Maharashtra Breaking LIVE : पंतप्रधान नरेंद्र मोदी जुलै महिन्यात मुंबई दौऱ्यावर, विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकणार
Maharashtra Breaking News: राज्यासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे वेगवान अपडेटस् आणि बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा...
Chandrapur : चंद्रपुरात ब्रह्मपुरी शहराजवळच्या मालडोंगरी गावात विहिरीत आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणीला पोलीस बचाव पथकाने वाचविले
अज्ञात व्यक्तीने पोलीस कंट्रोल रूम वर 112 डायल करून घटनेची दिली माहिती,
पोलीस पथकाने मालडोंगरी ग्रामपंचायतच्या मागे असलेल्या विहिरीकडे घेतली धाव,
विहिरीतील लोखंडी रिंगला पकडून असलेल्या मुलीची समजूत काढून तिला बाहेर काढत पोलिसांनी घरी केले रवाना
Amaravati : शेअर मार्केट तसंच क्रिपटो करन्सीच्या नावाखाली दिड कोटीची सायबर फसवणूक करणारे आंतरराष्ट्रीय टोळीचे 5 आरोपी गजाआड...
27 जून रोजी एका दाम्पत्यांनी तक्रार दिली
त्यांना वेगवेगळ्या नंबर वरून कॉल करून सांगण्यात आले की तुम्ही 4 कोटी रुपये कमवले..
ते पैसे काढण्यासाठी टीडीएस आणि वेगवेगळ्या कारणाने तब्बल 1 करोड 53 लाख 77 हजार 824 रुपये ट्रान्सफर केले..
वारंवार पैसे मागून न मिळाल्याने त्यांची फसवणूक झाली असं कळल्यावर त्यांनी अमरावती सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली..
Khalapur : खालापूर मधील मोरबे धरण प्रकल्पग्रस्तांनी आज या संपूर्ण परिसरात मोर्चा काढला
धरणाच्या मुख्य गेटवर येथील स्थानिकांनी आक्रोश करत मुख्य गेट तोडून आत मध्ये जाण्याचा प्रयत्न केला
जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी संबंधित अधिकारी येथे पोहोचत नाहीत
तोपर्यंत आम्ही इथून कुठेही जाणार नाही अशी ठोस भूमिका येथील स्थानिकांनी घेतलेली पहायला मिळते
मोरबे धरण प्रकल्पग्रस्तांचा हा आक्रोश आणखी तापण्याची शक्यता आहे
Chiplun : राहुल गांधी यांच्या लोकसभेतील भाषणानंतर विश्व हिंदू परिषद आक्रमक.
चिपळूण पोलीस ठाण्यात तक्रार देत राहुल गांधी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी.
राहुल गांधी यांनी सभागृत केलेल्या भाषणात केलेल्या वक्तव्यातुन हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावल्या गेल्या असल्याने विश्व हिंदू परिषद आक्रमक आहे,
चिपळूण पोलीस ठाण्यात राहुल गांधी यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात यावा
असे निवेदन चिपळूण पोलिसांना विश्व हिंदू परिषदेच्या वतीने देण्यात आलं.
यावेळी अनेक सदस्य उपस्थित होते
Vasant More : वसंत मोरे हे नऊ जुलैला शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती
वसंत मोरे यांनी उद्धव ठाकरे यांची आज भेट घेतली
या भेटीदरम्यान पुढील राजकीय भूमिका त्यांनी उद्धव ठाकरेंना सांगितली
त्यामुळे लवकरच ते शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत
9 जुलै रोजी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत वसंत मोरे प्रवेश करतील अशी माहिती आहे
Nashik - मुख्यमंत्री बहीण लाडकी योजनेच्या बाबत नाशिक जिल्हाधिकाऱ्यांचे महत्वाचं स्पष्टीकरण
- योजनेचा लाभ घेण्यासाठी बँकेत नवीन खाते उघडण्याची गरज नाही
- योजनेचा लाभ घेतांना बँक खात्यात डिपॉझिटही करण्याचीही गरज नाही
- अफवा पसरवणारे, अर्ज करतांना एजंट आढळून आल्यास जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा
- प्रत्येक सेतू केंद्रावर शासकीय अधिकारी नेमण्याचा सूचना
- सर्व बँकांना आणि केंद्रांना नाशिक जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
Raigad : एसटी बस जम्प झाल्याने 9 विद्यार्थी जखमी
बस चालकाचा बेजबाबदारपणामुळेच मुलांचा अपघात - पालक वर्ग
वाहन चालकावर कारवाई करण्याची पालकांची मागणी
कुडपण वरून पोलादपूर बाजू कडे येत असताना घडली घटना
घटनेनंतर विद्यार्थ्यांना पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल
सकाळी 11 वाजता घडली घटना
आरोग्य तपासणीनंतर सर्व विद्यार्थी हे सुखरुपअसल्याची डॉक्टरांची माहिती
Raigad : रायगड खालापूर - मोरबे धरण कृती समितीकडून खालापूर मधील मोरबे धरण परिसरात मोर्चा
हजारोंच्या संख्येने शेतकरी मोर्चात सहभागी
मोरबे धरण प्रकल्पग्रस्त कृती समितीकडून पुनर्वसन कायदा लागू करण्यासाठी मोर्चा
जोपर्यंत तुमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत या धरणाचं पाणी नवी मुंबईला जाऊ देणार नाही - स्थानिक शेतकऱ्यांकडून सरकारला चेतावणी
अनेक महिलांचा देखील मोर्चात सहभाग
धरणाचे पाणी बंद केलं नाही तर आम्ही समस्त धरणात उडी मारू - स्थानीकांचा प्रशासनाला इशारा
Dharashiv : धाराशिवमध्ये शाळा सुरू करण्याच्या मागणीसाठी संतप्त विद्यार्थी
ग्रामस्थ, पालकांनी शिक्षण विभागातील अधिकाराऱ्यांना घातला घेराव...
चौकशीसाठी आलेल्या संबधित शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना गावातून जावु न देण्याचा गावकऱ्यांचा पविञा
शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांसमोर "आमची शाळा सुरू करा.. मागणीच्यची विद्यार्थ्यांकडुन जोरदार घोषणाबाजी
धाराशिव च्या कळंब तालुक्यातील बोरगाव खुर्द येथील राजीव गांधी विद्यालय शासनाने लातुरला स्थलांतरित केल्याची शिक्षण विभागाची माहिती
गेली 18 दिवसापासुन शाळा कुलुपबंदच - शेकडो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान
Akola : शालेय विद्यार्थ्यांच्या बेंचवर विषारी अळया...
जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये वर्ग खोल्या नसल्याने खुल्या मैदानातल्या झाडाखाली भरतायेत शाळा...
अकोल्यात जिल्हा प्राथमिक शाळेचा भोंगळ आणि एक अजबजगब प्रकार समोर आलाय.
अकोल्यातल्या दिग्रस बु. गावतल्या जिल्हा परिषद शाळेत खुल्या मैदानात झाडाखाली वर्ग भरत आहे.
झाडाखाली भरत असलेल्या शालेय विद्यार्थ्यांच्या बेंचवर झाडावरील विषारी अळ्या पडत आहे.
याचा या चिमुकल्या विद्यार्थ्यांना त्रास होत आहे.
जिल्हा परिषदच्या शालेयमध्ये अपेक्षित वर्ग खोल्या नसल्याने येथील शिक्षक काही वर्ग खुल्या मैदानात भरत आहे.
Political News : ठाकरेंच्या आमदाराचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र
आमदार सुनील शिंदे यांच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र
वरळी येथील बीडीडी चाळ परिसरातील झाड कोसळून दुर्दैवी मृत्यू झालेल्या
तरुणाच्या कुटुंबीयांना तातडीने भरीव आर्थिक मदत करावी यासाठी पत्र
Pandharpur : मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानंतर ही वारकरी संप्रदायाचे श्रद्धास्थान असणारी इंद्रायणी नदी फेसाळलेलीचं आहे.
