एक्स्प्लोर

Maha Budget 2017: राज्याचा अर्थसंकल्प 18 मार्चला!

मुंबई: महाराष्ट्र विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ६ मार्चपासून सुरू होणार असून ७ एप्रिल २०१७ पर्यंत चालणार आहे. तर राज्याचा अर्थसंकल्प 18 मार्चला सादर होईल. विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहाच्या संसदीय कामकाज सल्लागार समितीची बैठक आज विधानभवनात झाली. यावेळी विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, विधानसभाअध्यक्ष हरिभाऊ बागडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, विधानसभा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह अनेक मंत्री  उपस्थित होते. अर्थसंकल्पीय अधिवेशनात २३ दिवस कामकाज चालणार आहे. राज्याचा अर्थसंकल्प १८ मार्च २०१७ रोजी दुपारी २ वाजता सादर करण्यात येणार आहे. देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, माजी केंद्रीय संरक्षण मंत्री शरद पवार आणि ज्येष्ठ विधीमंडळ सदस्य गणपतराव देशमुख यांच्या संसदीय कारकिर्दीस पन्नास वर्षे पूर्ण झाल्याबद्दल दि. २१ मार्च रोजी विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात त्यांच्या अभिनंदनपर ठरावावर चर्चा होणार आहे, अशी माहिती संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट यांनी आज बैठकीतनंतर दिली. या अधिवेशनात प्रलंबित दोन विधेयके, सहा अध्यादेश मांडण्यात येणार आहेत. यामध्ये मुंबई महानगरपालिका (सुधारणा) अध्यादेश 2017, (दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारण्याच्या प्रयोजनासाठी महानगरपालिकेची जागा देता यावी, यासाठी तरतूद), महाराष्ट्र जमीन महसूल संहिता (सुधारणा) अध्यादेश, २०१७ (अंतिम विकास आराखड्यामध्ये व प्रारुप विकास आराखड्यामध्ये दर्शविलेल्या जमिनीच्या वापरानुसार जमीन महसूल संहिता यामधील जमीन वापराचे रुपांतरण करण्याबाबतच्या तरतुदीत सुधारणा, मुंबई महानगरपालिका आणि महाराष्ट्र महानगरपालिका (सुधारणा) अध्यादेश, २०१७ (अनधिकृत इमारतींवर बसविण्यात येणारी शास्तीच्या रकमेत सुधारणा करण्यासाठी अशी शास्ती मालमत्ता कराच्या दुप्पटीपेक्षा महानगरपालिका ठरविल अशी असेल अशी तरतूद करणे),  महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग (सुधारणा) अध्यादेश, २०१७ (राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्य संख्येमध्ये सहावरून आठ एवढी वाढ करणे), महाराष्ट्र ग्रामपंचायत आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती (सुधारणा) अध्यादेश, २०१७ (ग्रामपंचायत व जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना शौचालय वापराचे स्वयं-प्रमाणपत्र देण्याबाबत तरतुदी) आणि मुंबई महानगरपालिका, महाराष्ट्र महानगरपालिका आणि महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी (सुधारणा) अध्यादेश, २०१७ (महानगरपालिका व नगरपरिषदा यांच्या निवडणूका लढविणाऱ्या उमेदवारांना शौचालय वापराचे स्वयंप्रमाणपत्र देण्याबाबत तरतुदी) ही विधेयके मांडण्यात येणार आहेत, असेही बापट यांनी यावेळी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑक्टोबर 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑक्टोबर 2026 | रविवार
अकोला शिक्षक मतदारसंघ निवडणूक! मतदानासाठी कुणाकडूनही पैसे घ्या, मतदान मात्र, आमच्या उमेदवाराला करा, ठाकरेंच्या आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य
अकोला शिक्षक मतदारसंघ निवडणूक! मतदानासाठी कुणाकडूनही पैसे घ्या, मतदान मात्र, आमच्या उमेदवाराला करा, ठाकरेंच्या आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य
पुणे शिक्षक मतदारसंघात मोठा ट्विस्ट, महादेव जानकरांची घोषणा; म्हणाले, दत्तात्रय सावंत 'रासप'चे उमेदवार, विजय पक्का
पुणे शिक्षक मतदारसंघात मोठा ट्विस्ट, महादेव जानकरांची घोषणा; म्हणाले, दत्तात्रय सावंत 'रासप'चे उमेदवार, विजय पक्का
अजितदादांचा आजचा पक्ष सक्षम नाही, पुणे पदवीधर जागा मिळायला हवी होती, रोहित पवारांचा टोला, तर अर्थमंत्रीपदावरुनही मुख्यमंत्र्यांवर टीका
अजितदादांचा आजचा पक्ष सक्षम नाही, पुणे पदवीधर जागा मिळायला हवी होती, रोहित पवारांचा टोला, तर अर्थमंत्रीपदावरुनही मुख्यमंत्र्यांवर टीका

