Maharashtra Budget Session LIVE: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagatsingh Koshyari) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्यासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. या वक्तव्यामुळं राज्यपाल पुन्हा वादात सापडले आहेत. त्यांच्या विरोधातील हा सूर अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीही दिसून आला. राज्यपाल सातत्याने वादग्रस्त बोलत आहे महाराष्ट्राची बदनामी होत आहे, असा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले म्हणाले की, राज्यपाल कोश्यारी यांनी आधी शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं. आता महात्मा जोतिबा फुले यांच्याबाबत देखील वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यांना आता माघारी जावं लागेल. आम्ही त्याबाबत कायदेशीर तपासणी करत आहोत.छत्रपती शिवाजी महाराजांचा जय घोष राज्यपालांना आवडत नाही त्यामुळे ते सभागृहातून निघून गेले, असं नाना पटोले म्हणाले.
राज्यपालांना राष्ट्रपती राजवट लावायची आहे
तर मंत्री यशोमती ठाकूर म्हणाल्या की, अधिवेशनाचा पहिल्या दिवशी नवाब मलीक राजीनामा ते मागत आहेत परंतु त्यांना नैतिक अधिकार नाही. इकबाल मिर्चीकडून 20 कोटी रूपये कोणी घेतले होते याचं उत्तर संघाने द्यावं. राज्यपाल सातत्याने वादग्रस्त बोलत आहेत, महाराष्ट्राची बदनामी होत आहे. त्यांना राष्ट्रपती राजवट लावायची आहे. सत्तेत येण्यासाठी ही धडपड सुरू आहे, असं त्या म्हणाल्या. महाराजांविषयी ते काय बोलले आपण पाहिलं यावरून कळतं.
सत्ताधारी पक्षाचे सर्व आमदार विधानभवनाच्या पायऱ्यांवर
राज्यपालांनी अभिभाषण अर्ध्यातच सोडलं आणि त्यानंतर ते राजभवनाकडे रवाना झाले.. मात्र त्यानंतरही सत्ताधाऱ्यांचा आक्रमक पवित्रा कायम होता. सभागृहात घोषणा देणारे सत्ताधारी पक्षाचे सर्व आमदार विधानभवनाच्या पायऱ्यांवर आले आणि तिथे जोरदार घोषणाबाजी करत राज्यपालांचा निषेध केला. आमदार संजय दौंड यांनी तर शीर्षासन अर्थात खाली डोकं वर पाय करत राज्यपालांचा आणि विरोधी पक्षाचा निषेध केला.
इतर महत्वाच्या बातम्या
Maharashtra Budget Session LIVE: अभिभाषण पटलावर ठेवत राज्यपाल थांबले, भाषण न करताच राज्यपाल निघाले