Maharashtra Breaking News Live Updates : एकनाथ शिंदे उद्या लाडक्या बहिणींच्या उपस्थितीत राजीनामा देणार

Maharashtra Election Results News Live Updates: आज घडणाऱ्या राजकीय तसेच इतर प्रमुख घडामोडींचा आढावा वाचा एका क्लिकवर....

प्रज्वल ढगे Last Updated: 25 Nov 2024 10:21 PM
एकनाथ शिंदे उद्या सकाळी 11 वाजता राजीनामा देणर

उद्या सकाळी 11 वाजता लाडक्या बहिणींच्या उपस्थितीत एकनाथ शिंदे देणार राजीनामा

आमच्या कडे आता फक्त शरद पवार राहिले आहेत, त्यांना सोडण्याची मानसिकता आता कोणाचीही नाही : जितेंद्र आव्हाड

आमच्या कडे आता फक्त शरद पवार राहिले आहेत, त्यांना सोडण्याची मानसिकता आता कोणाचीही नाही : जितेंद्र आव्हाड


अजित पवार फोन करून सगळ्यांना आमच्या कडे या असं बोलत आहेत, पण कोणीही जाणार नाही, त्यांच्याकडून फोन करून सांगितलं जातंय कि आता काय राहील तुम्ही या पण आमच्याकडुन कोणी जाणार नाही


पिपाणीमुळे आमचं नुकसान झालंच नावामुळे देखील नुकसान झालंय... एकाच नावाचे उमेदवार असल्याने नुकसान झाले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने राज्यभर भारतीय संविधान दिन साजरा होणार

राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने उद्या भारतीय संविधान दिन प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांच्या उपस्थितीत मुंबई व राज्यभर साजरा करण्यात येणार आहे.



सकाळी १०.१० वाजता राज्यातील जिल्हा व तालुक्याच्या मुख्य ठिकाणी महापुरुषांच्या स्मारकासमोर अभिवादन करून संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले जाणार आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पराभूत उमेदवारांची उद्या बैठक

उद्या सकाळी ११ वाजता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील विधानसभेतील पराभूत उमेदवारांची बैठक वाय बी चव्हाण सेंटर येथे होणार


शरद पवार आणि जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक होणार


राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून या विधानसभा निवडणुकीत जवळपास ८७ जागा लढवण्यात आल्या होत्या त्यात फक्त १० जागांवर पक्षाला विजय मिळाला आहे


पक्षाच्या या निवडणुकीतील पराभवाच्या कारणसंदर्भात ही बैठक होणार आहे या बैठकीत पराभूत उमेदवार काय भूमिका मांडणार हे पाहण महत्वाच आहे

एकनाथ शिंदे यांचं राज्यातील जनतेला पत्र

विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप- राष्ट्रवादी काँग्रेसच्या महायुतीला भरभरून मतदान केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मतदारांचे आभार मानले आहेत. एकनाथ शिंदे यांनी राज्यातील जनतेला पत्र लिहिलं आहे. 

स्वाभिमानी शेतकरी संघटना पुन्हा एकदा आक्रमक आंदोलनाच्या पवित्र्यात

स्वाभिमानी शेतकरी संघटना पुन्हा एकदा आक्रमक आंदोलनाच्या पवित्र्यात


उसाच्या यंदाच्या हंगामात पहिली उचल 3700 जाहीर करावी


गेल्या हंगामातील जादाचे प्रतिटन 200 रुपये देण्याची मागणी


शेतकरी नेते राजू शेट्टी यांचे साखर आयुक्त पुणे यांना पत्र


मागणीवर 15 दिवसात निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलन करणार

शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीला आमदार पोहोचण्यास सुरुवात

शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीला आमदार पोहोचण्यास सुरुवात झाली आहे. यशवंतराव चव्हाण सेंटर येथे नवनिर्वाचित आमदारांची बैठक 

अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे उद्या सकाळी दिल्लीला रवाना होणार

उद्या सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे दिल्लीला रवाना होणार असल्याची माहिती आहे. 

राज्यातील मराठा समाजाची एकच मागणी, एकनाथ शिदेंनी मुख्यमंत्री व्हावं : शितल म्हात्रे

राज्यभरातील मराठा समाजाची मागणी आहे की पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवावे… मराठा आरक्षणाचा प्रश्नं फक्तं एकनाथ शिंदेच सोडवू शकतात… आण्णासाहेब पाटील आणि सारथी महामंडळामार्फत सर्वाधिक मदत करण्यात आली आहे… राज्याला मराठा नेता हाच मुख्यमंत्री असावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे, असं शितल म्हात्रे म्हणाल्या.

