Maharashtra Budget : "महाराष्ट्र सरकार घोषणा करण्यात नेहमी पुढे असते. राज्य सरकारच्या आजच्या बजेटमधून (Maharashtra Budget) सामान्यांसाठी कोणतीही ठोस योजना नाही, अशी टीका केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड ( Bhagwat Karad) यांनी राज्याच्या अर्थसंकल्पावर केली आहे. 


अर्थमंत्री अजित पवार यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. त्यानंतर पुण्यातील मराठा चेंबर ऑफ कॉमर्स आणि इंडस्ट्रीज अँड अॅग्रीकल्चर संस्थेत उद्योगपतींसोबत बैठक घेतल्यानंतर केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली. यामध्ये मंत्री कराड यांनी राज्याच्या अर्थसंकल्पावर टीका केली आहे. "प्रधानमंत्री गतीशक्ती योजनेच्या माध्यमातून केंद्राच्या बजेटमध्ये तरतूद  करण्यात आली आहे. तर संरक्षण विभागासाठीही निधीची तरतूद करण्यात आली आहे. महाराष्ट्राचा जीडीपी साडेबारा टक्के असेल तर चांगलीच गोष्ट आहे. भारताचा जीडीपी जगातील अनेक देशांपेक्षा चांगला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींवर केंद्र सरकार लक्ष ठेवून आहे. परंतु, महाराष्ट्राचा विकास व्हायचा असेल तर महाविकास आघाडी सरकार लवकर जायला हवे, अशी टीका मंत्री कराड यांनी केली आहे. 


 मंत्री कराड म्हणाले, "केंद्राच्या बजेटमधून देशभरात रोजगार निर्मिती होणार आहे. केंद्र सरकारकडून पाच लाख रुपयांचे अनुदान उद्योगांना देण्यात येत आहे. उद्यागपतींनी त्याचा लाभ घ्यावा. केंद्रकाडून देण्यात येणाऱ्या अनुदानातून उत्पादन वाढवा आणि आत्मनिर्भर भारतमधे सहभागी व्हा, असे आवाहान भागवत कराड यांनी उद्योगपतींना केले आहे. याबरोबरच पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी प्रयत्न करत आहोत, अशी माहिती मंत्री कराड यांनी यावेळी दिली आहे.


महत्वाच्या बातम्या