Nashik Crime News : गॅस गिझरमधून झालेल्या गळतीमुळं महिला वैमानिकाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. रश्मी गायधनी (Rashmi Gaidhani) असं महिला वैमानिकाचं नाव असून त्या एअर इंडियामध्ये कार्यरत होत्या. रश्मी यांचा मृत्यू गॅसगळतीमुळं झाला की, आणखी काही कारण आहे? याचा पोलीस तपास करत आहेत.
एअर इंडियाच्या वैमानिक रश्मी गायधनी यांचा बाथरूममध्ये मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रश्मी यांचं माहेर नाशिकला आहे. शनिवारी त्या माहेरी मुठे यांच्या घरी आल्या होत्या. सायंकाळी बाथरूममध्ये स्नान करण्यासाठी गेल्या. मात्र बराचवेळ झाल्यानंतरही त्या बाहेर आल्या नसल्यानं कुटुंबीयांनी त्यांना आवाज दिला. त्या खाली कोसळलेल्या अवस्थेत आढळल्या. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केलं. मात्र डॉक्टरानी त्यांना मृत घोषीत केलं. सरकारवाडा पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पाहा व्हिडीओ : गॅस गिझरमधून झालेल्या गळतीमुळं महिला वैमानिकाचा मृत्यू? का काही वेगळं कारण?
सदर घटनेनंतर पोलिसांनी पंचनामा केला असता, गॅस गिझरमधून बाहेर पडणारा वायू, थंडीच्या दिवसांत जास्त गरम पाणी घेतल्यानं पाण्याची वाफ मोठ्या प्रमाणात जमा झाली असावी, आणि पुरेसे व्हेंटिलेशन नसल्यानं श्वास घ्यायला त्रास झाला असावा. त्यातून ही घटना घडल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तज्ञांच्या माध्यमांतून घटनेची कारणं शोधली जात आहेत. तर दुसरीकडे शोकाकुल मुठे परिवारानं यासंदर्भात काहीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.
दरम्यान, नाशिकमध्ये घडलेल्या या घटनेमुळं सर्वत्र एकच हळहळ व्यक्त केली जात आहे. रश्मी गायधनी एअर इंडियामध्ये सिनिअर पायलट म्हणजेच, ज्येष्ठ वैमानिक होत्या. आंघोळीच्या वेळी गॅस गिझरमधून गळती झाल्यामुळं बाथरुममध्येच गुदमरुन गायधनी यांचा करुण अंत झाला.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Pune: बोलणं सोडून दिल्याच्या रागातून अल्पवयीन मुलीवर प्राणघातक हल्ला; आरोपी दोन तासांत गजाआड
- बुलढाण्यात कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे; शेगाव पोलीस ठाण्याची अज्ञातांकडून तोडफोड
- चोर तर चोर, वर शिरजोर! रक्कम न मिळाल्यानं चोरटे म्हणाले, 'या घरातील लोक भिकारी'
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह | ABP Majha