Maharashtra Breaking News Live Updates: महाराष्ट्रासह देशातील महत्त्वाच्या घडामोडींचे अपडेट्स, एका क्लिकवर
Maharashtra Breaking News Live Updates: राज्यासह देशात राजकीय घडामोडींसह अनेक घटना घडत आहेत.
वाल्मिक कराड, सुदर्शन घुले आणि प्रतीक घुले यांचे एकत्रित 29 नोव्हेंबरचे सीसीटीव्ही फुटेज झाले समोर...आवादा कंपनीकडे खंडणी मागितली त्या दिवशीचा CCTV समोर
केज शहरातील विष्णू चाटे यांच्या कार्यालयामध्ये वाल्मीक कराड 29 नोव्हेंबरला आला होता त्यावेळी त्याच्यासोबत सुदर्शन घुले प्रतिक घुले हे सुद्धा या फुटेजमध्ये पाहायला मिळत आहेत
विशेष म्हणजे केज पोलीस स्टेशनचे निलंबित पीएसआय राजेश पाटील हे सुद्धा यावेळी वाल्मीक कराड आणि सुदर्शन घुले सोबत दिसत आहेत
छत्रपती संभाजी नगरात मुख्य रस्त्यावर तरुणांची जीवघेणी स्टंटबाजी
स्टंटबाजी करण्यासाठी बुलेट वर उभे राहून दोन्ही हात रिकामे सोडून स्टंटबाजी
या स्टंटबाजीमुळे अपघातालाही दिले जात होते आमंत्रण
सोशल मीडियावर हा व्हिडिओ टाकून स्टंटबाज तरुणाचा प्रताप
छत्रपती संभाजी नगरातील मोंढा उड्डाणपूल पासून तर आकाशवाणी कार्यालयासमोर ही स्टंटबाजी
पोलीस या तरुणाला शोधण्याचा प्रयत्नात आहेत
अमरावती शहरात 18 दिवस रात्रंदिवस तब्बल 401 तास गायनाचा जागतिक रेकॉर्ड पूर्ण
18 दिवसांत कुठलाही खंड न पडता दिवस रात्र गायल्या गेले जवळपास 2600 गाणे.. यात 550 स्पर्धकांनी घेतला सहभाग..
स्वराध्या इंटरटेनमेंटचे अनोखे आयोजन..
गिनीज बुक ऑफ रेकॉर्डचे सीईओ पवन सोलंकी यांची उपस्थिती..
401 तास सतत गीत गायनाचा जागतिक विश्वविक्रमाची अमरावतीत नोंद झाल्याने आयोजकाकडून एकच जल्लोष..
यापूर्वी नागपूर मध्ये झाला होता 180 तास गायनाचा रेकॉर्ड..
बीड जिल्ह्यासह राज्यात अनेक ठिकाणी ठेवीदारांच्या ठेवी परत करण्यात अपयश आल्याने गुन्हे दाखल झालेल्या 'जिजाऊ माँसाहेब' मल्टिस्टेटच्या चेअरमन आणि इतर पदाधीकाऱ्यांच्या विरोधात एमपीआयडीखाली कारवाईला सुरुवात झाली आहे. यासाठी राज्याच्या गृह विभागाने बीडच्या उपविभागीय अधिकाऱ्यांना प्राधिकृत केले असून आता हे अधिकारी संबंधितांच्या मालमत्ता जप्त करून त्यातून ठेवीदारांच्या ठेवी परत करण्यासाठी पाऊले उचलणार आहेत.
जोतिबा डोंगरावरील प्रसादाच्या कुंद्यात आढळलं ब्लेडचं पान
जोतिबा डोंगरावरील शिवाजी पुतळा परिसरातल्या मिठाई दुकानातून घेतलेल्या प्रसादा मध्ये ब्लेड
संबंधित दुकानदारासह अन्न औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांवर देखील कारवाईची मागणी
माजी ग्रामपंचायत सदस्य सुनील नवाळे यांनी केली मागणी
याआधी जोतिबा डोंगरावरील दुकानात आढळले होते भेसळयुक्त पेढे
बेकायदेशीर रित्या गॅस सिलेंडर भरून विकणाऱ्या विरुद्ध नंदुरबार पोलिसांची धडाक कार्यवाही......
नंदुरबार शहरातील गजबजलेल्या वस्तीत सुरू होता गॅस सिलेंडरचा काळा धंदा.....
