनी दरोडे टाकले देखील होते. मात्र मुंबई पोलिसांनी त्यांना जेरबंद केल्याने पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. 




 



महत्त्वाच्या बातम्या: