Maharashtra Budget 2023 Live : श्री क्षेत्र रिद्धपूर येथे मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करण्याची घोषणा

Maharashtra Budget 2023 : आज शिंदे-फडणवीस सरकार आपला पहिला अर्थसंकल्प (Maharashtra Budget 2023) सादर करणार आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 09 Mar 2023 03:52 PM
गाजर हलवा अर्थसंकल्प - उद्धव ठाकरे

गरजेल तो बरसेल काय? असा अर्थसंकल्प आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे. 
गाजर हलवा अर्थसंकल्प आहे. 
अर्थसंकल्पातून मधाचं बोट लावण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. 
बजेटमधून जनतेच्या भावनेचा खेळ करण्यात आला आहे.

Maharashtra Budget 2023 Live : तृतीय अमृत : भरीव भांडवली गुंतवणुकीतून पायाभूत सुविधा विकास; 53,058 कोटी रुपयांची तरतूद

Maharashtra Budget 2023 Live : तृतीय अमृत : भरीव भांडवली गुंतवणुकीतून पायाभूत सुविधा विकास; 53,058 कोटी रुपयांची तरतूद 



विभागांसाठी तरतूद
- सार्वजनिक बांधकाम विभाग : 19,491 कोटी रुपये
- ग्रामविकास व पंचायतराज विभाग : 8490 कोटी रुपये
- नियोजन व रोजगार हमी योजना विभाग : 10,297 कोटी रुपये
- नगरविकास विभाग : 9725 कोटी रुपये
- परिवहन, बंदरे विभाग : 3746 कोटी रुपये
- सामान्य प्रशासन विभाग : 1310 कोटी रुपये

Maharashtra Budget 2023 Live : श्री क्षेत्र रिद्धपूर येथे मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करण्याची घोषणा

- श्री क्षेत्र रिद्धपूर येथे मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करणार
- विश्वकोष कार्यालय वाई (सातारा), मराठी भाषा भवन, ऐरोली येथे इमारतींची कामे
- मराठी भाषेच्या प्रचार-प्रसारासाठी मराठी भाषा युवक मंडळे
- सांगली नाट्यगृहासाठी 25 कोटी रुपये
- राज्यातील सर्व नाट्यगृहांच्या दुरुस्तीसाठी : 50 कोटी रुपये
- दादासाहेब फाळके चित्रनगरी गोरेगाव, कोल्हापूर चित्रनगरी येथे आंतरराष्ट्रीय सुविधांसाठी : 115 कोटी रुपये
- कलाकार आणि कलाप्रकार जतनासाठी महाराष्ट्र कलाकार कल्याण मंडळाची स्थापना
- विदर्भ साहित्य संघाला शताब्दीनिमित्त : 10 कोटी रुपये
- स्व. शंकरराव चव्हाण सुवर्णमहोत्सवी पत्रकार कल्याण निधी आता 50 कोटी रुपयांचा

Maharashtra Budget 2023 Live : महाराष्ट्राचे वैभव असलेल्या धार्मिक क्षेत्रांच्या विकासासाठी भरीव निधीची तरतूद

Maharashtra Budget 2023 Live : महाराष्ट्राचे वैभव असलेल्या धार्मिक क्षेत्रांच्या विकासासाठी भरीव निधीची तरतूद


महाराष्ट्राचे वैभव असलेल्या धार्मिक क्षेत्रांचा विकास
 
- श्री संत सेवालाल महाराज स्मारक पोहरादेवी, उमरी तीर्थक्षेत्र विकास : 500 कोटी रुपये
- भीमाशंकर, त्र्यंबकेश्वर, घृष्णेश्वर, औंढा नागनाथ, वैजनाथ या पाचही महाराष्ट्रातील ज्योर्तिंलिंगांसह प्राचीन मंदिरांच्या संवर्धनासाठी : 300 कोटी रुपये
- श्री क्षेत्र ज्योतिबा परिसर संवर्धन प्राधीकरण : 50 कोटी रुपये
- श्री संत गाडगेबाबा समाधीस्थळ, ऋणमोचन विकासासाठी : 25 कोटी रुपये
- श्री चक्रधर स्वामी महानुभाव संबंधित रिद्धपूर, काटोल, भिष्णूर, जाळीचा देव, पोहीचा देव, नांदेड, पांचाळेश्वर, पैठण विकासासाठी भरीव निधी
- प्रज्ञाचक्षू संत गुलाबराव महाराज स्मारकासाठी भरीव निधी
- गहिनीनाथ गडाच्या संवर्धन-विकासासाठी : 25 कोटी रुपये
- श्री संत जगनाडे महाराज आर्ट गॅलरी, नागपूर: 6 कोटी रुपये
- श्री संत जगनाडे महाराज समाधीस्थळ, सुदुंबरे (पुणे) : 25 कोटी रुपये


 

Maharashtra Assembly Budget 2023 LIVE Updates : श्री संत नामदेव महाराज कीर्तनकार सन्मान योजना; कीर्तनकार, प्रवचनकार, निरुपणकार यांच्या समाजप्रबोधनाच्या कार्याचा होणार सन्मान 

Maharashtra Budget 2023 Live : श्री संत नामदेव महाराज कीर्तनकार सन्मान योजना; कीर्तनकार, प्रवचनकार, निरुपणकार यांच्या समाजप्रबोधनाच्या कार्याचा होणार सन्मान 


- संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत सोपानदेव, संत निवृत्तीनाथ, संत मुक्ताई निर्मलवारीसाठी : 20 कोटी
- कीर्तनकार, प्रवचनकार, निरुपणकार यांच्या समाजप्रबोधनाच्या कार्याचा सन्मान: श्री संत नामदेव महाराज कीर्तनकार सन्मान योजना

Maharashtra Budget 2023 Live : द्वितीय अमृत : महिला, आदिवासी, मागासवर्ग, ओबीसींसह सर्व समाजघटकांचा सर्वसमावेशक विकास

Maharashtra Budget 2023 Live : द्वितीय अमृत : महिला, आदिवासी, मागासवर्ग, ओबीसींसह सर्व समाजघटकांचा सर्वसमावेशक विकास


विभागांसाठी तरतूद
- महिला व बालविकास विभाग : 2843 कोटी रुपये
- सार्वजनिक आरोग्य विभाग : 3501 कोटी रुपये
- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग : 16,494 कोटी रुपये
- इतर मागास बहुजन कल्याण विभाग : 3996 कोटी रुपये
- दिव्यांग कल्याण विभाग : 1416 कोटी रुपये
- आदिवासी विकास विभाग : 12,655 कोटी रुपये
- अल्पसंख्यक विकास विभाग : 743 कोटी रुपये
- गृहनिर्माण विभाग : 1232 कोटी रुपये
- कामगार विभाग : 156 कोटी रुपये

>> द्वितीय अमृत योजनेसाठी एकूण : 43,036 कोटी रुपये

Maharashtra Budget 2023 Live : प्रथम अमृत : शाश्वत शेती-समृद्ध शेतकरी विभागांसाठी 29,163 कोटी रुपयांची तरतूद

Maharashtra Budget 2023 Live : प्रथम अमृत : शाश्वत शेती-समृद्ध शेतकरी विभागांसाठी 29,163 कोटी रुपयांची तरतूद
 
- कृषी विभाग : 3339 कोटी रुपये
- मदत-पुनर्वसन विभाग : 584 कोटी रुपये
- सहकार व पणन विभाग : 1106 कोटी रुपये
- फलोत्पादन विभाग : 648 कोटी रुपये
- अन्न व नागरी पुरवठा विभाग : 481 कोटी रुपये
- पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय, मत्स्यव्यवसाय विभाग : 508 कोटी रुपये
- जलसंपदा, लाभक्षेत्र विकास, खारभूमी विभाग : 15,066 कोटी रुपये
- पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग : 3545 कोटी रुपये
- मृद व जलसंधारण विभाग : 3886 कोटी रुपये

Maharashtra Budget 2023 Live : राज्यातील विद्यापीठे, शैक्षणिक संस्थांना 500 कोटी रुपयांच्या अनुदानाची घोषणा 

Maharashtra Budget 2023 Live : राज्यातील विद्यापीठे, शैक्षणिक संस्थांना 500 कोटी रुपयांच्या अनुदानाची घोषणा 
 
- डेक्कन कॉलेज पदव्युत्तर व संशोधन संस्था, पुणे
- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ, नागपूर
- शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था, अमरावती
- कॉलेज ऑफ इंजिनिअरींग पुणे
- गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली
- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूर
- डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठ
- मुंबई विद्यापीठ
- लक्ष्मी नारायण इन्स्टिट्युट ऑफ टेक्नोलॉजी, नागपूर या संस्थेला अभिमत विद्यापिठाचा दर्जा देऊन
- वरील सर्व संस्थांना 500 कोटी रूपये विशेष अनुदान
- महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ, नागपूरला इमारत बांधकामासाठी निधी देणार

Maharashtra Budget 2023 Live : शिक्षणसेवकांना भरघोस मानधन, सरासरी 10 हजार रुपयांची वाढ

Maharashtra Budget 2023 Live : शिक्षणसेवकांना भरघोस मानधन, सरासरी 10 हजार रुपयांची वाढ
 
- प्राथमिक व उच्च प्राथमिक शिक्षणसेवक : 6000 वरुन 16,000 रुपये
- माध्यमिक शिक्षण सेवक : 8000 वरुन 18,000 रुपये
- उच्च माध्यमिक शिक्षण सेवक : 9000 वरुन 20,000 रुपये
- पीएमश्री शाळा : 816 शाळा/ 5 वर्षांत 1534 कोटी रुपये

Maharashtra Budget 2023 Live : विद्यार्थ्यांना आता मिळणार भरीव शिष्यवृत्ती, गणवेशही मोफत; 1000 रुपयांची शिष्यवृत्ती 5000 रुपये करण्याची घोषणा

Maharashtra Budget 2023 Live : विद्यार्थ्यांना आता मिळणार भरीव शिष्यवृत्ती, गणवेशही मोफत
 
- 5 ते 7 वी : 1000 वरुन 5000 रुपये शिष्यवृत्ती मिळणार
- 8 ते 10 वी : 1500 वरुन 7500 रुपये शिष्यवृत्ती मिळणार
- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये इयत्ता आठवीपर्यंत सर्व प्रवर्गांच्या विद्यार्थ्यांना गणवेश मोफत देणार

Maharashtra Budget 2023 Live : मुंबई महामुंबईसाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद

Maharashtra Budget 2023 Live : मुंबई महामुंबईसाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद
 
- मुंबईच्या सुशोभिकरणासाठी : 1729 कोटी रुपये
- एमएमआर क्षेत्रात पारसिक हिल्स बोगदा, मीरा-भाईंदर पाणीपुरवठा, मुंबई पारबंदर प्रकल्प, विविध उड्डाणपूल यावर्षी पूर्ण
- ठाणे-वसई खाडी जलवाहतुकीने जोडणार: 424 कोटी रुपये
- गेट वे ऑफ इंडियाजवळ रेडिओ क्लबनजीक प्रवासी जेट्टी, इतर सुविधांचे निर्माण : 162.20 कोटी

Maharashtra Budget 2023 Live : राज्यातील विमानतळांच्या विकासांसाठी निधीची तरतूद, पुरंदर येथे नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ होणार

राज्यातील विमानतळांच्या विकासांसाठी निधीची तरतूद 
 
- शिर्डी विमानतळावर नवे प्रवासी टर्मिनल: 527 कोटी
- छत्रपती संभाजीनगर विमानतळ भूसंपादनासाठी : 734 कोटी
- नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाचा विस्तार
- पुरंदर येथे नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ
- नागपुरातील मिहान प्रकल्पासाठी 100 कोटी
- बेलोरा (अमरावती), शिवणी (अकोला) येथे विमानतळ विकासाची कामे

Maharashtra Budget 2023 Live : आदिवासी पाडे, बंजारा तांडे, धनगर वाड्या-वस्त्यांतील रस्त्यांसाठी 4000 कोटी

Maharashtra Budget 2023 Live : आदिवासी पाडे, बंजारा तांडे, धनगर वाड्या-वस्त्यांतील रस्त्यांसाठी 4000 कोटी
- आदिवासी पाडे रस्त्यांनी जोडण्यासाठी बिरसा मुंडा जोडरस्ते योजना
- बंजारा तांडे रस्त्यांनी जोडण्यासाठी संत सेवालाल महाराज जोडरस्ते योजना
- धनगर वाड्या-वस्त्या जोडण्यासाठी यशवंतराव होळकर जोडरस्ते योजना
- या तिन्ही योजनांसाठी सुमारे 4000 कोटी रुपयांची तरतूद

Maharashtra Budget 2023 Live : नवीन महामंडळांची स्थापनेच्या घोषणेसह भरीव निधी सुद्धा देणार

- असंघटित कामगार : महाराष्ट्र राज्य असंघटित कामगार कल्याण मंडळ
- लिंगायत तरुणांना रोजगार : जगदज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ
- गुरव समाज : संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळ
- रामोशी समाज : राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ
- वडार समाज : पैलवान कै. मारूती चव्हाण-वडार आर्थिक विकास महामंडळ
- ही महामंडळे महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळांतर्गत
- प्रत्येकी 50 कोटी रुपयांचा निधी देणार

Maharashtra Budget 2023 Live : असंघटित कामगार, दिव्यांगांसाठी मोठी घोषणा; महामंडळ स्थापनेसोबत सामाजिक सुरक्षा, कल्याणकारी योजना

असंघटित कामगार, दिव्यांगांसाठी मोठी घोषणा; महामंडळ स्थापनेसोबत सामाजिक सुरक्षा, कल्याणकारी योजना 
 
- 3 कोटी असंघटित कामगारांसाठी महाराष्ट्र राज्य असंघटित कामगार कल्याण मंडळ, सामाजिक सुरक्षा, कल्याणकारी योजना राबविणार
- ऑटोरिक्षा व टॅक्सी चालक-मालक कल्याणकारी महामंडळ स्थापन करणार
- माती कारागिरीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड, संत शिरोमणी गोरोबा काका महाराष्ट्र मातीकला मंडळाला 25 कोटी
- स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभागामार्फत शिक्षण, पुनर्वसन, रोजगाराच्या योजना राबविणार

Maharashtra Budget 2023 Live : ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रत्येक शहरात विरंगुळा केंद्र, वयोश्री योजनेचाही विस्तार

ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रत्येक शहरात विरंगुळा केंद्र, वयोश्री योजनेचाही विस्तार
 
- ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रत्येक महापालिका क्षेत्रात विरंगुळा केंद्र स्थापन करणार
- ज्येष्ठ नागरिकांसाठी राष्ट्रीय वयोश्री योजनेचा राज्य सरकारकडून विस्तार
- वयोवृद्धांना वैद्यकीय उपकरणे, अन्य सुविधा उपलब्ध करून देणार

Maharashtra Budget 2023 Live : इतर मागासवर्गीयांसाठी 'मोदी आवास घरकुल योजना'; 3 वर्षांत 10 लाख घरे, 12,000 कोटींची तरतूद रुपये

इतर मागासवर्गीयांसाठी 3 वर्षांत 10 लाख घरांची ‘मोदी आवास घरकुल योजना’
 
- प्रधानमंत्री आवास योजना: 4 लाख घरे
(2.5 लाख घरे अनुसूचित जाती-जमाती, 1.5 लाख इतर प्रवर्ग)
- रमाई आवास : 1.5 लाख घरे/1800 कोटी रुपये
(किमान 25 हजार घरे मातंग समाजासाठी)
- शबरी, पारधी, आदिम आवास : 1 लाख घरे/1200 कोटी रुपये
- यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत: 50,000 घरे/600 कोटी
(25,000 घरे विमुक्त जाती-भटक्या जमातींसाठी धनगर : 25,000 घरे)

Maharashtra Budget 2023 Live : हर घर जल: जनजीवन मिशनसाठी सुमारे 20,000 कोटी रुपये तरतूद

हर घर जल: जनजीवन मिशनसाठी सुमारे 20,000 कोटी रुपये तरतूद
 
- जलजीवन मिशन : 17.72 लाख कुटुंबांना नळजोडणी, सुमारे 20,000 कोटी रुपये
- 1656 एमएलडी क्षमतेचे मलनिस्सारण प्रकल्प
- 10,000 कि.मी.च्या मलजलवाहिनी
- 4.55 कोटी मेट्रीक टन कचर्‍यावर प्रक्रिया
- 22 नागरी संस्थांना 124 यांत्रिक रस्तासफाई वाहने
- ग्रामीण भागात 15,146 घनकचरा, सांडपाणी प्रक्रिया कामे

Maharashtra Budget 2023 Live : हर घर जल: जनजीवन मिशनसाठी सुमारे 20,000 कोटी रुपये तरतूद

हर घर जल: जनजीवन मिशनसाठी सुमारे 20,000 कोटी रुपये तरतूद
 
- जलजीवन मिशन : 17.72 लाख कुटुंबांना नळजोडणी, सुमारे 20,000 कोटी रुपये
- 1656 एमएलडी क्षमतेचे मलनिस्सारण प्रकल्प
- 10,000 कि.मी.च्या मलजलवाहिनी
- 4.55 कोटी मेट्रीक टन कचर्‍यावर प्रक्रिया
- 22 नागरी संस्थांना 124 यांत्रिक रस्तासफाई वाहने
- ग्रामीण भागात 15,146 घनकचरा, सांडपाणी प्रक्रिया कामे

Maharashtra Budget 2023 Live : संजय गांधी निराधार/श्रावणबाळ योजनेत अर्थसहाय्य आता 1000 हून 1500 रुपये

निराधार योजनांमध्ये वाढीव अर्थसहाय्य
 
- अंत्योदयाचा विचार
- संजय गांधी निराधार/श्रावणबाळ योजनेत अर्थसहाय्य आता 1000 हून 1500 रुपये
- राज्य सरकार अतिरिक्त 2400 कोटी रुपयांचा भार उचलणार
- प्रत्येक महिन्यात पहिल्याच आठवड्यात नियमित प्रदान

Maharashtra Budget Live 2023 : जलयुक्त शिवार 2.0 योजनेची घोषणा, 5000 गावांमध्ये योजना सुरू होणार

5000 गावांमध्ये सुरु करणार जलयुक्त शिवार 2.0, अर्थसंकल्पात मोठी घोषणा 


- जलयुक्त शिवार योजनेचा दुसरा टप्पा 5000 गावांमध्ये
- गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार योजनेस 3 वर्ष मुदतवाढ

Maharashtra Budget 2023 Live : शेतकर्‍यांसाठी ट्रान्सफॉर्मर योजना, प्रलंबित कृषीपंपांना वीजजोडण्या देण्याची घोषणा 

शेतकर्‍यांसाठी ट्रान्सफॉर्मर योजना, प्रलंबित कृषीपंपांना वीजजोडण्या देण्याची घोषणा 
 
- वीज ट्रान्सफॉर्मर नसल्याने पाणी असूनही शेतकर्‍यांची गैरसोय टाळण्यासाठी ट्रान्सफॉर्मर योजना
- मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेत हेक्टरी 75,000 रुपये वार्षिक भाडेपट्टा
- दिवसा वीजपुरवठ्यासाठी 3 वर्षांत 30 टक्के कृषी वीजवाहिन्यांचे सौर उर्जीकरण, 9.50 लाख शेतकर्‍यांना लाभ
- प्रधानमंत्री कुसुम योजनेतून 1.50 लाख सौर कृषीपंप
- प्रलंबित 86,073 कृषीपंप अर्जदारांना तत्काळ वीजजोडणी
- उपसा जलसिंचन योजनेतील शेतकर्‍यांना वीजदर सवलतीची मुदत आता मार्च 2024 पर्यंत

Maharashtra Budget 2023 Live : आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविकांच्या मानधनात भरीव वाढ; अंगणवाडी, मिनी अंगणवाडी सेविका, मदतनीसांची 20,000 पदे भरणार

आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविकांच्या मानधनात भरीव वाढ
 
- आशा स्वयंसेविकांचे मानधन 3500 वरुन 5000 रुपये
- गटप्रवर्तकांचे मानधन 4700 वरुन 6200 रुपये
- अंगणवाडी सेविकांचे मानधन 8325 वरुन 10,000 रुपये
- मिनी अंगणवाडी सेविकांचे मानधन 5975 वरुन 7200 रुपये
- अंगणवाडी मदतनिसांचे मानधन 4425 वरुन 5500 रुपये
- अंगणवाडी, मिनी अंगणवाडी सेविका, मदतनीसांची 20,000 पदे भरणार
- अंगणवाड्यांमार्फत घरपोच आहार पुरवठ्यासाठी साखळी व्यवस्थापन प्रणाली

Maharashtra Budget 2023: महात्मा फुले आरोग्य योजनेची मर्यादा दीड लाखांवरून 5 लाखांवर रुपये, सरकारची मोठी घोषणा

Maharashtra Budget 2023 : महात्मा फुले आरोग्य योजनेची मर्यादा दीड लाखांवरून 5 लाखांवर रुपये, सरकारची मोठी घोषणा 

Maharashtra Budget 2023 : एसटी प्रवासात महिलांना तिकिट दरात सरसकट 50 टक्क्यांची सवलतीची घोषणा

Maharashtra Budget 2023 :  एसटी प्रवासात महिलांना तिकिट दरात सरसकट 50 टक्क्यांची सवलतीची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.  

धनगर समाजासाठी 1000 कोटी रुपयांच्या योजनेची घोषणा; महाराष्ट्र मेंढी, शेळी सहकार विकास महामंडळाची स्थापना करणार

- धनगर समाजासाठी 1000 कोटी रुपये
- 22 योजनांचे एकत्रिकरण, मंत्रिमंडळ शक्तीप्रदत्त समितीमार्फत अंमलबजावणी
- महाराष्ट्र मेंढी व शेळी सहकार विकास महामंडळाची स्थापना करणार
- 10 हजार कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देणार
- अहमदनगर येथे मुख्यालय असणार
- राजे यशवंतराव होळकर महामेष योजनेत मेंढीपालनासाठी भरीव निधी

Maharashtra Budget 2023 Live : शिवनेरी किल्ल्यावर शिवछत्रपतींच्या जीवनचरित्रावर संग्रहालय. शिवकालिन किल्ल्यांचे संवर्धन होणार, 3000 कोटींची तरतूद 

Maharashtra Budget 2023  Live : शिवनेरी किल्ल्यावर शिवछत्रपतींच्या जीवनचरित्रावर संग्रहालय. शिवकालिन किल्ल्यांचे संवर्धन होणार, 3000 कोटींची तरतूद 


- छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेकाचे हे 350 व्या वर्षानिमित्तच्या महोत्सवासाठी 350 कोटी रुपये
- आंबेगाव (पुणे) येथे छत्रपती शिवाजी महाराज संकल्पना उद्यान: 50 कोटी
- मुंबई, अमरावती, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर येथे शिवचरित्रावरील उद्याने : 250 कोटी रुपये

Maharashtra Budget 2023 : नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्याची घोषणा; तीन वर्षासाठी 1000 कोटींच्या रुपयांच्या निधीच्या तरतुदीची घोषणा 

नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्याची घोषणा; तीन वर्षासाठी 1000 कोटींच्या रुपयांच्या निधीच्या तरतुदीची घोषणा 


- नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देणार
- 3 वर्षांत 25 लाख हेक्टर क्षेत्र सेंद्रीय शेतीखाली आणणार
- 1000 जैवनिविष्ठा स्त्रोत केंद्र स्थापन करणार
- डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशनची व्याप्तीवाढ
- 3 वर्षांत 1000 कोटी रुपये निधी

Maharashtra Budget 2023 : महाराष्ट्रातील शेतकर्‍यांसाठी महाकृषिविकास अभियान, अर्थसंकल्पात महत्त्वाची घोषणा

महाराष्ट्रातील शेतकर्‍यांसाठी महाकृषिविकास अभियान
 
- राज्यातील शेतकर्‍यांच्या उत्पन्नवाढीसाठी महाकृषिविकास अभियान राबविणार
- पीक, फळपीक घटकाच्या उत्पादनापासून ते मूल्यवर्धनापर्यंत
- तालुका, जिल्हानिहाय शेतकरी गट, समूहांसाठी योजना
- एकात्मिक पीक आधारित प्रकल्प आराखडा तयार करणार
- 5 वर्षांत 3000 कोटी रुपये उपलब्ध करून देणार

Maharashtra Budget 2023 : महाराष्ट्रातील शेतकर्‍यांना आता केवळ 1 रुपयांत पीकविमा मिळणार, अर्थसंकल्पात मोठी घोषणा

महाराष्ट्रातील शेतकर्‍यांना आता केवळ 1 रुपयांत पीकविमा मिळणार, अर्थसंकल्पात मोठी घोषणा
 
- आधीच्या योजनेत विमाहप्त्याच्या 2 टक्के रक्कम शेतकर्‍यांकडून
- आता शेतकर्‍यांवर कोणताच भार नाही. राज्य सरकार भरणार हप्ता
- शेतकर्‍यांना केवळ 1 रुपयांत पीकविमा
- 3312 कोटी रुपये भार राज्य सरकार उचलणार

Maharashtra Budget 2023 : धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 15 हजार प्रोत्साहनपर अनुदान देण्याची घोषणा

Maharashtra Budget 2023 :  धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 15 हजार प्रोत्साहनपर अनुदान देण्याची फडणवीस यांची घोषणा

Maharashtra Budget 2023 : शेतकऱ्यांसाठी राज्याकडून नमो शेतकरी महा सन्मान योजनेची घोषणा; 6000 रुपये वार्षिक निधी मिळणार

Maharashtra Budget 2023 :  शेतकऱ्यांसाठी राज्याकडून नमो शेतकरी महा सन्मान योजनेची घोषणा; 6000 रुपये वार्षिक निधी मिळणार

संत तुकारामांच्या ओवीचा उल्लेख करत अर्थसंकल्प वाचानास सुरूवात


संत तुकारामांच्या ओवीचा उल्लेख करत अर्थसंकल्प वाचानास सुरूवात

Maharashtra Budget 2023 Live : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अर्थसंकल्पाला मंजुरी

Maharashtra Budget 2023 Live :  राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अर्थसंकल्पाला मंजुरी, थोड्याच वेळात विधानसभेत सादर होणार अर्थसंकल्प

Maharashtra Budget session 2023 :  अश्विनी जगताप यांच्यासह रविंद्र धंगेकरांनी घेतली आमदारकीची शपथ...

Maharashtra Budget session 2023 :  नवनिर्वाचित आमदार अश्विनी जगताप आणि रविंद्र धंगेकर यांनी आज सभागृहात आमदारकीची शपथ घेतली. रविंद्र धंगेकर यांच नाव पुकारल्यानंतर महाविकास आघाडीचा विजय असो अशा घोषणा देण्यात आल्या. रविंद्र धनगेकर यांनी पहिल्यांदा चंद्रकांत पाटील यांच्याजवळ जाऊन नमस्कार केला. त्यावेळी हू ईज धंगेकर अशा घोषणा देण्यात आल्या. 

Budget session : शेतकरी प्रश्नावरुन सभागृहात विरोधक आक्रमक

Maharashtra Budget session 2023 : शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरुन विधानसभेत विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेस नेते नाना पटोले, बाळासाहेब थोरात यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी शेतकऱ्यांना मदत करण्यावरुन सरकारला धारेवर धरलं आहे. यावेळी विरोधकांनी वेलमध्ये येऊन सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी दिली. यावेळी सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणाने उभे असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.


 

अर्थसंकल्पात रोजगार निर्मितीवर भर द्यावा, शेतकऱ्यांचं वीज बिल माफ करावं : अशोक चव्हाण

Maharashtra Budget 2023 : निवडणूक तोंडावर होणारा अर्थसंकल्प आहे. त्यामुळं या अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस होणार असल्याचे मत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला. अर्थसंकल्पात रोजगार निर्मितीवर भर दिला पाहिजे. मध्य प्रदेश सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने  शेकऱ्यांचे वीज बिल माफ करावे असे चव्हाण म्हणाले.