याकडे लक्ष वेधण्यासाठी महाविकासआघाडीने इंद्रायणी नदी गाठली अन दिंडीसह एल्गार आंदोलन केलं.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलेलले 48 तास उलटून गेले तरी इंद्रायणीने मोकळा श्वास घेतला नाही.
उलट महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने चुकीचा अहवाल देऊन मुख्यमंत्र्यांची फसवणूक केली अन् त्याच दाव्याच्या आधारे मुख्यमंत्री वारकऱ्यांची फसवणूक करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. या आंदोलनाचा आढावा घेतला नाजिम मुल्ला यांनी.
Maharashtra : मराठा समाजातील सगेसोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊ नका, या मागणीसह दाखल केलेल्या याचिकेत तथ्य नाही, त्या फेटाळून लावण्याची राज्य सरकारची हायकोर्टात मागणी
ओबीसी संघटना आणि मंगेश ससाणे यांनी यांच्यासह इतर याचिकाकर्त्यांना यावर उत्तर सादर करण्याचे निर्देश देत हायकोर्टाकडून सुनावणी दोन आठवड्यांकरता तहकूब
राज्य सरकार ओबीसींना डावलून कोर्टात घूमजाव करत असल्याचा याचिकाकर्त्यांचा आरोप
मराठ्यांना दिलेलं कुणबी प्रमाणपत्र स्थगित करा, अशी याचिकेतील प्रमुख मागणी
मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत राज्य सरकारनं 26 जानेवारी 2024 रोजी अधिसूचना जारी केली आहे
मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत या अधिसुचनेद्वारे लोकांच्या हरकती व सुचना मागवण्यात आल्या होत्या
Delhi : राजनाथ सिंह यांच्या निवासस्थानी राजकीय घडामोडींसंबंधित मंत्रिमंडळ समितीची (CCPA) बैठक झाली
या बैठकीला मंत्रिमंडळाच्या राजकीय घडामोडी समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते
या बैठकीत अमित शहा, जेपी नड्डा यांच्यासह सर्व सदस्य उपस्थित होते
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्थसंकल्प/पावसाळी अधिवेशनाच्या तारखा आणि मुद्द्यांवर चर्चा झाली
Nashik - मालवाहतूकदार मोर्चाला सुरुवात, रिक्षाचालकही पाळणार बंद...
- नाशिक जिल्हा ट्रान्स्पोर्ट असोसिएशनच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा.
- मालवाहतूकदारांच्या समस्या सोडवल्या जात नसल्याच्या निषेधार्थ मोर्चा ...
- मागण्या मान्य न झाल्यास शहरातून ट्रक मोर्चा काढण्याचा इशारा ...
- इलेक्ट्रिक बस डेपो स्थलांतरित करावा, तेथे वाहनतळ व सारथी सुविधा केंद्र विकसित करावे, जकात नाके ट्रक टर्मिनल म्हणून विकसित करावेत, टेम्पो स्टॅण्डसाठी कायमस्वरूपी जागा द्यावी, अशा विविध मागण्यांसाठी मोर्चा
- हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चाला सुरुवात
Mumbai - दक्षिण मुंबईत सुरू होणार नवे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय
- गोकुळदास तेजपाल रुग्णालय आणि कामा रुग्णालयात होणार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय
- विद्यालयाची प्राथमिक विद्यार्थी संख्या 50
- नवे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोकुळदास तेजपाल रुग्णालय आणि कामा रुग्णालयाला संलग्न असणार
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या पाठपुराव्याला आलं यश
Nashik - शासनाची जन्म मृत्यू नोंदणी वेबसाईट बंद, नागरिकांची तारांबळ
- जन्म-मृत्यू दाखला मागणी अर्ज नंतर तीन दिवसात मिळणे अपेक्षित असताना लागताय 15 ते 20 दिवस...
- शासनाची वेबसाईट सॉफ्टवेअर अपडेट होत असल्याने ऑनलाइन प्रक्रियेला विलंब लागत असल्याची प्रशासनाकडून माहिती ...