कार्यवाहीत 1 लाख 2 हजार रुपये किमतीचे 62 गॅस सिलेंडर वजन काट्यांसहित मुद्देमाल जप्त....
बेकायदेशीर गॅस सिलेंडर भरणाऱ्या दोघांविरुद्ध नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल....
नशा करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या मेफेनटर्माइन इंजेक्शनचा सांगलीत मोठा साठा जप्त
मेफेनटर्माइन इंजेक्शनच्या तब्बल 1507 बॉटल पोलिसांनी केल्या जप्त, 10 मिलीच्या सर्व बॉटल
एकूण 14 लाख 46 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
मिरज मधील महात्मा गांधी चौक पोलिसांची कारवाई
इंजेक्शनचा विक्री व साठा केल्याप्रकरणी आतापर्यंत 3 जणांना अटक, आरोपीमधील एकाचे स्वतःचे मेडिकल
यामागे मोठे रॅकेट असण्याची पोलिसांनी व्यक्त केली शक्यता, रॅकेट पर्यत पोचण्याचे पोलिसांचे प्रयत्न
पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांची कारवाई
वाशिम- गौण खनिजाची छुप्या मार्गाने तस्करी करणाऱ्या वाहनावर वाशिमच्या महसूल प्रशासनाने धडक कारवाई करत तीन टिप्पर आणि एका ट्रॅक्टर वर कारवाई करत पाच लाख रुपयाचा दंड केला आहे.. गेल्या अनेक दिवसापासून वाशिम परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात रात्रीच्या सुमारास अवैध खनिजाची तस्करी होत असल्याची माहिती महसूल प्रशासनाला मिळाली होती यावर तत्काळ कारवाई पथक द्वारे कारवाई करत चार वाहन पकडून ही कारवाई करण्यात आली आहे. येत्या काळात अवैध गौण खनिज मोहीम विरोधात कारवाई सुरू राहणार असल्याची माहिती प्रशासनाकडून मिळाली आहे.
भांडुप पोलीस स्टेशन अंतर्गत ड्रीम्स मॉलच्या बेसमेंट या ठिकाणी पाण्यात एक अनोळखी महिला वय वर्ष 30 ते 35 हिचा 09.40 चे सुमारास मृतदेह मिळून आला आहे. सदरचा मृतदेह मुलुंड जनरल हॉस्पिटल या ठिकाणी भांडुप वन मोबाईलच्या मदतीने पाठवण्यात आला आहे. मृत महिलेच्या नातेवाईकांचा शोध घेणे चालू आहे.
मोटार वाहन परिवहन विभाग आणि इंदापूर पोलीस यांच्या संयुक्त विद्यमान पुण्याच्या इंदापूर शहरातून सुरक्षा अभियानांतर्गत जनजागृती रॅली काढण्यात आलीय.यामध्ये आय कॉलेज आणि विद्या प्रतिष्ठानच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता. यावेळी विद्यार्थ्यांनी हातामध्ये होर्डिंग घेऊन नागरिकांना वाहतुकीचे नियम पाळण्यासंदर्भात आवाहन केलंय.
राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरील विविध क्रीडा स्पर्धांमध्ये नाशिकचा झेंडा रोवणाऱ्या 49 खेळाडूंना नाशिक महापालिकेतर्फे क्रीडा शिष्यवृत्ती मंजूर करण्यात आलीये...यासंदर्भातील 7.97 लाखांच्या खर्चास आयुक्त तथा प्रशासक मनीषा खत्री यांनी मान्यता दिलीये... क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी नाशिक महापालिकेच्या माध्यमातून क्रीडा धोरणाची अंमलबजावणी केली जात आहे. क्रीडाविषयक कामांसाठी दरवर्षी महापालिकेच्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकातील पाच टक्के निधी राखीव ठेवण्यात येतो. याअंतर्गत महापालिका क्षेत्रातील ज्या खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व राज्य स्तरावरील स्पर्धांमध्ये प्रावीण्य मिळवून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे विजेतेपद पटकाविले आहे, अशा खेळाडूंना क्रीडा शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.
संभाजीनगर मधील ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि इतर पक्षातील कार्यकर्त्यांचा आज भाजपात पक्ष प्रवेश करणार
आज दुपारी दीड वाजता प्रदेश कार्यालयात मंत्री आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मंत्री अतुल सावे यांच्या उपस्थित प्रवेश होणार
गुलेन बॅरी सिंड्रोम या आजारावर पालिका सतर्क
आज आरोग्य विभागाने बोलावली तातडीची बैठक
यावर आढावा घेतला जाणार आहे
नेमक या आजारावर उपाय काय यावर एक्सपर्ट टीम सोबत बैठक घेण्यात येणार आहे
नाशिकच्या हुतात्मा अनंत कान्हेरे अर्थात गोल्फ क्लब मैदान येथे तब्बल सहा वर्षानंतर रणजी क्रिकेटचा करंडक खेळवला जाणार आहे... बीसीसीआय आणि नाशिक क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून या ठिकाणी तयारी पूर्ण झाली असून महाराष्ट्र आणि बडोदा या दोन संघांमध्ये 23 तारखेपासून सामना रंगणार आहे या सामन्यासाठी खेळपट्टी सज्ज झाली असून जवळपास दहा हजार प्रेक्षक या मैदानात बसतील अशा पद्धतीची देखील व्यवस्था करण्यात आली आहे.
दोन दिवसांपूर्वी बीड जवळील घोडका राजुरी येथे पोलीस भरतीचा सराव करण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या भरधाव एसटीने तीन तरुणांना चिरडले होते. या अपघातात तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. याची गंभीर दखल एसटी महामंडळाने घेत कुलदीप मुसळे या बस चालकाला एसटी सेवेतून निलंबित केले आहे. तर मृत तरुणाच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीवरून बस चालका विरोधात पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
तळोदा तालुक्यातील रांझणी कृषी विद्यालय परिसरातून बिबट्या जेरबंद करण्यात वन विभागाला यश आलं आहे गेल्या आठवड्याभरापासून वन विभाग या बिबट्याचा शोधात असून अखेर बिबट्या पिंजऱ्यात कैद झाला आहे. तळोदा तालुक्यात आता 13 बिबटे जेरबंद करण्यात आले असून बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यामुळे नागरिकांचा रोष वाढला असून बिबट्यांचे कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात येत आहे....
ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखांची 24 जानेवारीला शिवसेना भवन येथे बैठक...
राज्यातील सर्व जिल्हाप्रमुखांना बैठकीला शिवसेना भवन येथे उपस्थित राहण्याचे आदेश...
सर्व जिल्हाप्रमुखांना उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार
23 जानेवारी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त अंधेरी येथे मेळावा होणार असून या मेळाव्याला मुंबईतील पदाधिकारी कार्यकर्ते आणि राज्यातील जिल्हाप्रमुख उपस्थित राहणार आहेत
तर दुसऱ्या दिवशी शिवसेना भवन येथे उद्धव ठाकरे सर्व जिल्हाप्रमुखांना मार्गदर्शन करणार आहेत...
23 तारखेच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे काय भूमिका मांडतात हे पाहणं महत्वाचं असेल... आगामी महानगर पालिका निवडणुका स्वबळावर लढाव्या असं पदाधीकाऱ्यांच म्हणणं आहे त्यामुळे मेळाव्याला महत्व आहे
तसेच विधानसभा निवडणुकीतील मोठ्या पराभवानंतर राज्यातील सर्व जिल्हाप्रमुखांना उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत
- नवाब मलिक यांच्या विरोधात ॲट्रोसीटीचा गुन्हा दाखल असताना पोलिस कारवाई करत नाही. शिवाय हे प्रकरण सीबीआयकडे द्यावे अशी समिर वानखेडे यांनी केली होती मागणी.
- त्यावर कोर्टाने पोलिसांना दिले होते चौकशीचे आदेश
- चौकशी अंती पोलिसांनी सी समरी दाखल केली आणि न्यायालयाने समिर वानखेडे यांची याचिका फेटाळली.
ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाची समोरून येणाऱ्या कंटेनरला धडक.
घोटी सिन्नर महामार्गावरील एस एम बी टी हॉस्पिटल जवळ अपघात.
या अपघातामध्ये रिक्षा चालक अमोल विनायक घुगे राहणार कल्याण यांचा मृत्यू.
स्वरा अमोल घुगे या चार वर्षाच्या मुलीचा देखील मृत्यू.
मार्तंड पिराजी आव्हाड वय 60 यांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे.
जखमींना एसएमबीटी हॉस्पिटल या ठिकाणी उपचारार्थ दाखल करण्यात आल आहे.
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) मधून अमेरिकेला बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू करण्यासाठी ट्रम्प यांनी कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी केली. त्यामुळे अमेरिका जगातील आरोग्य संघटनेचा भाग असणार नाही.
दहिसरमध्ये पुन्हा एकदा सुरू झाला हिंदी मराठी भाषेचा वाद झाला असल्याची माहिती समोर आली आहे. दोन परप्रांतीय बाऊन्सर्सनी मराठी बोलण्यास नकार दिला, त्यानंतर मनसेने त्यांचा समाचार घेतला आहे. दहिसर येथील एका हॉटेलमध्ये एक मराठी माणूस गेला असता तेथे परप्रांतीय बाऊन्सर उभे होते. त्यानंतर बाऊन्सर आणि मराठी माणूस यांच्यात मराठी बोलण्यावरून वाद सुरू झाला. दोन्ही बाऊन्सर्सनी मराठी बोलण्यास आणि समजण्यास नकार दिल्याने मनसे कार्यकर्त्यांनी दोन्ही बाऊन्सरची दखल घेतली. त्यानंतर दोन्ही परप्रांतीय बाऊन्सरनी मराठीत माफी मागितली आहे.
पुण्यात गुईवेल सिंड्रोमचे 22 संशयित रुग्ण.
आय सी एम आर एन आय व्ही ला तपासणीसाठी नमुने पाठवले.
एन आय व्हीचा रिपोर्ट आल्यानंतर ज्या भागात हे रुग्ण आढळले आहे त्या भागात टीम दाखल करणार आहे.
हा एक न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे जो एक लाखांमध्ये एका व्यक्तीला आढळतो.
वेगळ्या पद्धतीच्या वॅक्सिन्स घेतल्या असेल किंवा एच वन एन वन च्या वॅक्सिंग घेतल्या असेल तर काही प्रमाणात हा दुर्मिळ आजार लोकांना होऊ शकतो.
याचा निदान करण्यासाठी स्पाइनल फ्लूड ची चाचणी केली जाते.
उपाय म्हणून प्लाजमा एक्सचेंज सारखे उपचार केले जातात.
हा आजार दुर्मिळ असला तरीही धोकादायक नाही.
पुणे शहरातील ६ आणि बाकी रुग्ण हे जिल्ह्यातील आहेत.
आरोग्य प्रमुख नीना बोराडे यांनी माहिती दिली.
रुग्ण उपचारासाठी पुण्यात आलेले होते पुण्याच्या बाहेरील हे रुग्ण आहेत.
हा आजार संसर्गजन्य नाही.
या रुग्णांची तपासणी केली जात आहे.
ज्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते त्या परिसरातही रुग्णांची तपासणी केली जाणार आहे.
आष्टीत एचआयव्हीच्या अफवेमुळे संपूर्ण कुटुंबाला वाळीत टाकल्याचा धक्कादायक प्रकार
अफवा पसरविण्यात आरोग्य विभाग आणि पोलिसांचा हात असल्याचा कुटुंबाचा आरोप
मुलीचा एचआयव्हीमुळे मृत्यू झाल्याची खोटी माहिती पोलिसांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितल्यामुळे कुटुंबाची समाजात झाली बदनामी
वाळीत टाकल्यामुळे मयत मुलीच्या कुटुंबातील महिलेने दोन वेळा आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा कुटुंबाचा दावा
पीडित कुटुंबाची डॉक्टरांनी पोलीस कर्मचारी विरोधात जिल्हाधिकार्यकदे तक्रार
वैद्यकीय अधिकारी यांनी सर्व आरोप फेटाळले
1 रुपयांत पिक विमा योजनेत गैरव्यवहार झाल्याचं प्राथमिक दृष्ट्या निदर्शनास
या प्रकरणी मागच्या 2 दिवसांपूर्वी कहीजणांवर कारवाई देखील करण्यात आली
जर पिक विमा योजनेबाबत काही बदल करायचे असतील तर आम्ही त्याचा अभ्यास करू आणि तत्काळ कॅबिनेट मधे हा विषय मांडू
या योजनेबाबत सर्वस्वी निर्णय कॅबिनेट मधेच होईल
कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांची एबीपी माझाला माहिती
दहावी बारावी बोर्डाकडून यंदा कॉपीमुक्त अभियान राबवले जाताय... हे कॉपीमुक्त अभियान राबवत असताना या सप्ताहात विविध उपक्रम बोर्डाकडून हाती घेण्यात आले आहेत... ज्यामध्ये आम्ही कॉपीमुक्त परीक्षा देऊ अशा प्रकारची विद्यार्थी सर्व शाळांमध्ये प्रतिज्ञा घेत आहेत... आज राज्यातील अनेक शाळांमध्ये कॉफी मुक्त परीक्षा देत असताना कुठल्याही गैरमार्गाचा वापर आम्ही परीक्षा देताना करणार नाही अशी शपथ विद्यार्थ्यांनी घेतली... सायन मधील लिटिल एंजल हायस्कूल मध्ये सुद्धा विद्यार्थ्यांनी कॉपीमुक्त परीक्षेची शपथ घेतली.
शरद पवार आज पुण्यात
शरद पवार पुण्यातील मोदी बागेत असणाऱ्या त्यांच्या कार्यालयात दाखल
मोदी बागेत शरद पवार कार्यकर्त्यांच्या घेणार भेटीगाठी
तर दुपारी तीन वाजता शरद पवार सारथी संस्थेला देणार भेट
पश्चिम रेल्वेच्या वैतरणा रेल्वे स्थानकावर रेल्वे ट्रॅकला तडा. मुंबईकडे येणाऱ्या अप लाईंवरील रेल्वे ट्रॅकला तडा. मुंबईकडे येणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्यांवर परिणाम. वेळीच घटना लक्षात आल्याने मोठी दुर्घटना टळली. रेल्वे ट्रॅक बदलण्याचं काम रेल्वे प्रशासनाकडून हाती . अप लाईन वरील गाड्यांच वेळापत्रक खोळंबणार . गुजरात कडून येणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या पालघर जिल्ह्यातील इतर रेल्वे स्थानकांवर थांबल्या.
ताडोबातील रेस्क्यू टीमसह धाराशिव आणि सोलापूर वन विभागाकडून गेल्या सात दिवसापासून वाघाचा शोध सुरू आहे. जंगलात दररोज वीस ते पंचवीस किलोमीटरची पायपीट करत ही शोध मोहीम सुरू आहे. त्यासाठी जंगल परिसरात सापळेही लावण्यात आलेत. मात्र सात दिवसापासून वाघ गुंगारा देत असून आता वाशी तालुक्यातील वडजी इथ वाघाने एका गाईची शिकार केली. वाघ वारंवार त्याचे ठिकाण बदलत असल्याने वनविभागाला शोध मोहिमेत अपयश येत आहे. वडजीत इथ वाघाने गाईवर हल्ला केल्याने आता त्या परिसरात शोध घेतला जाणार आहे.
मालेगाव शहरात दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांमध्ये झालेल्या वाढीला आळा घालत दुचाकी चोरीवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे..या कारवाईत गुन्हे शाखेने पाच अट्टल चोरट्यांना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून 20 लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये जवळपास 45 दुचाकी जप्त केल्या आहेत.आठवडाभरात मालेगावात एकूण 90 पेक्षा जास्त दुचाकी जप्त करण्यात आल्या असून शहरातील विविध भागात ही कारवाई करण्यात आली..छावणी पोलिस ठाणे आणि स्थानिक गुन्हे शाखा यांनी केलेली ही सगळ्यात मोठी कारवाई मानली जात आहे.
शक्तिपीठ महामार्ग विरोधात धाराशिव येतील बाधित शेतकरीही आक्रमक पवित्र्यात आहेत. महामार्ग रद्द झालाच पाहिजे अशी मागणी बाधित शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबसे यांच्याकडे केली आहे. हा महामार्ग रद्द न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे. शक्तिपीठ महामार्गासंदर्भात सरकारने हालचाली सुरू केल्या असून दुसरीकडे या महामार्गाला शेतकऱ्याकडून विरोध होतानाचे दिसत आहे. बाधित शेतकऱ्यांच्या वतीने 26 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनही करण्यात येणार आहे.
सैफ अली खान हल्ला प्रकरण.
आरोपीने मोहम्मदने सिमकार्ड खरेदी करण्यासाठी पश्चिम बंगालचे सिमकार्ड वापरल्याचे समोर.
आरोपीने बांगलादेशमधून येऊन काही काळ पश्चिम बंगालमध्ये वास्तव्य केले होते.
तिथून आधारकार्ड बनवून घेतल्यानंतर त्याने सिमकार्ड खरेदी केले आणि त्यानंतर मुंबईला आला.
आरोपी मोहम्मदने खुखुमोनी जहांगीर शेख या नावाने घेतले होते सिमकार्ड.
बांगलादेशमधून मेघालयमधल्या डावकी नदी ओलांडून आरोपी आला होता पश्चिम बंगालमध्ये.
मुंबईतल्या अमित पांडे नावाच्या इसमाने त्याला इथे कंत्राटी पद्धतीने काम मिळवून देण्यात मदत केली असल्याचेही समोर आले आहे.
मध्यरात्री खामगाव शहरातील बाळापुर फैल परिसरात दोन गटात राडा होऊन तणाव निर्माण झाला होता. मात्र पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत परिसरात धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. परिसरात सध्या शांतता असून पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. प्रेम प्रकरणातून दोन परिवारातील भांडणाच स्वरूप राड्यात झाल्याचं पोलिसांनी सांगितलं.
नाशिक पालकमंत्री पदासाठी भाजपच आग्रही
भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि गिरीश महाजन यांच्यात नाशिकचे पालक मंत्री पद भाजपकडे ठेवण्यावर चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती
गिरीश महाजन यांनाच पुन्हा नाशिकचे पालकमंत्री करण्यावर भाजपचे नेतृत्व ठाम
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याशी नाशिक पालकमंत्री पदाबाबत स्वतः बोलणार
आगामी सिंहस्थ कुंभमेळा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर पालकमंत्री पद भाजप स्वतःकडे ठेवण्याची शक्यता
कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियानंतर मेघा बनारसे या महिलेची प्रकृती बिघडली आणि उपचारादरम्यान तिचा दोन महिन्यानंतर मृत्यू झाला. यामुळं संतप्त कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी तिचा मृतदेह रविवारी दुपारी रस्त्यावर ठेवून रात्री उशिरापर्यंत आंदोलन केल्याचा प्रकार भंडाऱ्याच्या विरली इथं घडला होता. याप्रकरणी दोन डॉक्टरांच्या निलंबनाचा प्रस्ताव मंत्रालयाकडं पाठविण्यात आला आहे.
रायगडच्या उरण मधील मोरा येथील फड क्रमांक 5 परीसरात राहणाऱ्या एका 3 वर्षीय चिमुरडीवर तिच्याच शेजारी राहणाऱ्या एका 50 वर्षीय नराधमाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दिनेश निवेतकर अस या आरोपीचे नाव असून त्याला उरणच्या मोरा सागरी पोलीसांनी अटक करून त्याच्यावर बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राज्यात विविध जातींसाठीच्या आरक्षणाच्या प्रश्नांनी गेल्या काही महिन्यात राजकीय व सामाजिक वातावरण ढवळून निघाले आहे. मात्र असे असताना आरक्षण मिळालेल्यांना त्यांचे जात वैधता प्रमाणपत्र (कास्ट व्हॅलेडीटी) मिळण्याच्या प्रक्रियेकडे सरकारचा प्रचंड दुर्लक्ष असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. राज्यातील 36 जात वैधता प्रमाणपत्र समित्यांपैकी तब्बल 32 समित्यांवर सध्या अध्यक्षच नसल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.
जेष्ठ किर्तनकार , ह. भ.प. किसन महाराज साखरे यांचे आळंदी येथे निधन .वयाच्या 91 व्या वर्षी उपचारादरम्यान हृदयविकाराच्या झटक्यामुळे त्यांची प्राणज्योत मावळली. संत वांडमयावर पी एच डी करणार्या विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन केले होते.
सैफ अली खान हल्ला प्रकरणातील आरोपी शेहजादला सिनरिक्रिएशनसाठी घेऊन गेले सैफच्या घरी
सैफ अली खानवर हल्ला करून आरोपी कसा पळाला, वांद्रे स्थानक पर्यंत कसा पोहचला त्या त्या ठिकाणी पोलिस आरोपीला घेऊन त्याची माहिती घेत आहेत
सैफच्या इमारतीत प्रवेश करताना आरोपी कुठल्याही कॅमेऱ्यात दिसत नाही आहे.
मग तो सैफच्या घरात पोहचला कसा याचा तपास पोलिस करत आहेत
पार्श्वभूमी
Maharashtra Breaking News Live Updates: राज्यासह देशात राजकीय घडामोडींसह अनेक घटना घडत आहेत. सैफ अली खानवरील प्राणघातक हल्ल्यावरील चौकशीत धक्कादायक माहिती समोर येत आहे. तर पालकमंत्रिपदावरुन राज्याचं राजकारण तापल्याचं दिसून येत आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -