Maharashtra News Live Updates : धक्कादायक! मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल परिसरात 29 वर्षीय महिलेवर बलात्कार

Maharashtra News Live Updates: राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर...

प्रज्वल ढगे Last Updated: 04 Oct 2024 12:35 PM
आरक्षणाची मर्यादा 75% करावी, या शरद पवार साहेबांच्या मागणीचे समर्थन करतो - विनोद पाटील

आरक्षणाची मर्यादा 75% करावी, या शरद पवार साहेबांच्या मागणीचे समर्थन करतो. - विनोद पाटील.


राज्यभरातील मराठा बांधवांना सरसकट ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळेल अशी माझ्यासारख्या प्रत्येक बांधवाची अपेक्षा होती किंबहुना आजही आहेच. याकरिता वर्षभरापासून आंदोलन सुरू आहे, यावर शासनाच्या वतीने सातत्याने विविध घोषणा झाल्या मात्र प्रत्यक्षात अंमलबजावणी झाली नाही.


आज राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्र पवार साहेब यांनी मागणी केली की, मराठा व अन्य समाजघटकांना यात समाविष्ट करून घेण्यासाठी आरक्षणाची मर्यादा 50% हुन 75% पर्यंत करण्यात यावी.


सर्वप्रथम मी त्यांच्या या भूमिकेचे स्वागत करतो व सांगू इच्छितो की, याचिकाकर्ता म्हणून मी समाजाची बाजू मांडत असताना सर्वोच्च न्यायालयात सुद्धा ही मागणी केली होती. न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले होते की, 50% आरक्षणाची मर्यादा ही कालबाह्य झाली असून यात वाढ करावी. 


यात केवळ मराठाच नव्हे तर धनगर, मुस्लिम व अन्य वंचित समाजाला त्यांचा हक्क व न्याय मिळेल. मी सर्वच पक्षातील नेत्यांना विनंती करतो की, आपसातील हेवेदावे बाजूला ठेवून आरक्षण मर्यादा वाढीसाठी एकत्रित यावे व आम्हाला न्याय द्यावा.

धक्कादायक! मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल परिसरात 29 वर्षीय महिलेवर बलात्कार

मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल परिसरात २९ वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर



पीडीत महिला CSMT स्थानकाबाहेर २२ सप्टेंबरच्या रात्री एकटीच असताना


दोन अज्ञात व्यक्ती तिथे आले. यातील एकाने महिला आरडा ओरड करेल या अनुशंगाने तिचे तोंड धरले


CSMT स्थानकाबाहेरील टॅक्सी स्टॅडच्या पाठीमागे दोघांनी आळीपाळीने महिलेला धमकावून तिच्यावर बलात्कार केल्याचे महिलेने तक्रारीत म्हटले आहे



या प्रकरणी महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार प्रथम CSMT लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला



हाच गुन्हा आता पुढील तपासासाठी मुंंबई पोलिसांच्या माता रमाबाई मार्ग पोलिस ठाण्यांकडे वर्ग करण्यात आला आहे.

राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नावांचा प्रस्ताव आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत येण्याची शक्यता

राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या नावांचा प्रस्ताव आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत येण्याची शक्यता


आचारसंहिता लागण्यापूर्वी राज्यपाल नियुक्त आमदार विधानपरिषदेवर पाठवण्याची महायुतीची लगबग


आमदार नियुक्त करताना विधानसभा निवडणुकीचे राजकीय गणित बिघडू नये याचीही घेतली जातेय काळजी


भाजप ६,शिंदे गट ३ आणि अजित पवार गट ३ असा फॉर्म्यूला ठरलेला आहे


काय आहे निकष?
महायुतीमध्ये जिथं सध्याच्या आमदारांविरोधात बंड होण्याची शक्यता आहे आणि त्याचा फायदा मविआच्या उमेदवाराला होऊ शकतो. त्याठिकाणी बंडखोरी टाळण्यासाठी संबंधित नेत्याला विधानपरिषदेवर संधी देण्याचा विचार