- शासकीय वेबसाईट बंद असल्याने नागरिक जन्ममृत्यू दाखल्यांसाठी तासनतास कार्यालयात बसून...
Nashik : आगामी श्रावण महिना आणि कुंभमेळाच्या धर्तीवर त्रंबकेश्वर देवस्थान दर्शनासाठी ऑनलाइन पास देण्याच्या विचाराधीन
-
त्रंबकेश्वर देवस्थानात होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी देवस्थान करणार उपाययोजना
-
गेल्या काही महिन्यापासून त्रंबकेश्वरमध्ये दर्शनासाठी होतेय हजारोची गर्दी
-
दर्शन रांगेत नुकतीच एका भाविकाला देवस्थानच्या सुरक्षा रक्षकांकडून झाली होती मारहाण
त्यांनतर गर्दी नियंत्रणासाठी उपाय योजनावर केले जात आहेत प्रयत्न
-
तिरुपती बालाजीच्या धर्तीवर ऑनलाइन पासच्या मुदतीतच घ्यावे लागणार दर्शन
-
भाविकांना मुख दर्शनाची सुविधा ही केली जाणार उपलब्ध
-
भाविकांना vip दर्शन देण्यासाठी देणगी दर्शनाचे शुल्क वाढविण्यावर होणार विचार
Cricket : भारतीय संघ T20 विश्वचषक जिंकून आज मायदेशी परतला.
मुंबईच्या NCPA ते मरीनड्राईव्ह भारतीय संघाची शोभयात्रा निघणार.
तर वानखडे स्टेडिअममध्येही भारतीय संघाचे जल्लोषात स्वागत केलं जाणार आहे.
यावेळी क्रिकेटप्रेमीची होणारी गर्दी लक्षात घेता, उत्तरप्रदेशमधील हातरसच्या घटनेची पुर्नरावृत्ती होऊ नये या अनुशंगाने पोलिसांकडून व्यवस्थित नियोजन केले जात आहे
Rain Update : बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यात धुवाधार पाऊस
मलप्रभा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ
हब्बनहट्टी येथील श्री स्वयंभू मारुती मंदिर पाण्याखाली गेले आहे.
Kolhapur : इचलकरंजीतील शहापूर येथे अल्पवयीन मुलाची दगडाने ठेचून हत्या
आसरानगरमध्ये राहणाऱ्या सुशांत कांबळे याची निर्घृण हत्या
शहापूर पोलिसांनी आरोपींना घेतले ताब्यात, अधिक तपास सुरू
Sunil Kedar : मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठाने सुनील केदार यांच्या दोषसिद्धीला स्त्री गती देण्यात यावी या मागणीवर कुठलाही दिलासा दिलेला नाही...
नागपूर खंडपीठाने सुनील केदार यांची याचिका फेटाळून लावली आहे...
त्यामुळे स्वतः ला मिळालेली शिक्षा स्थगित करून घेण्यासाठी आणि त्या आधारे आमदारकी बहाल करून घेण्यासाठी आता सुनील केदार यांना सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावावे लागणार आहे...
Latur : धनगर समाज बांधवांचे विविध मागण्यासाठी रास्ता रोको आंदोलन सुरू...
र आणि ड मध्ये फरक नाही धनगर समाजाला तात्काळ अनुसूचित जमातीत समाविष्ट करा..
या मागणीसाठी दोन लोकांचं सहा दिवसापासून उपोषण सुरू...
आज आहे सातवा दिवस...मागण्या मान्य होत नसल्यामुळे समाज बांधव कडून आज लातूर...बीड अंबाजोगाई रोड तसेच...लातूर नांदेड कडे जाणाऱ्या रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन सुरू केले आहे
Nashik - येत्या सोमवारी नाशिक विभागीय आयुक्त घेणार कुंभमेळ्याच्या कामांचा आढावा
- सोमवारी दुपारी तीन वाजता नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात विभागीय... आयुक्तांनी बोलवली बैठक.
- नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात येणार
- यंदाच्या कुंभात देश विदेशातून जवळपास पाच कोटी भाविक हजेरी लावणार असल्याचा अंदाज
- लोकसभा आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीची आदर्श आचारसंहितेनंतर कुंभाच्या तयारीला प्रशासनाकडून दिला जातोय जोर
- विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांना मागील सिंहस्थाचा अनुभव असल्याने बैठकीत गेडाम काय निर्देश देणार हे ठरणार औत्सुक्याचे..
Bhandara : गोसीखुर्द धरणाचे तीन गेट अर्धा मीटरनं उघडणार
नदीपात्रातून आवागमन करणाऱ्यांना दिला सतर्कतेचा इशारा
गोसीखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस पडला आहे.
त्यामुळं गोसीखुर्द धरणाच्या पाण्याची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी दुपारी दोन वाजता गोसीखुर्द धरणाचे तीन गेट अर्धा मिटरनं उघडून त्यातून ५०० क्युमेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे.
त्यानंतर आवश्यकता भासल्यास धरणाच्या पाण्याचा विसर्ग १००० क्युमेक्सपर्यंत टप्प्याटप्प्यानं वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे नदीपात्रातून आवागमन करणाऱ्या नागरिकांनी काळजी घ्यावी, असा सतर्कतेचा इशारा धरण प्रशासनानं दिला आहे.
Pune : पुण्यात ललित पाटील ससून हॉस्पिटल पलायन प्रकरणी मोठी अपडेट
पुणे पोलीस दलातील २ कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेतून काढून टाकण्याचे आदेश
ड्रग्स माफिया ललित पाटील याला ससून रुग्णालयात एक्स रे साठी घेऊन जाणारे २ कर्मचारी
पुणे पोलीस मुख्यालयातील हे दोघे ही कर्मचारी आता सेवेतून बडतर्फ
ललित पाटील पळून गेल्याची माहिती नियंत्रण कक्षास तीन तास उशीरा देणाऱ्या दोन पोलीसांना शासकीय सेवेतून काढून टाकण्याचे आदेश
पोलीस हवालदार आदेश शिवणकर आणि पिराप्पा बनसोडे अशी या दोघांची नावे
हे दोघे ललीत पाटील सोबत एक्सरे साठी गेलेच नसल्याचे चौकशीत समोर
Jalna : शाळेच्या छतावर बसून उपोषण करणाऱ्या आंदोलकाची तब्येत खालावली,
मोडकळीस आलेल्या शाळेची दुरुस्ती करण्याच्या मागणीसाठी ग्रामपंचायत सदस्याच आमरण उपोषण आंदोलन,
आंदोलनाचा तिसरा दिवस,
Kolhapur : महायुतीतील घटकपक्ष असलेले आमदार विनय कोरे विधानसभेसाठी 12 ते 15 जागांची मागणी करणार
दोनच दिवसात विनय कोरे जनसुराज्य पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांसोबत बैठक घेणार
कोल्हापूर जिल्ह्यातील 10 पैकी 4 जागा मिळाव्यात अशी मागणी विनय कोरे करणार
जनसुराज्य पक्षाचे अध्यक्ष विनय कोरे यांची एबीपी माझाकडे माहिती
Political News: वसंत मोरे आज उद्धव ठाकरे यांची भेट घेणार
मातोश्री राज दुपारी साडेबारा वाजता वसंत मोरे उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी येणार असल्याची माहिती आहे
वसंत मोरे यांच्यासोबत संजय राऊत आणि शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते साजन पाचपुते हे सुद्धा मातोश्रीवर उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी येणार आहेत
*लवकरच शिवसेना ठाकरे गटात वसंत मोरे प्रवेश करण्यास इच्छुक असल्याची माहिती आहे *
त्याआधी आज उद्धव ठाकरे यांच्यासोबत वसंत मोरे मातोश्रीवर चर्चा करतील
लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस सुद्धा आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी वसंत मोरे यांनी संजय राऊत यांची भेट घेतली होती
मात्र काँग्रेसने महाविकास आघाडीमध्ये उमेदवार दिल्याने वसंत मोरे यांना उमेदवारी मिळू शकली नाही
Political : काँग्रेस सरचिटणीस अब्दुल हाफिज यांचा राजीनामा; प्रज्ञा सातव यांच्या उमेदवारीने नाराजी
विधानपरिषद निवडणुकांच्या उमेदवारीवरुन काँग्रेसमध्ये नाराजीनाट्य रंगल्याचं पाहायला मिळत आहे.
काँग्रेसकडून पुन्हा एकदा प्रज्ञा सातव यांना विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
प्रज्ञा सातव यांच्या नावाचा प्रस्ताव काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मंजूर केला आहे.
त्यामुळे प्रज्ञा सातव यांना पुन्हा एकदा काँग्रेसकडून आमदारकीची संधी मिळाली आहे.
प्रज्ञा सातव या काँग्रेसचे दिवंगत माजी खासदार राजीव सातव यांच्या पत्नी आहेत. मात्र, त्यांच्या उमेदवारीवरुन काँग्रेस पक्षातील नाराजी समोर आली आहे.
या उमेदवारीवरुन महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अब्दुल हाफिज यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
Pune : संत श्रेष्ठ माऊली महाराजांचा पालखी सोहळा जेजुरी मध्ये पोहोचणार..
शैव आणि वैष्णव भक्तांचा जेजुरीमध्ये मिलाप होणार..
अवघड दिवे घाट ओलांडल्यानंतर संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली महाराजां च्या पालखी सोहळ्याने दोन दिवसाचा सासवडमध्ये मुक्काम केला आणि सासवड मुक्कामानंतर हा पालखी सोहळा आज जेजुरीच्या दिशेने मार्गस्थ झाला आहे..
अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत मल्हार मार्तंड खंडेरायाला भेटण्यासाठी आज वारकरी सकाळपासूनच मल्हार गडावर गर्दी करत आहेत.. आज सायंकाळी माऊली महाराजांची पालखी ज्यावेळी जेजुरी मध्ये येईल त्यावेळी मल्हार मार्तंड देवस्थान आणि जेजुरी नगरपालिकेच्या वतीने या ठिकाणी मोठा स्वागत सोहळा आयोजित केलेला आहे..
Mumbai - पंतप्रधान नरेंद्र मोदी जुलै महिन्यात मुंबई दौऱ्यावर
- लोकसभा निकालानंतर मोदींचा पहिलाच मुंबई दौरा
- पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते गोरेगांव मुलुंड लिंक रोड आणि बोरिवली ठाणे लिंक रोड या भुयारी मार्गांचे भूमिपूजन
- मोदींच्या दौऱ्यातून महायुती फुंकणार विधानसभा निवडणुकीचं रणशिंग
Solapur : शिवसेना शिंदे गटाचे सोलापूर जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांनी सोलापूर पोलीस दलातील एका अधिकाऱ्यावर गंभीर आरोप केलेत.
माझी नाहक बदनामी करण्यासाठी खोटे गुन्हे दाखल करण्याचे काम पोलिसांकडून सुरु असल्याचा आरोप मनीष काळजे यांनी केलाय.
महापालिकेच्या ठेकेदाराकडून कामाच्या निविदेसाठी पैसे मागितल्याप्रकरणी जिल्हाप्रमुख मनीष काळजे विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
मात्र हा गुन्हा खोटा असल्याचा दावा त्यांनी केलाय.
Solapur : अक्कलकोटमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांच्या भक्तांसाठी आता भव्य महाप्रसाद गृहाची निर्मिती करण्यात येणार आहे. एका वेळेस 2500 भाविक महाप्रसादाचा लाभ घेतील तर 5 हजार भाविक बसू शकतील असे प्रतीक्षलय असलेले भव्य महाप्रसादगृह असणार आहे. हे भव्य महाप्रसाद गृह संपूर्णतः वातानुकूलित असून, 1 लाख 19 हजार 398 चौ. फुटाचे बांधकाम असणार आहे. इमारतीच्या छतावर 51 फुटांची भव्य आणि दिव्य अशी स्वामी समर्थांची मूर्ती असणार आहे. भक्तांसाठी या इमारतीमध्ये असणार 200 खोल्यांची राहण्याची व्यवस्था, एका वेळेस 1100 चारचाकी वाहनांची पार्किंग व्यवस्था या ठिकाणी असणार आहे.
