Maharashtra Breaking 3rd August LIVE Updates :राज्यात पुढील दोन दिवस पावसाचं धुमशान, कोकणासाठी ऑरेंज अलर्ट, मुंबई, ठाण्यात अतिमुसळधार ते मुसळधार पावसाचा इशारा

Maharashtra Breaking 3rd August LIVE Updates: राज्यासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे वेगवान अपडेटस् आणि बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा...

ज्योती देवरे Last Updated: 03 Aug 2024 03:12 PM
शेतकरी कामगार पक्षाच्या बैठकीत पदाधिकारी निवडीवरून खडाजंगी, सुभाष पाटील आणि जयंत पाटील यांच्यात वाद 

शेतकरी कामगार पक्षाच्या बैठकीत पदाधिकारी निवडीवरून खडाजंगी..


माजी आमदार सुभाष पाटील आणि जयंत पाटील यांच्यात वाद 


अतुल म्हात्रे यांना पक्षात न घेता पदावर घेतल्याने पाटील आक्रमक


मराठवाड्यात पक्ष संपलेला असताना आपण उर्जित अवस्था आणली...


पक्षात आमचा अनादर होता कामा नयेत..


जयंतभाई पक्षात दादागिरी करू नका...


माजी आमदार सुभाष पाटील शेकापच्या अधिवेशनात आक्रमक

Weather Update : राज्यात पुढील दोन दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता, मुंबई, ठाणे आणि उपनगरात पावसाचा जोर राहणार

Weather Update : राज्यात पुढील दोन दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.  
मुंबई, ठाणे आणि उपनगरात पावसाचा जोर राहणार आहे. 
मुंबईतही दुपारनंतर पावसाचा जोर वाढला आहे. 
सध्या तरी मुंबईच्या सखल भागात पाणी साचलेलं नाही. मात्र पावसाचा जोर जर वाढला तर मात्र पाणी भरण्यास सुरुवात  होवू शकते.  वाऱ्याचा वेग ताशी ५२ किमी आहे. त्यामुळे समुद्राच्या प्रचंड लाटा आपल्याला बघायला मिळत आहे. शनिवार रविवारी  असल्याने पावसाचा आनंद घेण्यासाठी मुंबकर येथे येतील मात्र दोन दियस मुसळधार पावसाची शक्यता असल्याने नागरीकांनी समुद्र किनारी येणं टाळावे असं आवहान प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. 

Mumbai Rain : मुंबईसह पश्चिम उपनगरात मागील दीड ते दोन तासापासून मुसळधार पाऊस सुरू,अंधेरी सबवे पाण्याखाली

Mumbai Rain : मुंबईसह पश्चिम उपनगरात मागील दीड ते दोन तासापासून मुसळधार पाऊस सुरू आहे.


जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे अंधेरी सबवे पाण्याखाली गेला आहे...



अंधेरी सबवे खाली तीन ते चार फूट पाणी भरल्यामुळे अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे...

Dhule : धुळ्यात जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने नाकाबंदी आणि ऑल आऊट ऑपरेशन

Dhule : धुळे जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने नाकाबंदी आणि ऑल आऊट ऑपरेशन राबवून तब्बल सहा पिस्टल आणि चार तलवारी जप्त करण्यात आले आहेत

Beed : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एमआयएम ॲक्शन मोडवर, बीडमध्ये क्षीरसागर मुक्तचा नारा

Beed : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एमआयएम ॲक्शन मोडवर; बीडमध्ये क्षीरसागर मुक्तचा नारा तर परळी मंत्री धनंजय मुंडे यांना आव्हान


आगामी येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यात एमआयएम ॲक्शन मोडवर आली आहे.


आज एमआयएमच्या माध्यमातून तीन विधानसभा मतदारसंघाचा दौरा सुरुवात करण्यात आलाय.


छत्रपती संभाजी नगर येथे १४ जुलै रोजी असुद्दिन ओवेसी यांच्या उपस्थित बैठक पार पडली.


यानंतर आज गेवराई, माजलगाव आणि केज विधानसभा मतदारसंघाचा आढावा जिल्हाध्यक्ष शेख शफीक यांच्यासह प्रमुख पदाधिकारी बैठक घेणार आहेत

Solapur - राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे माजी आमदार राजन पाटील काँग्रेस नेत्याच्या व्यासपीठावर 

Solapur - राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे माजी आमदार राजन पाटील काँग्रेस नेत्याच्या व्यासपीठावर 


- खासदार प्रणिती शिंदे, माजी मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यासोबत व्यासपीठावर उपस्थित


- काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांच्या वाढदिवसाच्या अभिष्टचिंतन सोहळ्यात 


- राजन पाटलांकडून काँग्रेसच्या दिलीप माने यांना दोन तीन महिन्यात आशीर्वाद द्यावा ( अप्रत्यक्षपणे आमदार करावे) असे आवाहन.


- दिलीप माने आणि मी अनेक वर्षांपासून मित्र आहोत.


- दिलीप माने 62 वर्षाचे असून 24 वर्षाच्या युवकाप्रमाणे काम करतात.

Rain Update : राज्यातील धरणसाठा 61.24 टक्क्यांवर, कोकण विभागात सर्वाधिक 84.21 टक्के पाणीसाठा

Rain Update : राज्यातील धरणसाठा ६१.२४ टक्क्यांवर, मागील वर्षी याचवेळी ५७.५२ टक्के होता 


कोकण विभागात सर्वाधिक ८४.८१ टक्के पाणीसाठा जमा 


उजनीतील पाणीसाठा ७३.३८ टक्क्यांवर तर कोयनेत ८१.२७ टक्के जलसाठा

Nashik Rain : नाशकातील घाट परिसरात देखील अतिमुसळधार ते मुसळधार पावसाचा अंदाज, ऑरेंज अलर्ट जारी 

Nashik Rain : नाशकातील घाट परिसरात देखील अतिमुसळधार ते मुसळधार पावसाचा अंदाज, ऑरेंज अलर्ट जारी 


पुढील दोन दिवस जोरदार पावसाची शक्यता 


नाशिक परिसरातील धरणसाठ्यात वाढ झाल्यास मराठवाड्याला देखील दिलासा मिळण्याची शक्यता

Weather Update : राज्यात पुढील दोन दिवस पावसाचं धुमशान, कोणत्या भागात कोणता अलर्ट?

Weather Update : राज्यात पुढील दोन दिवस पावसाचं धुमशान 


संपूर्ण कोकणासाठी ऑरेंज अलर्ट जारी 


मुंबई, ठाणे आज अतिमुसळधार ते मुसळधार पावसाचा इशारा 


पुणे आणि साताऱ्यातील घाट परिसरात काही भागात अतिवृष्टीची शक्यता 


साताऱ्यातील घाट परिसरासाठी रेड अलर्ट जारी 


विदर्भात देखील सर्वत्र विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज

भाईंदर  - क्रेन चालकाच्या निष्काळजीपणामुळे एक मजुराचा दुर्दैवी मृत्यू

भाईंदर  - क्रेन चालकाच्या निष्काळजीपणामुळे एक मजुराचा दुर्दैवी मृत्यू झाला
 
गुरुवारी सायंकाळी सिल्वर पार्क परिसरात हाटकेश सिग्नल येथे मेट्रो प्रकल्पाच काम सुरु असताना,


एक मजूर  फ्लाईओव्हर कडे काम करत होता.


काम करताना क्रेन चालकाने क्रेन वर करताना तो मजूर फ्लायओव्हरच्या पिलिअरला दबला गेला.


त्यात तो बेशुध्द झाला. क्रेन खाली करताच तो क्रेनवरुन खाली पडून, मयत झाला.  



अपघाताची ही  घटना मोबाईल मध्ये कैद झाली आहे. 



सध्या हा विडीओ सोशल मिडीयात चांगलाच वायरल होत आहे.

Raj Thacekeray : उरण, शिळफाटा बलात्कार प्रकरण फास्ट ट्रॅकवर घेण्यात यावे, राज ठाकरेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Raj Thacekeray : उरण बलात्कार प्रकरण, शिळफाटा येथील बलात्कार प्रकरण फास्ट ट्रॅकवर घेण्यात यावे


राज ठाकरे यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी...