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल शिंदेंच्या शिवसेनेकडून जल्लोष केला जाणार


- मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल शिंदेंच्या शिवसेनेकडून जल्लोष केला जाणार


- नाशिकच्या कुसुमाग्रज स्मारकात शिंदेंच्या शिवसेनेचा जल्लोष होणार


- ढोल ताशाचा गजर आणि फटाक्यांची आतषबाजी आणि पेढे भरवीत शिंदेंच्या शिवसेनेचा जल्लोष



- अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली मागणी पूर्ण झाल्याबद्दल केंद्र आणि राज्य सरकारचे मानले आशीर्वाद

भांडवली बाजारात घसरणीचा सिलसिला सुरुच, सेन्सेक्समध्ये २५२ अंकांनी घसरण, तर निफ्टी ६८ अंकांनी खाली 


आज पुन्हा भांडवली बाजारात घसरणीचा सिलसिला सुरुच 


सेन्सेक्समध्ये सुरुवातीलाच २५२ अंकांनी घसरण, तर निफ्टी ६८ अंकांनी खाली 


जागतिक बाजारातील पडझडीचे भारतीय भांडवली बाजारावर परिणाम 


कच्च्या तेलाच्या किंमती ७८ डाॅलर प्रति बॅरलपर्यंत पोहोचल्या 


पेट्रोलियम कंपन्या आणि पेंट कंपन्यांच्या समभागात घसरण

पुण्यातील मार्केट यार्ड परिसरात किरकोळ कारणावरून 28 वर्षीय तरुणाचा खून 

पुणे 


पुण्यातील मार्केट यार्ड परिसरात किरकोळ कारणावरून एका २८ वर्षीय तरुणाचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे 


संघटनेतील अंतर्गत वाद आणि व्हॉट्सऍप वर बदनामी केल्याच्या रागातून बहुजन शक्ती सेनेचे अध्यक्ष दिनेश उर्फ बाळासाहेब रणदिवे यांचा खून करण्यात आला 


मार्केट यार्ड परिसरात बुधवारी रात्री ९ च्या सुमारास धार धार शस्त्राने वार करुन खून करण्यात आला 


या प्रकरणात पोलिसांनी चार जणांना अटक केलं आहे 


राहुल खुडे (४०), सचिन खुडे (३८), हनुमंत कांबळे (३०), आणि सुरजसिंह दुधाणी (२८) अस अटक केलेल्या आरोपींचे नाव आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी ५ आॅक्टोबर रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर, २३ हजार ३०० कोटी रुपयांच्या योजनांचा शुभारंभ करणार 

फ्लॅश 


पंतप्रधान नरेंद्र मोदी ५ आॅक्टोबर रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर 


पंतप्रधानांकडून २३ हजार ३०० कोटी रुपयांच्या कृषी आणि पशु संवर्धन क्षेत्रातील विविध योजनांचा शुभारंभ वाशिममध्ये करणार 


सोबतच, बंजारा विरासत म्युझियमचे देखील उद्घाटन करण्यात येणार 


ठाण्यात पंतप्रधान यांच्या हस्ते ३२ हजार ८०० कोटी रुपयांच्या कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण 


मेट्रो-३ चा पहिला टप्पा आरे ते बीकेसी दरम्यानच्या फेजचं उद्घाटन केले जाणार 


सोबतच, ठाणे इंटिग्रल रिंग मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे आणि एलिव्हेटेड पूर्व मुक्तमार्गाचे भूमिपूजन पार पडणार 


पंतप्रधान नवी मुंबई एअरपोर्ट इन्फ्लुएन्स नोटिफाइड एरीया (नैना) प्रकल्पाचे भूमिपूजन करणार 


संध्याकाळी ६ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी मेट्रो-३ ला हिरवा झेंडा दाखवत बीकेसी ते सांताक्रुज मेट्रो स्थानकांच्या दरम्यान प्रवास करणार