व्हिडीओ

Anandache Paan : 'आठवणींची साठवण' आणि 'सहवास प्रतिभावंतांचा', लेखक अशोक कोठावळे यांच्यासोबत संवाद
Mann Suddha Tujha Season 3 : युरेका...युरेका | मन सुद्ध तुझं | Episode 3 | ABP Majha
Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!
Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sensex : सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 9 कंपन्यांची तुफान कमाई, 3.65 लाख कोटींनी संपत्ती वाढली, एका कंपनीला फटका, सर्वाधिक फायदा 'या' कंपनीला
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 9 कंपन्यांची तुफान कमाई, 3.65 लाख कोटींनी संपत्ती वाढली, एका कंपनीला फटका
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑक्टोबर 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑक्टोबर 2026 | रविवार
Satara News : कुरिअर कंपनीतून एकानं टीप दिली, पुणे बंगळुरु महामार्गावर दरोडा टाकत दीड कोटींचे सोने चांदीचे दागिने लुटले, पोलिसांनी 12 तासात 8 जणांना बेड्या ठोकल्या
पुणे बंगलोर महामार्गावर कवठे गावच्या हद्दीत दीड कोटींचा दरोडा, LCB नं तपासाची चक्र फिरवली, 12 तासात 8 जणांना बेड्या
Gokul Election: गोकुळच्या निवडणुकीत चुरशीने 99.96 टक्के मतदान; 12 पैकी 10 तालुक्यात शंभर टक्के, गुलाल उद्या दुपारीच लागणार!
गोकुळच्या निवडणुकीत चुरशीने 99.96 टक्के मतदान; 12 पैकी 10 तालुक्यात शंभर टक्के, गुलाल उद्या दुपारीच लागणार!
Sachin Sanap : एवढ्या मोठ्या पक्षाला शिक्षक उमेदवार मिळाला नाही, माझ्या विरोधात मंत्री, आमदार प्रचारासाठी उतरलेत, सचिन सानप यांची भाजपवर टीका
एवढ्या मोठ्या पक्षाला शिक्षक उमेदवार मिळाला नाही, एकनाथ शिंदेंना वारं कोणत्या दिशेनं वाहतंय ते कळतं: सचिन सानप
Kolhapur Crime: कोल्हापुरात हातकणंगले तालुक्यात अवघ्या 15 वर्षीय अल्पवयीन मुलीला निर्घृण पद्धतीनं संपवलं; गावकऱ्यांकडून मोर्चा काढत गावातच फाशीची मागणी
कोल्हापुरात हातकणंगले तालुक्यात अवघ्या 15 वर्षीय अल्पवयीन मुलीला निर्घृण पद्धतीनं संपवलं; गावकऱ्यांकडून मोर्चा काढत गावातच फाशीची मागणी
पुणे शिक्षक मतदारसंघात मोठा ट्विस्ट, महादेव जानकरांची घोषणा; म्हणाले, दत्तात्रय सावंत 'रासप'चे उमेदवार, विजय पक्का
पुणे शिक्षक मतदारसंघात मोठा ट्विस्ट, महादेव जानकरांची घोषणा; म्हणाले, दत्तात्रय सावंत 'रासप'चे उमेदवार, विजय पक्का
Tukaram Mundhe on GenZ : जेनझीबाबत समाजात गैरसमज आहेत, माझी जेनझीबाबत मतं वेगळी आहेत.. तुकाराम मुंढे नेमकं काय म्हणाले?
जेनझीला दांभिकपणा बिल्कूल आवडत नाही, तुकाराम मुंढे जेनझींची आवडणारी गोष्ट सांगत म्हणाले...
Embed widget