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबईच्या आयुक्तांशी केली चर्चा...

 Political : भाजपच्या जिल्हास्तरीय बैठकीला सुरूवात, गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत बैठकीला सुरवात

 Political : भाजपच्या जिल्हास्तरीय बैठकीला सुरवात
-
ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत बैठकीला सुरवात
-
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीचे आयोजन

Mumbai : मुंबई-नाशिक महामार्गावर पुन्हा वाहतूक कोंडी, 8 ते 10 किलोमीटर पर्यंत वाहनांचा लागल्या रांगा 

Mumbai : मुंबई नाशिक महामार्गावर पुन्हा वाहतूक कोंडी 


मुंबई नाशिक महामार्गावर आठ ते दहा किलोमीटर वाहनांचा लागल्या रांगा 


खारेगाव टोल नाका ते  वडपा पर्यंत वाहतूक कोंडी 


वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी वाहतूक पोलिसांची तारेवरची कसरत 


सातत्याने होत असलेल्या वाहतूक कोंडीमुळे खासदार सुरेश म्हात्रे  उर्फ बाळ्या मामा रस्त्यावर 


ठेकेदारांना नागरिकांनी ठोकून काढण्याची वेळ आली आहे - मामा

बुलढाणा शहरातील रस्त्यांवर जागोजागी मोठे खड्डे, शिवसेनेच्या उबाठा गटाकडून खड्ड्यात झाड लावून आंदोलन

बुलढाणा - संत नगरी शेगावात देशभरातून संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी भाविक येतात,


मात्र शहरातील रस्त्यांवर जागोजागी मोठे मोठे खड्डे पडले आहेत


त्यात पाणी तुंबल्याने अनेक भाविकांना खड्ड्यात पडून इजाही झाली आहे


शहरातील मुख्य मंदिर मार्गावरील अनेक ठिकाणी मोठे मोठे खड्डे पडल्यामुळे


आज शिवसेनेच्या उबाठा गटाकडून या खड्ड्यात बेशरम चे झाड लावून आंदोलन करण्यात आले.


शहरातील रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली.

Ulhasnagar : उल्हासनगरात "केरला  फाईल"; धर्मांतरण करणारी टोळी सक्रिय, दोघांना अटक, 8 फरार 

Ulhasnagar : उल्हासनगरात "केरला  फाईल"; धर्मांतरण करणारी टोळी सक्रिय,


मुस्लीम धर्म स्वीकारलेल्या मुलीच्या आईच्या गंभीर तक्रारीवरून 10 जणांविरोधात केला गुन्हा दाखल, दोघांना अटक, ८ फरार 

छत्रपती संभाजीनगर - अब्दुल सत्तार यांना पालकमंत्री पद मिळाल्याने शिवसेना आमदार संजय शिरसाठ नाराज 

छत्रपती संभाजीनगर - अब्दुल सत्तार यांना पालकमंत्री पद मिळाल्याने शिवसेना आमदार संजय शिरसाठ नाराज 


जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला आमदार संजय शिरसाठ गैरहजर


काल ही मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला शिरसाठ होते गैरहजर


शिरसाट नाराज असल्याची जोरदार चर्चा


पालकमंत्री पदासाठी शिरसाठ होते इच्छुक

Nashik - इगतपुरीचे काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर छगन भुजबळांच्या भेटीला

Nashik - इगतपुरीचे काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर छगन भुजबळांच्या भेटीला

- खोसकर भुजबळ फॉर्मवर भुजबळांच्या भेटीला पोहचले
- -
- गेल्या काही दिवसांपासून खोसकर  यांच्या राजकीय भेटीमुळे चर्चेत
-  
- विधान परिषदेत क्रॉस वोटिंग, अजित पवार, भुजबळ, मुख्यमंत्र्यांच्या भेटीमुळे खोसकर सातत्यानं चर्चेत
- -
धान्य गोडावून संदर्भात भुजबळ यांच्या भेटीसाठी आल्याचे खोसकर यांचे स्पष्टीकरण