नाशिकमध्ये टोळक्याकडून तरुणावर  प्राणघातक हल्ला, कोयते, रॉड, हॉकी स्टिकने जबर मारहाण 

- नाशिकमध्ये टोळक्याकडून तरुणावर  प्राणघातक हल्ला 
- सातपूरच्या श्रमिकनगर परिसरात सायंकाळी झालेल्या हल्ल्याचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर 
- दुचाकी वरून जाणाऱ्या तीन तरुणांपैकी एकावर रिक्षातून आलेल्या टोळक्याकडून हल्ला 
- कोयते,रॉड,हॉकी स्टिकने तरुणाला जबर मारहाण 
- भीषण हल्ल्याचा थरार सीसीटीव्ही मध्ये कैद 
- तरुणाला मारहाण होत असताना वाचवायला येणाऱ्या नागरिकांना कोयते दाखवून टोळक्याने केली दहशत 
- पूर्व वैमानस्यातून हा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती 
- हल्ल्यातील जखमी तरुणावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू प्रकृती चिंताजनक

 पालघरच्या घोलवड परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास संशयित बोट दिसून आल्याने खळबळ 

पालघर -


 पालघरच्या घोलवड परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास संशयित बोट दिसून आल्याने खळबळ . 


घोलवड जवळील चिखले वडकतीपाडा येथील समुद्रात संशयित बोट मध्यरात्रीच्या सुमारास दिसून आल्याची माहिती . 


समुद्रकिनाऱ्यावर असलेल्या काही तरुणांना बघून ही बोट पुन्हा माघारी फिरल्याची पोलीस प्रशासनाला माहिती . 


पश्चिम किनारपट्टीवरील सर्व पोलीस ठाण्यांसह नागरिकांना पालघर जिल्हा पोलीस प्रशासनाच सतर्कतेच आवाहन . 


परिसरात संशयित हालचाली दिसून आल्यास त्वरित पोलिसांना खबर देण्याच आवाहन . 


जिल्ह्यातील मासेमारी बोटिं पेक्षा वेगळी बोट असल्याची तरुणांची पोलिसांना माहिती .

हर्षवर्धन पाटील यांचं जवळपास ठरलं, इंदापूरातील भाजपा कार्यालयाचे फलक हटवले, लवकरच शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाण्याची शक्यता

भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या भेटीनंतर इंदापुरात राजकीय घडामोडींना वेग आला आहे इंदापूर शहरात असणाऱ्या भाजप कार्यालयावरील फ्लेक्स रातोरात हटवण्यात आलेत. हर्षवर्धन पाटील यांचे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी गटात जाण्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे. इंदापूर शहरातील त्यांच्या भारतीय जनता पार्टीच्या जनसंपर्क कार्यालया वरील संपूर्ण फलक हटवण्यात आले असून त्यावरील पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहा ,जेपी नड्डा, देवेंद्र फडणवीस चंद्रशेखर बावनकुळे यांचे फोटो व कमळ चिन्ह देखील काढण्यात आले आहे.

पार्श्वभूमी

मुंबई : राज्यात कोणत्याही क्षणी विधानसभा निवडणुकीची घोषणा होऊ शकते. हीच बाब लक्षात घेऊन राज्य सरकारकडून अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जात आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीकडून सत्ताधारी महायुतीवर सडकून टीका केली जात आहे. केंद्र सरकारने मराठी या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. या निर्णयानंतर सत्ताधारी पक्षांकडून केंद्राचे आभार मानले जात आहेत. तर विरोधकांकडून राज्यातील इतरही समस्यांकडे सरकारचे लक्ष वेधले जात आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे यवतमाळच्या दौऱ्यावर असतील. परिणामी आज राज्यात अनेक घडामोडी घडण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर देश, राज्य तसेच जगभरातील महत्त्वाच्या घडामोडींचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर... 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.