Kirit Somaiyya : धारावी पुनर्वसन मुलुंड मध्ये होणार नाही, असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला दिले आहे. - किरीट सोमैया
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ही मी विनंती केली आहे - किरीट सोमैया
महापालिका आयुक्त यांनी हे पत्र राज्य सरकारला 10 जानेवारी 2024 रोजी दिले होते, राज्य सरकार ने ही जागा धारावी प्राधिकरणाला दिली नाही - किरीट सोमैया
मी पुन्हा एकदा महापालिका आयुक्त आणि देवेंद्र फडणवीस यांना मुलुंड मधे धारावी पुनर्वसन नको आग्रह केला आहे - किरीट सोमैया
"मुलुंड मधे धारावी पुनर्वसन होऊ देणार नाही" - किरीट सोमैया
Kolhapur : कोल्हापुरात नामांकित कंपनीच्या बेकरी उत्पादनामध्ये सापडल्या अळ्या
कोल्हापुरातील बाजार भोगावमध्ये आला प्रकार उघडकीला
4 वर्षाचं मूल टोस्ट खात असताना आढळल्या आळया
लहान मुलाच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
बाजार भोगाव मधील दुकानातून पोर्ले मधील धनाजी काटकर यांनी खरेदी केल्या होता टोस्ट
विशेष म्हणजे पॅकेट वरील एक्सपायरी डेट अजून पाच महिने बाकी असताना पाकिटात आढळल्या आळ्या
सांगलीमध्ये पोषण आहारात मेलेला साप आढळल्याची घटना ताजी असतानाच कोल्हापुरात टोस्ट पॅकेटमध्ये आळ्या
Bhandara : भंडारा जिल्ह्यात पहाटेपासून पावसाची हजेरी
शेतीच्या खरीप हंगामाला येणार वेग
दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर भंडारा जिल्ह्यात पहाटेपासून जोरदार हजेरी लावली आहे.
मोहाडीत वादळी वाऱ्यासह जोरदार पावसानं हजेरी लावली तर भंडारा शहरात पावसाची रिपरिप सुरू आहे.
जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कुठं हलक्या तर, कुठं मध्यम स्वरूपाच्या पावसानं हजेरी लावल्यानं शेतकरी सुखावला आहे.
मागील काही दिवसांपासून पावसानं दडी मारल्यानं भात नर्सरीला जीवनदान मिळणारं असून भात लागवडीला आता वेग येणार आहे.
Nagpur : नागपूरमध्ये दीक्षाभूमीवर घडलेल्या तोडफोड प्रकरणी आणखी 23 आरोपींवर गुन्हा दाखल
बेकायदेशीर एकत्र येऊन जमावाला भडकवण्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल करण्यात आला.
दीक्षाभूमीवर झालेले हिंसक आंदोलन आणि बांधकाम साहित्याची तोडफोड व आग लवल्याच्या घटनेबद्दल नागपूर पोलिसांनी बजाज नगर पोलीस स्टेशन मध्ये आपीसीच्या कलम 125, 132, 189, 190, 191, 296, 326 अंतर्गत हे गुन्हे दाखल करण्यात आले.
जाळपोळ व तोडफोड प्रकरणी आधीच 16 आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले होते.
यात वंचित बहुजन आघाडीचे शहर अध्यक्ष शेंडे यांचा पण समावेश आहे ...
Mumbai : बेकायदेशीर ऑनलाईन फॉरेक्स ट्रेडिंग प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून गुंतवणुकदारांची सुमारे 500 कोटी रुपयांची फसवणूक केल्याच्या प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) बुधवारी छोट्या पडद्यावरील मालिकांमधील कलाकार क्रिस्टल डिसूझा आणि अभिनेता करण वाही यांचे जबाब नोंदवले.
