Dharashiv: भीषण! मांजरा नदीला पुराचा वेढा, पुरात शेतकरी वाहून गेला; शोधमोहीम सुरू, घटनास्थळी आमदारांची उपस्थिती
मांजरा नदीला पूर आल्याने प्रशासनाने बजावला आहे आसपासच्या परिसरातील गावाला सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.
Dharashiv news
1/11
धाराशिव जिल्ह्यातील मांजरा नदीला आलेल्या पुरामुळे भीषण घटना घडली आहे. सुबराव शंकर लांडगे (वय 65, व्यवसाय – शेतकरी) हे नदीवरील पुलावरून जात असताना पाय घसरल्याने थेट पुराच्या पाण्यात पडले आणि वाहून गेले.
2/11
ही घटना आज सकाळी घडली असून, गेल्या तीन तासांपासून शेतकऱ्याचा शोध घेण्यासाठी प्रशासन आणि स्थानिकांनी जोरदार मोहीम हाती घेतली आहे.
3/11
घटनास्थळी भाजप आमदार राणा पाटील आणि ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील हे देखील उपस्थित राहून परिस्थितीचा आढावा घेत आहेत.
4/11
शेतकऱ्याचा शोध घेण्यासाठी NDRF ची पथक घटनास्थळी दाखल झाली आहे. त्याचबरोबर स्थानिक ग्रामस्थदेखील स्वतःच्या जीवाची पर्वा न करता पुराच्या पाण्यात उतरून शोधकार्य करत आहेत
5/11
शोधमोहीमेत आधुनिक साधनांचा वापर करण्यात येत असून, ड्रोनच्या माध्यमातून नदीच्या प्रवाहात आणि परिसरात तपास सुरू आहे.
6/11
मात्र, नदीला आलेल्या जोरदार पुरामुळे पाण्याचा प्रवाह वेगवान आणि धोकादायक झाल्याने शोधमोहीमेत अडथळे येत आहेत.
7/11
मांजरा नदीला झालेल्या पूरस्थितीमुळे प्रशासनाने परिसरातील गावकऱ्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. नदीच्या पाण्याची पातळी वेगाने वाढत असल्याने नागरिकांना नदीकाठावर किंवा पूल परिसरात न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
8/11
तसेच, शेतकरी आणि नागरिकांनी आपल्या जनावरांना देखील सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
9/11
घटनास्थळी वातावरण तणावपूर्ण असून, सुबराव लांडगे यांचा शोध लागेल या आशेने कुटुंबीय आणि गावकरी अधीर झाले आहेत.
10/11
प्रशासन, पोलिस, आणि स्थानिकांच्या संयुक्त प्रयत्नांतून शोधमोहीम सुरू असून, पाणी ओसरल्यावर शोधकार्याला आणखी गती मिळेल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
11/11
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, पावसाळ्यात नदी आणि नाल्यांमधील वाढत्या पाण्यामुळे सुरक्षिततेचे नियम पाळण्याचे महत्व पुन्हा अधोरेखित झाले आहे.
Published at : 15 Aug 2025 01:12 PM (IST)