 

Maharashtra Budget: शेतकऱ्यांची परिस्थिती गंभीर, शेतकरी चिंताग्रस्त आहेत; शेतकरी प्रश्नांवरुन अजित पवार विधानसभेत आक्रमक

Maharashtra Budget: शेतकऱ्यांच्या प्रश्नावरुन विरोधक विधानसभेत आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. विरोधी पक्षनेते अजित पवारही विधानसभेत बोलताना शेतकऱ्यांच्या प्रश्नावरुन आक्रमक झाले. ते म्हणाले की, "शेतकरी यांची परिस्थिती गंभीर बनली आहे. कृषीमंत्री यांच्या भागांत ही शेतकरी यांनी आत्महत्या केली आहे. काल महिला दिनाचा कार्यक्रम संपल्यानंतर सरकार घोषणा करेल असं वाटलं होतं. मात्र तसं झालं नाही. शेतकरी चिंताग्रस्त आहे. आजही पाऊस पाडण्याचे संकेत आहेत. मी ही अर्थसंकल्प सातवेळा मांडला आहे."

Maharashtra Budget 2023 Live : शेतकऱ्यांचा प्रश्न गंभीर, शेतकऱ्यांना मदत जाहीर झाली पाहिजे : नाना पटोले

Maharashtra Budget 2023 Live : विधानसभेत बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शेतकऱ्यांचा प्रश्न मांडला. ते म्हणाले की, शेतकऱ्यांचा प्रश्न गंभीर आहे. आभाळ फाटलं आहे. शेतकऱ्यांना मदत जाहीर झाली पाहिजे.

Maharashtra Budget 2023 Live : नवनिर्वाचित आमदार अश्विनी जगताप आणि रविंद्र धनगेकर यांचा शपथविधी

Maharashtra Budget 2023 Live : आज विधानसभा कामकाजाला सुरुवात झाली आहे. 


नवनिर्वाचित आमदार अश्विनी जगताप आणि रविंद्र धनगेकर यांचा शपथविधी पार पडला. 
रविंद्र धंगेकर यांचं नाव पुकारल्यानंतर महाविकास आघाडीचा विजय असोच्या घोषणा देण्यात आल्या. 
रविंद्र धंगेकर यांनी पहिल्यांदा चंद्रकांत पाटील यांच्या जवळ जाऊन नमस्कार केला. त्यावेळी 'हू ईज धंगेकर' अशा घोषणा देण्यात आल्या....

Maharashtra Budget 2023 Live : नवनिर्वाचित आमदार अश्विनी जगताप आणि रविंद्र धनगेकर यांचा शपथविधी

Maharashtra Budget 2023 Live : आज विधानसभा कामकाजाला सुरुवात झाली आहे. 


नवनिर्वाचित आमदार अश्विनी जगताप आणि रविंद्र धनगेकर यांचा शपथविधी पार पडला. 
रविंद्र धंगेकर यांचं नाव पुकारल्यानंतर महाविकास आघाडीचा विजय असोच्या घोषणा देण्यात आल्या. 
रविंद्र धंगेकर यांनी पहिल्यांदा चंद्रकांत पाटील यांच्या जवळ जाऊन नमस्कार केला. त्यावेळी 'हू ईज धंगेकर' अशा घोषणा देण्यात आल्या....

Maharashtra Budget 2023 Live : आज सादर होणाऱ्या राज्याच्या अर्थसंकल्पाकडे पुणेकरांचं लक्ष

राज्याचा अर्थसंकल्प आज सादर केला जाणार आहे, आज सादर होणाऱ्या राज्याच्या अर्थसंकल्पाकडे सगळ्यांच लक्ष लागले आहे


 

Maharashtra Budget 2023 Live Updates : एकनाथ शिंदे सरकारचा पहिला अर्थसंकल्प

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस हे सज्ज झाले आहेत.

Maharashtra Budget 2023 Live Updates : एकनाथ शिंदे सरकारचा पहिला अर्थसंकल्प देवेंद्र फडणवीस सादर करणार आहेत

एकनाथ शिंदे सरकारचा पहिला अर्थसंकल्प देवेंद्र फडणवीस सादर करणार आहेत

Maharashtra Budget 2023 : सामान्य लोकांचं हे बजेट असावं, शेतकऱ्यांसह कष्टकरी आणि बेरोजगारांना गृहीत धरुन अर्थसंकल्प मांडावा : रोहित पवार

Maharashtra Budget 2023 : शेतकरी कष्टकरी बेरोजगार यांना गृहीत धरून अर्थसंकल्प मांडला जाईल अशी अपेक्षा असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केलं आहे. यापूर्वी आपण पाहिलं पुरवणी मागण्यात मागण्या झाल्यानुसार काहीही या सरकारने काही केलं नाही. पालिका निवडणुकीच्या दृष्टीने हे बजेट मांडू नये. सामान्य लोकांचं हे बजेट असावं. मुंबईवर जास्त फोकस असण्याची शक्यता आहे. मात्र ते करताना सर्वच शहरत चांगले प्रोजेक्ट राबवावे असे रोहित पवार म्हणाले. महाराष्ट्रावर फोकस करा. ज्या कामांना स्थगिती दिली त्यावरची स्थगिती उठवेल अशी अपेक्षा आहे. अवकाळी पावसानं नुकसान झालेले साठ टक्के शेतकरी मदतीपासून वंचित आहेत. आर्थिक पाहणी अहवालत मोठी घट सर्वत्र पाहायला मिळत आहे. त्यावर या सरकारनं लक्ष घालायला हवं. ज्या-ज्या ठिकाणी निवडणुका आहेत तिथं चांगला निधी दिला जाईल असे रोहित पवार म्हणाले.


 

Budget : निवडणुका लक्षात घेता शहरी भागासह कृषी क्षेत्रावरही अर्थसंकल्पाचा भर असण्याची शक्यता

Maharashtra Budget 2023 : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis ) यांच्याकडे अर्थ खात्याचा भार असल्याने ते पहिल्यांदा अर्थसंकल्प मांडणार आहे. मुंबई, ठाणे, पुणे महापालिकेसह राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता शहरी भागातील नागरिकांना दिलासा देताना कृषी क्षेत्रावरही अर्थसंकल्पाचा भर असणार असल्याची शक्यता आहे. 

पार्श्वभूमी

Maharashtra Budget 2023 Live Updates : राज्यात सत्तांतर झाल्यानंतर आज शिंदे-फडणवीस सरकार आपला पहिला अर्थसंकल्प (Maharashtra Budget 2023) सादर करणार आहे. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे अर्थ खात्याचा भार असल्याने ते पहिल्यांदा अर्थसंकल्प मांडणार आहे. मुंबई, ठाणे, पुणे महापालिकेसह राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता शहरी भागातील नागरिकांना दिलासा देताना कृषी क्षेत्रावरही अर्थसंकल्पाचा भर असण्याची शक्यता आहे. 


उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा हा अर्थसंकल्प नाही तर महाअर्थसंकल्प असणार असल्याचे म्हटले होते. अर्थसंकल्पात कोणत्या गोष्टींचा समावेश असावा, यासाठी फडणवीस यांनी सर्व मंत्री, सचिव, उद्योग संघटनांसोबत चर्चा केली होती. पायाभूत सुविधा, शहरी भागांसाठी विविध प्रकल्प, कृषी क्षेत्रासाठी भरीव तरतूद, शेतकऱ्यांसाठी पॅकेज आदीबाबतच्या मोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे. येत्या काही महिन्यात राज्यात मिनी विधानसभा अर्थात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडणार आहेत. त्याअनुषंगाने आमदारांच्या मतदारसंघातील रस्ते, पूल, सिंचन प्रकल्प यांसह अन्य कामांसाठी या अर्थसंकल्पामध्ये भरीव तरतूद केली जाण्याचे संकेत आहेत. 


Devendra Fadnavis to present state budget today | राज्याचा विकासाचा दर हा देशाच्या विकास दरापेक्षा कमी


बुधवारी, विधानसभेत राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल सादर करण्यात आला. सन 2022-23 च्या पुर्वानुमानानुसार राज्याच्या आर्थिक विकासदरात 6.8 टक्क्यांची वाढ होण्याचा अंदाज वर्तवण्यात आली आहे. तर देशाच्या अर्थव्यवस्थेत 7.0 टक्क्यांची वाढ अपेक्षित आहे.  राज्याच्या कृषी आणि संलग्न कार्ये क्षेत्रात 10.2 टक्क्यांच्या वाढीचा अंदाज आहे. त्याचबरोबर उद्योग क्षेत्रात 6.1 टक्के वाढ आणि सेवा क्षेत्रात 6.4 टक्के वाढ अपेक्षित असल्याची माहिती आर्थिक पाहणी अहवालातून समोर आली आहे.


2022-23 मध्ये राज्यावर 6 लाख 49 हजार 699 कोटी कर्ज अपेक्षित आहे. राज्यावर कर्जाच्या व्याजाचा बोजा 46 हजार कोटी रुपये आहे. 2022-23 मध्ये राज्याच्या एकूण महसुली खर्चात वेतन आणि निवृत्ती वेतन यावर 44.1 टक्के खर्च अपेक्षित आहे. दरम्यान, महाराष्ट्र विकासाचा दर देशाच्या विकास दरपेक्षा कमी आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.