या दोघांनी ऑक्टाएफएक्स नावाच्या अॅपच्या जाहिरातींसाठी काही रक्कम घेतली होती.
अभिनेत्री आणि मॉडेल निया शर्मा हिलासुद्धा ईडीकडून समन्स बजावण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
Chhatrapati Sambhaji Nagar : मनोज जरांगे दोन समाजांत तेढ निर्माण करत असल्याचा आरोप;
रॅलीला परवानगी न देण्याची मागणी
ओबीसी नेते आक्रमक
मनोज जरांगे दोन समाजांत तेढ निर्माण करत असल्याचा आरोप करत त्यांच्या रॅलीला परवानगी देऊ नका,
अशी मागणी ओबीसी नेत्यांकडून करण्यात येत आहे.
तर छत्रपती संभाजीनगरमधील ओबीसी नेत्यांकडून पोलिस आयुक्तांकडे याबाबत निवेदन देखील देण्यात येणार आहेत.
मराठा समाजाकडून संभाजीनगरमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या 13 तारखेच्या रॅलीची जय्यत तयारी सुरू असतांना या रॅलेली ओबीसी नेत्यांनी विरोध केला आहे
Dharashiv - धाराशिव नगर परिषदेमध्ये 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण'योजना कक्षाचा शुभारंभ
जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांच्या हस्ते कक्षाचा झाला शुभारंभ - ऑफलाईन अर्ज स्विकारले जाणार
Akola : अकोल्यात लाडकी बहीण योजनेच्या नोंदणीसाठी आलेल्या महिलांकडून पैसे उकळणारा तलाठी राजेश शेळकेवर निलंबनानंतर आणखी दुसरी कारवाई.
शेळकेवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून कारवाई.
शेळकेवर अकोल्यातील सिव्हील लाईन पोलिसांत गुन्हा दाखल. लवकरच होणार शेळकेला अटक.
भारतीय न्याय संहितेच्या कलम 198,318 नुसार गुन्हा दाखल.
अकोल्याचे जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या आदेशाने गुन्हा दाखल. शहरातील उमरी भागाचे आहेत राजेश शेळके तलाठी.
मोठी उमरी येथील तलाठी कार्यालयात सुरू होती नोंदणी.
पैसे स्विकारतांनाचा व्हिडीओ झाला होता व्हायरल.
अमरावतीनंतर अकोल्यात लाडकी बहीण योजनेत पैसे घेणाऱ्या तलाठी शेळकेवर प्रशासनाची आधी निलंबन कारवाई.
Bhandara : विद्यार्थिनीच्या मृत्यू प्रकरणी मुख्याध्यापकावर निलंबनाची कारवाई
लाखांदूर पोलिसात गुन्हा दाखल
विद्युत करंट लागून विद्यार्थीनीचा काल झाला होता मृत्यू
स्वच्छता गृहात लघुशंकेसाठी गेलेल्या विद्यार्थिनीला विद्युत करंट लागल्यानं इयत्ता पहिल्याच्या विद्यार्थीनीचा काल मृत्यू झाला होता.
यशस्वी राऊत असं मृतक विद्यार्थीनीचं नावं असून ही घटना लाखांदूर तालुक्यातील पुयार इथं घडली होती.
Hingoli : हिंगोलीत गुलाल उधळण्याच्या कारणावरून माजी आणि नवनिर्वाचित संचालक भिडले
डोळ्यात आणि तोंडात गुलाल गेल्याने माजी संचालकाडून नूतन संचालकाला अश्लील भाषेत शिवीगाळ
विद्युत महामंडळ तांत्रिक कर्मचारी सहकारी पतसंस्था संस्थेची होती निवड
वसमत येथील अध्यक्ष, उपाध्यक्ष तथा संचालक मंडळाची बिनविरोध झाली निवड
बिनविरोध झालेल्या निवडी नंतर आनंदोत्सव साजरा करताना घडला प्रकार.
पार्श्वभूमी
Maharashtra Breaking News: राज्यासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे वेगवान अपडेटस् आणि बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा...
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -