Maharashtra Breaking Updates LIVE : पुणे शहरातील कोथरूड परिसरात अपघात, 36 वर्षीय महिलेचा मृत्यू, दोन जण जखमी

Breaking News Live Updates : महाराष्ट्र, देश-विदेशातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीचे लाईव्ह अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

प्रज्वल ढगे Last Updated: 09 Sep 2024 02:11 PM
महायुतीच्या जागा वाटपामध्ये प्रत्येकाचा सन्मान राखला जाईल, अमित शाहांची खात्री

महायुतीच्या जागा वाटपामध्ये प्रत्येकाचा सन्मान राखला जाईल याची खात्री अमित शाह यांनी महायुतीतील इतर घटक पक्षांच्या नेत्यांना दिली 


ज्या जागा निवडून येतील त्याचा लवकरात लवकर आढावा घेऊन एकत्रित बैठक करण्याच्या शाह यांच्या सूचना 


पुढील महायुतीच्या नेत्यांची पुन्हा दिल्लीत बैठक पार पडणार 


जागा वाटपांबाबत दिल्लीत अंतीम चर्चा होण्याची दाट शक्यता 


महायुतीच्या नेत्यांची एकुण 45 मिनिटं अमित शाह यांच्यासमवेत चर्चा 


सूत्रांची माहिती

कर्जत नेरळमधील तिहेरी हत्याकांडाप्रकरणी तीन जण ताब्यात

रायगड - कर्जत नेरळ मधील तिहेरी हत्याकांडाप्रकरणी तीन जण ताब्यात


हत्येचा संशय असल्याने नेरळ पोलीसांनी घेतले तिघांना ताब्यात


चौकशी सुरू


ताब्यात घेतलेले तिघेही मयतांचे नातेवाईक

जयंत पाटील आज पुण्यात, पत्रकार संघात देणार व्याख्यान

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आज पुण्यात 


पुण्यातील पत्रकार संघात जयंत पाटलांच व्याख्यान 


श्रमिक पत्रकार संघाच्या व्हिजन २०५० या कार्यक्रमात जयंत पाटील यांची हजेरी. जयंत पाटील काय बोलतात याकडे सगळ्यांचे लक्ष..

शरद पवारांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेणं म्हणजे ढोंगीपणा- प्रविण दरेकर

शरद पवारांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेणं म्हणजे ढोंगीपणा


एकीकडे ज्ञानेश्वर महाराव यांच्या उपस्थितीत हिंदू देवतांचा अपमान ऐकायचा आणि दुसरीकडे दर्शनासाठी यायचं हे ढोंग आहे


भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांची शरद पवार यांच्यावर टीका


ज्ञानेश्वर महाराव यांनी पवारांच्या उपस्थितीत हिंदू देवतांबद्दल आक्षेपार्ह टीका केल्याचाही समाचार

पिंपरी चिंचवडमध्ये ऐन गणेशोत्सवात एकाची हत्या

पिंपरी चिंचवडमध्ये ऐन गणेशोत्सवात एकाची हत्या झाल्याचं उघडकीस आलंय. काळेवाडीतील फुटपाथवर दोन बेंचच्या मध्ये हा मृतदेह आज सकाळी आढळलाय. मृतदेहाच्या लगत रक्ताने माखलेला सिमेंटचा गठठू असल्यानं ही हत्याचं असेल त्याच दिशेने पोलिसांचा तपास सुरुये. मध्यरात्री तीनच्या नंतर ही घटना घडल्याचा वाकड पोलिसांचा अंदाज आहे. अद्याप मृतदेहाची ओळख पटलेली नाही, ती ओळख पटली की हत्या करणारा कोण हे उघड होणार आहे. वाकड पोलीस त्याच दिशेने सध्या तपास करतायेत.

मनोज जरांगे यांना अब्दुल सत्तार यांचा फोन

अल्पसंख्यांक मंत्री अब्दुल सत्तार यांनी मनोज जरांगे यांच्याशी फोनवरून चर्चा केलीय. काही दिवसापूर्वी मनोज जरांगे यांची अंतरवलीमध्ये जाऊन सत्तार यांनी भेट घेतली होती. दरम्यान जरांगेंच्या मागण्याबाबत आपण मुख्यमंत्र्यांशी बोलणार असल्याचं म्हटलं होतं, आज  फोनवर सत्तार यांनी दोघांच्या बातचीतीचा आढावा सरकारसमोर मांडल्याची माहिती मनोज जरांगे यांनी दिली. शेतकऱ्यांना मदत, आरक्षणाचा विषय याबरोबर शिंदे समितीने पुरावे शोधण्याचे काम कराव याबाबत चर्चा झाल्याचे देखील मनोज जरांगे यांनी सांगितलं.

अजित पवार अमित शहांच्या दौऱ्यात नसल्यानं चर्चांना उधाण

अजित पवार अमित शहांच्या दौऱ्यात नसल्यानं चर्चांना उधाण


अजित दादा यांची गैरहजेरी चर्चेचा विषय 


अमित शहांचा मुंबई दौरा, अजित दादांची गैरहजेरी का?


सध्या अजित पवार मुंबईतील देवगिरी निवासस्थानी असल्याची माहिती

अजित पवारांची आजच्या जीएसटी कौन्सिलच्या बैठकीला दांडी 

अजित पवारांची आजच्या जीएसटी कौन्सिलच्या बैठकीला दांडी 


अजित पवार महायुतीत सहभागी झाल्यानंतर केवळ एकदाच बैठकीला ऑनलाईन उपस्थित 


अजित पवार मागील बैठकीला उपस्थित न राहिल्याने शरद पवार गटाने अजित पवारांवर निशाणा साधला होता 


आज पुन्हा अजित पावर बैठकीसाठी अनुपस्थित 


केंद्रिय गृहमंत्री अमित शाह आल्यामुळे अजित पवार बैठकीला गेले नसल्याची अजित पवार यांच्या कार्यालयाची माहिती 


आज पुन्हा अजित पवार यांच्या ऐवजी अदिती तटकरे बैठकीसाठी दिल्लीला गेल्याची सूत्रांची माहिती

पुणे शहरातील कोथरूड परिसरात अपघात, 36 वर्षीय महिलेचा मृत्यू, दोन जण जखमी

पुणे शहरातील कोथरूड परिसरातील पौड रोडवर रविवारी रात्री सव्वानऊच्या सुमारास टेम्पो ट्रकने तीन वाहनांना धडक दिल्याने झालेल्या अपघातात 36 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला, तर दोन जण जखमी झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रकचालक मद्यधुंद अवस्थेत होता.


गीतांजली अमरले असे मृत महिलेचे नाव असून पती संभाजी अमरले व साहोळ पायले हे जखमी झाले आहेत. रेड लाईटवर थांबविण्यात आलेल्या या अपघातात एक रिक्षा आणि एका कारसह एकूण चार वाहनांचे नुकसान झाले आहे.


आरोपी चालक आशिष पवार (२६) याला अटक करण्यात आली असून त्याच्यावर भारतीय दंड विधान कलम १०५ आणि मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती डीसीपी संभाजी कदम यांनी दिली.

राहुल गांधी व प्रियांका गांधी यांच्या राज्यात विक्रमी सभा होणार- नितीन राऊत

नितीन राऊत 


राहुल गांधी व प्रियांका गांधी यांच्या यावेळेस विधासभा निवडणुकीत विक्रमी सभा होणार आहे


यासोबतच सोनिया गांधी यांच्या मुंबईसह राज्यात एक ते दोन सभा व्हाव्या यासाठी आमचा प्रयत्न आहे


राहुल गांधी स्वता महाराष्ट्राच्या निवडणुकीला घेऊन खूप उत्साही असल्याचे काँग्रेसचे जेष्ठ नेते नितीन राऊत यांनी सांगितले.


 

पुणे शहरात डेंग्यू आणि चिकनगुनिया आजारांच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ

पुणे


डेंग्यू, चिकनगुनिया वाढला आणि प्लेटलेट्सची ही वाढली मागणी


पुणे शहरात डेंग्यू आणि चिकनगुनिया आजारांच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ


परिणामी रुग्णांच्या प्लेटलेट्स ची संख्या कमी होत आहे


सर्वच रुग्णालयांमध्ये तसेच रक्तपेढ्यांमध्ये प्लेटलेट्स च्या मागणीमध्ये झाली वाढ 


रक्तदान शिबिरे कमी झाल्याने रक्ताची कमतरता

शरद पवार लालबागच्या राजाच्या दर्शनाला

शरद पवार लालबागच्या राजाच्या दर्शनाला एकदा मुख्यमंत्री असताना आले होते 


त्यानंतर अनेक वर्षांनंतर लालबागच्या राजाच्या दर्शनाला दाखल झाले आहेत 


सोबतच, कोरोना काळात रक्तदान शिबिराचं आयोजन लालबागच्या राजाच्या मंडळानं केलं होते त्यावेळी देखील आले होते 


मात्र, त्यावर्षी गणपतीची स्थापना करण्यात आली नव्हती. फक्त रक्तदान शिबिराचं आयोजन केलं गेलं होतं

शरद पवार लालबागच्या दर्शनाला

शरद पवार लालबागच्या राजाच्या दर्शनाला एकदा मुख्यमंत्री असताना आले होते 


त्यानंतर अनेक वर्षांनंतर लालबागच्या राजाच्या दर्शनाला दाखल झाले आहेत 


सोबतच, कोरोना काळात रक्तदान शिबिराचं आयोजन लालबागच्या राजाच्या मंडळानं केलं होते त्यावेळी देखील आले होते 


मात्र, त्यावर्षी गणपतीची स्थापना करण्यात आली नव्हती. फक्त रक्तदान शिबिराचं आयोजन केलं गेलं होतं

सोलापुरात आमदार राजेंद्र राऊत यांच्या विरोधात मराठा समाज आक्रमक, राजेंद्र राऊतांच्या प्रतिमेला जोडेमारो आंदोलन  

सोलापुरात आमदार राजेंद्र राऊत यांच्या विरोधात मराठा समाज आक्रमक, राजेंद्र राऊतांच्या प्रतिमेला जोडेमारो आंदोलन करीत केला निषेध 


- बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांच्या विरोधात सोलापुरात मराठा समाज आक्रमक 


- आमदार राजेंद्र राऊत हे सतत मनोज जरांगे पाटलांवर आरोप करत असल्याने करण्यात आले आंदोलन


- उत्तर सोलापूर तालुक्यातील कोंडी येथील मराठा समाज बांधव एकत्रित येत राजेंद्र राऊत यांच्या प्रतिमाला केले जोडे मारो आंदोलन 


- आमदार राजेंद्र राऊत यांची वक्तव्य अशीच सुरू राहिल्यास गनिमी काव्याने उत्तर देण्याचा इशारा

गुजरात एसीबीच्या पोलिसांकडून मुंबई पोलीस दलातील सहाय्यक पोलीस निरीक्षकास अटक

गुजरात एसीबीच्या पोलिसांकडून मुंबई पोलीस दलातील सहाय्यक पोलीस निरीक्षकास(API)  अटक


१० लाखांची लाच मागितल्या प्रकरणी API ला अटक


माटुंगा पोलिस ठाण्यातील दिगंबर पगार यांच्यावर अटकेची कारवाई


गुजरातच्या राजकोट येथील सायबर गुन्ह्यातील आरोपीला अटक न करण्यासाठी मागितली लाच


API दिगंबर पगार याच्यावर सापळा करवाई करून करणात आली अटक


 अटकेच्या कारवाईनंतर API दिगंबर पगार यांच्यावर मुंबई पोलिस दलाकडून निलंबनाची करण्यात आली कारवाई

पार्श्वभूमी

मुंबई :  विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात सध्या मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर टोकाची टीका करताना दिसत आहेत. दुसरीकडे सध्या राज्यात गणेशोत्सवाची धूम आहे. सगळीकडे गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय. राज्यात काही ठिकाणी पावसाने उसंत घेतली आहे. तर काही ठिकाणी पावसाच्या सरी बरसत आहेत. या प्रमुख घडामोडींसह राज्य, देश तसेच जगभरातील इतरही महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर...

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.