सत्तास्थापनेनंतर महायुती पहिला निर्णय लाडकी बहीण योजनेबाबत घेणार? 

सत्तास्थापनेनंतर महायुती पहिला निर्णय लाडकी बहिण योजनेबाबत घेणार? 


विधानसभा निवडणूकीत गेमचेंजर ठरलेल्या लाडकी बहिण योजनेची दरमहा रक्कम लवकरच २१०० केली जाणार?


सत्तास्थापनेनंतर नागपूर हिवाळी अधिवेशनात लाडकी बहिण योजनेची रक्कम १५०० वरुन २१०० करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला जाण्याची शक्यता 


ज्या योजनेनं महायुतीला यश दिलं त्या योजनेबाबत दिलेलं आश्वासन महायुती लवकरच पूर्ण करणार

मला पण वाटतं भाजपचा मुख्यमंत्री व्हावा - अंबादास दानवे

रावसाहेब दानवे 


भाजप आज नाही अनेक दिवसांपासून मित्र पक्ष असल्यापासून निवडणुका लढवत आहे 


ज्यांच्यासोबत लढलो त्यांच्या सोबत बसून निर्णय करावे लागतात 


एकत्रित निवडणूक लढलो 


विधीमंडळ पक्षाची नेते निवड होईल, भाजप देखील लवकर निवड करेल 


आणि त्यानंतर मित्र पक्षांसोबत बैठक होईल आणि नंतर मुख्यमंत्र्यांची निवड होईल 


फडणवीस मुख्यमंत्री होणं हे कार्यकर्त्यांना वाटू शकतं 


मला पण वाटतं भाजपचा मुख्यमंत्री व्हावा 


ज्यांच्या सोबत लढलो त्यांना विचारुन सोबत घेऊन निर्णय होईल

मातोश्रीवर नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीला थोड्याच वेळात सुरुवात

मातोश्रीवर नवनिर्वाचित आमदारांची थोड्याच वेळात बैठकीला सुरुवात


 उद्धव ठाकरे बैठकीमध्ये सर्व नवनिर्वाचित आमदारांसोबत चर्चा आणि मार्गदर्शन करणार


 महाराष्ट्रात शिवसेना ठाकरे गटाचे निवडून आलेले सर्व 20 आमदार  या बैठकीला उपस्थित राहणार आहेत 


वीस आमदारांसोबत काही महत्त्वाचे नेते सुद्धा या बैठकीला  उपस्थित राहतील

मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत देवेंद्र फडणवीस यांचे नाव सर्वात पुढे 


मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत देवेंद्र फडणवीस यांचे नाव सर्वात पुढे 


आज संध्याकाळी दिल्लीत होणाऱ्या वरीष्ठ नेत्यांच्या बैठकीत नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता 


निवडणुकीत भाजपला मिळालेले मोठे यश आणि फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील मिळालेल्या यशानंतर भाजपच्या वरीष्ठ नेत्यांकडून शिक्कामोर्तब होण्याची शक्यता


सूत्रांची माहिती

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राजीनामा दिलेला नाही, काँग्रेसची माहिती

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राजीनामा दिलेला नाही 


या संदर्भातील बातम्या असत्य असून खोडसाळपणे पसरवल्या जात आहेत

मुंबईच्याद पश्चिम द्रुतगती महामार्गावर विलेपार्ले येथे कारचा अपघात, दोन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

मुंबईच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर विलेपार्ले या ठिकाणी दारू पिऊन भरधाव वेगाने कार चालवत असल्यामुळे कारचा मोठा अपघात.


या अपघातात दोन अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी मृत्यू.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत निवडणूक संचलन समितीची बैठक


भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत निवडणूक संचलन समितीची बैठक


दुपारी १ वाजता भाजप प्रदेश कार्यालयात बैठक


भाजपच्या मोठ्या विजयानंतर विधानसभा निवडणुकीचा आढावा घेतला जाणार 


रावसाहेब दानवे, प्रवीण दरेकर यांच्यासह निवडणूक संचलन समितीचे पदाधिकारी उपस्थित राहणार

मनसेची आज चिंतन बैठक, मनसेच्या उमेदवारांची EVM बद्दल शंका

मनसेची आज चिंतन बैठक


मनसेच्या उमेदवारांची EVM बद्दल शंका


राज ठाकरे आज निवडणूक लढलेल्या मुंबईतील उमेदवारासोबत संवाद साधणार 


मुंबईतील निवडणूक लढून पराभूत झालेले उमेदवार शिवतीर्थवर


राज ठाकरे काय मार्गदर्शन करणार याकडे लक्ष


काही पराभूत झालेल्या उमेदवारांना ईव्हीएम बाबत शंका

देवेंद्र फडणवीसांच्या मुख्यमंत्रीपदाला वाढता पाठिंबा, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यानंतर अपक्षांचाही फडणवीसांना पाठिंबा

देवेंद्र फडणवीसांच्या मुख्यमंत्रीपदाला वाढता पाठिंबा


राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यानंतर अपक्षांचाही फडणवीसांना पाठिंबा


विधानसभेतील नवनिर्वाचित पाच आमदारांचा भाजपला पाठिंबा


राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार रत्नाकर गुट्टे, जनसुराज्य पक्षाचे आमदार विनय कोरे आणि अशोकराव माने, युवा स्वाभिमान पक्षाचे आमदार रवी राणा आणि अपक्ष आमदार शिवाजी पाटील यांचा भाजपला पाठिंबा


5 आमदारांच्या पाठिंब्यामुळे भाजपची संख्या 137 वर


महायुतीतील सर्वाधिक आमदारांची मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांना पसंती


भाजपनं आपल्या कोट्यातून ४ जागा मित्र पक्षांना सोडल्या होत्या, त्यापैकी ३ जागांवर विजय झाला असून तिन्ही आमदारांनी भाजपला पाठिंबा दिलाय

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आज बैठक, राज ठाकरे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडणार


महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आज बैठक


मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडणार


विधानसभा निवडणुकीत मनसेच्या पराभवानंतर राज ठाकरे आज नेत्यांना कान मंत्र देणार


पराभवाची कारणे आणि मंथन या बैठकीत केली जाणार

नाशिकमध्ये धक्कादायक घटना, पंचवटीत टोळक्याकडून युवकाचा खून

नाशिक ब्रेकिंग...


- पंचवटीत टोळक्याकडून युवकाचा खून...
- रात्री सव्वा दहा ते साडे दहाच्या सुमारास एका युवकाचा खून झाल्याची घटना...
- विशांत भोये या 29वर्षीय युवकाचा टोळक्याने खून केल्याची माहिती...
- आडगाव पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल 
- किरकोळ कारणातून खून झाल्याची माहिती...

राज्यात थंडीचा जोर आणखी वाढणार, नोव्हेंबरच्या शेवटाला आणि डिसेंबरच्या सुरुवातीला तापमान कमी होणार 

राज्यात थंडीचा जोर आणखी वाढणार 


नोव्हेंबरच्या शेवटाला आणि डिसेंबरच्या सुरुवातीला महाराष्ट्रातील तापमान कमी होणार 


मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात किमान तापमान १० अंशांखाली जाण्याचा अंदाज 


उत्तरेकडून वारे वाहण्याची शक्यता असल्याने थंडीचा जोर वाढणार

आजपासून संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात 

आजपासून संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात 


हिवाळी अधिवेशनात वक्फ विधेयक, सहकार विद्यापीठ विधेयक मंजुरीसाठी ठेवली जाणार

गोकुळकडून गाय दूध खरेदी दरात 3 रुपयांची कपात

गोकुळकडून गाय दूध खरेदी दरात 3 रुपयांची कपात


गोकुळ गायीच्या दुधाची 33 रुपयांनी खरेदी करत होते


आता गोकुळ गायीचे दूध प्रतिलीटर 30 रुपयांनी खरेदी करणार


पश्चिम महाराष्ट्रातील सर्वच दूध संघांनी खरेदी दरात कपात केल्याची माहिती


निवडणूक पार पडताच गोकुळचा शेतकऱ्यांना धक्का

पार्श्वभूमी

मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकीत (Vidhan Sabha Election 2024 Result) महायुतीला (Mahayuti) बहुमत मिळालं आहे. मतदारांनी महायुतीच्या पदरात मतांचं भरभरून दान दिलंय. अनेक जिल्ह्यात महाविकास आघाडीची दाणादाण उडाली आहे. दरम्यान, आता निवडणुकीच्या निकालानंतर राज्याचा नवा मुख्यमंत्री कोण होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्रिपदासाठी चेहरा निवडण्यासाठी महायुतीमध्ये सध्या चर्चा होत आहे. शिवेसना (शिंदे गट) पक्षाच्या नेत्यांना एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. तर दुसरीकडे आम्ही सर्वांत मोठा पक्ष असल्यामुळे आम्हालाच मुख्यमंत्रिपद मिळालं पाहिजे, अशी भूमिका भाजपाच्या नेत्यांनी घेतली आहे. त्यामुळे आता नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी नेमका कधी होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.