Nitesh Rane : "संजय राऊत इधर उधर की बात न कर, यह बता वाझे लादेन है की नहीं?" - नितेश राणे

Nitesh Rane :  संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यापेक्षा सचिन वाझे लादेन आहे का? - नितेश राणे


हे विचारणाऱ्या उद्धव ठाकरेंना जाब विचारला पाहिजे. उद्धवनेच त्याला नोकरीत घेतले ना? - नितेश राणे



सचिन वाझे हा उद्धव ठाकरेंचा लाडका आहे, वाझेला नोकरीत घेण्यासाठी उद्धव ठाकरेंनी विशेष प्रयत्न केले होते, त्यामुळे वसुलीचं रॅकेट कसं चालवलं जात होतं हे उद्धव ठाकरेंनी सांगावं.- नितेश राणे



संजय राऊत तू इधर उधर की बात न कर यह बता वाझे लादेन है की नहीं?- नितेश राणे

Pune : पुणे - कोल्हापूर महामार्गावर खेड शिवापूर टोल नाका बंद करण्यात यावा, कॉग्रेसचे आंदोलन

Pune : पुणे - कोल्हापूर महामार्गावर खेड शिवापूर टोल नाका बंद करण्यात यावा


यासाठी कॉग्रेसचे भोरचे आमदार संग्राम थोपटे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.


पश्चिम महाराष्ट्रात कॉग्रेसकडून पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात टोल रद्द करण्यात यावा


यासाठी आंदोलन करण्यात येतंय

Nandurbar Rain - नंदुरबार शहरात आणि परिसरात दोन दिवसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसाला सुरुवात.

Nandurbar Rain - नंदुरबार शहरात आणि परिसरात दोन दिवसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसाला सुरुवात.....


- नंदुरबार परिसरात सुरू झालेल्या पावसामुळे धरणांमध्ये पाणीसाठा वाढण्याची शक्यता.....


- पावसामुळे खरीप हंगामातील पिकांना देखील चांगला फायदा होणार आहे.....


- नंदुरबार जिल्ह्यात दमदार असा पाऊस होत नाही आहे मात्र रिमझिम पाऊस सुरू असल्याने नदी नाले प्रवाहित होत आहे......


- या पावसामुळे नंदुरबार शहराला पाणीपुरवठा करणारे विरचक धरणात देखील हळूहळू पाणीसाठा वाढत आहे.....


- नंदुरबार शहराला पाणीपुरवठा करणारे विचलकरणात २८.८६% पाणीसाठा शिल्लक...

Dhule : धुळ्यात भाजपतर्फे राहुल गांधींचा खानदेशी संस्कृतीने निषेध, अर्थसंकल्पाच्या वेळी जात विचारल्याच्या कारणावरून वाद

Dhule : संसदेत अर्थसंकल्पाच्या वेळी राहुल गांधींना जात विचारल्याच्या कारणावरून वाद निर्माण झाला होता,


या पार्श्वभूमीवर आज धुळ्यात भाजपच्या वतीने राहुल गांधींचा खानदेशी संस्कृतीने निषेध करण्यात आला...


यावेळी सोनिया गांधी यांना प्रतीकात्मक आवदसा बनवून राहुल गांधी त्यांना जात विचारत असल्याचे प्रतीकात्मक आंदोलन करण्यात आले...


यावेळी भाजपाच्या या अनोख्या आंदोलनाची चांगलीच चर्चा रंगली होती

मुंबई-अहमदाबाद हायवेवर हायड्रोजन गॅस सिलेंडर वाहून नेणाऱ्या ट्रकचा भीषण अपघात, 9 तास उलटूनही एक्सपर्टची टीम पोहचली नाही

Vasai : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर हायड्रोजन गॅस सिलेंडर वाहून नेणाऱ्या ट्रकचा भीषण अपघात


ट्रक मधील सिलेंडर मुंबईहून गुजरात कडे जाणाऱ्या लेनवर पसरले आहेत.  


सिलेंडर महामार्गावरुन काढण्यासाठी नऊ तास उलटूनही अजून एक्सपर्टची टीम तसेच डिझास्टर मॅनेजमेन्टची टीम पोहचली नाही,


येणारी वाहतुक  जुचंद्र, सातीवली मार्गे वसई विरार शहरातून वळवण्यात  आली आहे. 



तर गुजरातहून मुंबईला जाणाऱ्या लेन वरील वाहतुक धीम्या गतीने सुरु आहे.


सिलेंडर महामार्गावरुन बाजूला केल्यानंतरच दोन्ही लेनची वाहतुक सुरळीत होवू शकते.

Navi Mumbai : शिवसेना ( शिंदे गट ) जिल्हाप्रमुख विजय चौगुले यांच्या बेमुदत उपोषणाचा तिसरा दिवस, तब्येत खालावली

Navi Mumbai : शिवसेना ( शिंदे गट ) जिल्हाप्रमुख विजय चौगुले यांच्या बेमुदत उपोषणाचा तिसरा दिवस


तब्येत खालावली…


बिपी आणि शुगर वाढल्याने  सलाईन लावण्याची वेळ 


झोपडपट्टीत भागात सरकारने एसआरऐ योजना लागू करावी आणि प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटी घरांना कायम करावी या मागणी साठी सुरू आहे उपोषण 


मुख्यमंत्र्यांच्या जिल्हाप्रमुखावर बेमुदत उपोषणाची आली वेळ


विजय चौगुले यांच्या समर्थनाथ ऐरोली विभागात बंद पुकारलाय


सर्व दुकाने बंद

Mumbai Rain : मुंबईसह पश्चिम उपनगरात आज सकाळपासून अधून मधून जोरदार पाऊस

Mumbai Rain : मुंबईसह पश्चिम उपनगरात आज सकाळपासून अधून मधून जोरदार पाऊस सुरू आहे...



मुंबईच्या पश्चिम उपनगरात मागील अर्धा तासापासून अंधेरी,जोगेश्वरी,गोरेगाव,मालाड कांदिवली,बोरिवली,दहिसर,विलेपार्ले सांताक्रुझ,वांद्रे परिसरामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे...

Raj Thackeray : राज ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला, कारण काय?

Raj Thackeray : राज ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला, कारण काय?


- उरण येथे यशश्री शिंदे या तरुणीची झालेली हत्या, हे प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवावे अशी मागणी राज ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना करणार आहेत


- ⁠आरक्षण आणि जातीवाद या विषयावर देखील राज ठाकरे मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहेत


- राज्यात महिलां संदर्भात निर्माण झालेला कायद्या सुव्यवस्थेचा प्रश्न 


- पुण्यात आलेला पुर, शहरांचा नियोजन वाढती बांधकामे, पाणी व्यवस्थापन आणि राज्यात रखडलेले महत्वाचे प्रकल्प या विषयावर देखील राज ठाकरे मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार आहेत
- वरळी पोलिस कॅम्प निवृत्ती कर्मचारी भाडेवाड समस्या
- वरळी गोमाता नगर पुर्नविकास प्रकल्प
- बुधवळ जि जळगाव पंतप्रधान आवास योजना यासह अन्य विषयांवर राज ठाकरे मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार

Political : राष्ट्रवादी काॅग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवरील हल्या प्रकरणी दोघांना अटक

Political : राष्ट्रवादी काॅग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवरील हल्या प्रकरणी दोघांना अटक


श्रवण दुबे असे एका आरोपीचे नाव असून त्याच्यासोबत अन्य एका आरोपीला केली अटक


श्रवण हा हल्ल्यावेळी गाडी चालवत असल्याची माहिती


आव्हाड यांच्यावर हल्ला करण्यापूर्वी आरोपींना घेऊन त्यांच्या गाडीचा पाठलाग श्रवण याने केल्याचा आरोप


गुन्हे शाखेच्या पोलिसांनी श्रवण याला रायगड मधून केली अटक


गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आरोपींचा ताबा डोंगरी पोलिसांना दिला असून दोन्ही आरोपींना आजच न्यायालयात हजर केले जाणार

Raigad : रायगड रोहा येथील कुंडलिका नदीत उडी मारणाऱ्या व्यक्तीचा मृतदेह सापडला 

Raigad : रायगड रोहा येथील कुंडलिका नदीत उडी मारणाऱ्या व्यक्तीचा मृतदेह सापडला 


सलग तिसऱ्या दिवशी शोधमोहीम करून तपासात यश


चनेरा न्हावा, नवखार खाडीत सापडली बॉडी


 


31 जुलै रोजी मारली होती कुंडलिका नदीत उडी  


नदीत उडी मारण्याचे  कारण अद्याप अस्पष्ट

Nitesh Rane : सचिन वाजे महाविकास आघाडीचा कलेक्शन एजंट, दिशा सालीयान, सुशांत सिंग राजपूतची माहिती वाजेकडे - नितेश राणे


Nitesh Rane : सचिन वाजे महाविकास आघाडीचा कलेक्शन एजंट - नितेश राणे


सचिन वाजे यांनी सत्य विधान केलं आहे - नितेश राणे


सत्य सचिन वाजेने बोलायला सुरुवात केली आहे - नितेश राणे


अनिल देशमुख यांनी हिम्मत असेल तर समोर येऊन खुलासा करावा - नितेश राणे


सगळ्या गोष्टीची खुलासा करण्याची हिम्मत अनिल देशमुख यांनी करावी - नितेश राणे


सचिन वाजे यांना दिशा सालीयान आणि सुशांत सिंग राजपूत यांच्या खुना संदर्भातील सुद्धा माहिती आहे - नितेश राणे


सचिन वाजे जसे जसे बोलत जातील तसं तसं महाविकास आघाडीचे वस्त्रहरण होईल - नितेश राणे


अनिल देशमुख यांनी पेंटर दाखवण्याची हिंमत कधीतरी करावी - नितेश राणे

Nitesh Rane : सचिन वाझे महाविकास आघाडी सरकारचा जावई होता - नितेश राणे

 


Nitesh Rane : सचिन वाझे महाविकास आघाडी सरकारचा जावई होता.


नितेश राणे बाईट ऑन सचिन वाझे


तो जेव्हा बोलत आहे याचा अर्थ तो सत्य परिस्थिती सांगत आहे


काचेच्या घरात राहणाऱ्या व्यक्तींनी इतरांवर दगड मारू नये


अनिल देशमुख पेन ड्राइव बद्दल बोलत होते त्यांनी तो आता पेन ड्राईव्ह बाहेर काढावा


अन्यथा सचिन वाझे जो आरोप करत आहेत त्याने आणखी महाविकास आघाडीचे नेते तुरुंगात जातील जातील

Kolhapur : कोल्हापूरच्या किनी टोल नाक्यावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त 

Kolhapur : कोल्हापूरच्या किनी टोल नाक्यावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त 


काँग्रेसच्या वतीने आज पुणे ते कोल्हापूर दरम्यान असणाऱ्या सर्व टोल नाक्यांवर आंदोलन


टोल न देता वाहने सोडण्याचे काँग्रेसने घेतले आंदोलन हाती


सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली किनी टोल नाक्यावर थोड्याच वेळात आंदोलन


साताऱ्यात पृथ्वीराज चव्हाण तर कराड जवळ विश्वजीत कदम टोल नाक्यांवर करणारा आंदोलन

Nashik : कसारा घाटात रेल्वे मार्गावर कोसळली दरड, या मार्गिकेवरील वाहतूक बंद 

Nashik : कसारा घाटात रेल्वे मार्गावर कोसळली दरड 


मुंबईकडे येणाऱ्या तिसऱ्या रेल्वे मार्किकेवर दरड कोसळल्याने या मार्गीकेवरील वाहतूक बंद 


मात्र नाशिकहून मुंबईकडे येणाऱ्या सर्व गाड्या या मधल्या मार्गीकेवर वळवण्यात आल्या असल्याने वाहतुकीस अडथळा नाही 


सकाळी साडेआठ वाजल्याच्या सुमारास कोसळली दरड, बोगद्याच्या जवळ कोसळलेली दरड हटवण्याचे काम सुरू

Mumbai Pune : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भाटन बोगद्यात अपघात, रस्त्यावर ट्रॅफिक जाम 

Mumbai Pune : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भाटन बोगद्यात अपघात 


पुण्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर ट्रॅफिक जाम 


विकेंडमुळे लोणावळ्याला जाणाऱ्या पर्यटकांच्या गाड्यांचीही गर्दी 


एसटी आणि कंटेनर अपघात

Pune Accident : अल्पवयीन मुलाचेच नव्हे, तर दोन मित्रांचेही रक्त नमुने बदलले, पुणे पोलिसांचे 900 पानांचे दोषारोपपत्र सत्र न्यायालयात दाखल

Pune Accident : अल्पवयीन मुलाचेच नव्हे, तर त्याच्या दोन मित्रांचेही रक्त नमुने बदलले..


- अल्कहोलिक कापसाऐवजी वापरला दुसरा कापूस


- सीएमओच्या रेस्टरुमध्ये झाली रक्ताची अदलाबदली


पुणे कल्याणीनगर पोर्शे अपघात प्रकरणात वैद्यकीय चाचणीच्या दरम्यान ससून रुग्णालयात अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने बदलण्यात आले होते.


मात्र त्यावेळी त्याच्या इतर दोन मित्रांचे देखील रक्ताचे नमुने बदलल्याचे आता पुढे आले आहे.


एवढेच नाही तर त्यासाठी अल्कहोल नसलेल्या कापसाचा वापर करण्यात आला असून,


थेट सीएमओ (मुख्य वैद्यकीय अधिकारी) अधिकार्‍याच्या रेस्ट रुममध्ये हे रक्त नमुने बदलण्यात आले आहेत.


दोषारोपपत्रात हे नमूद करण्यात आले आहे. नुकतेच पुणे पोलिसांनी याबाबत 900 पानांचे दोषारोपपत्र सत्र न्यायालयात दाखल केले आहे.

Vasai : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर हायड्रोजन गॅस सिलेंडर वाहून नेणाऱ्या ट्रकचा भीषण अपघात

Vasai : मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर हायड्रोजन गॅस सिलेंडर वाहून नेणाऱ्या ट्रकचा भीषण अपघात


घटना शनिवारी रात्री दोन वाजताची आहे. 



अपघातानंतर ट्रकला भीषण आग लागली आहे.  


ट्रक मधील सिलेंडर महामार्गावर पसरले असून, हायड्रोजन भरलेल्या सिलेंडरने पेट घेतलेला आहे.


त्यामुळे दोन्ही लेनची वाहतूक ठप्प झाली आहे. वाहतूक कोंडीमुळे दोन्ही लेनवर प्रचंड वाहतुक कोंडी झाली आहे. 
वाहतुक कोंडी थेट फाउन्टन घेडबंदरच्या हॅाटेल पर्यंत पोहचली आहे. तर येथे पालघर पर्यंत वाहतुक कोंडी झाली आहे. 

Political : राज्यातील सर्व आयटीआयमध्ये तयार होणार भारतीय 'संविधानाचे मंदिर'

Political : लोकसभेतील संविधान बदलाचा नरेटीव्ह खोडण्याचा भाजपचा प्रयत्न


राज्यातील सर्व आयटीआयमध्ये तयार होणार भारतीय 'संविधानाचे मंदिर'


कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केली होती घोषणा


'संविधान मंदिरा'ची प्रतिकृती तयार


आयटीआय मध्ये संविधानाच्या विचारांची शिकवण देणार


राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती दिनी केली होती घोषणा


गावागावात संविधानाचे विचार व महत्व पोहचवण्यासाठी उपक्रम

Karad : पुणे - बेंगलोर महामार्गावर सर्व टोलनाक्यावर नाक्यांवर काँग्रेसच्या वतीने आंदोलन

Karad : पश्चिम महाराष्ट्रातील पुणे - बेंगलोर महामार्गावर मोठ्याप्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य


सुविधाचा अभाव दिसत असतानाही प्रवाशांनी टोल का द्यायचा? असा प्रश्न सध्या विचारला जात आहे.


त्यात आज या महामार्गावरील सर्व टोलनाक्यावर नाक्यांवर काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे.


"रस्ताच नाही जागेवर, तर टोल का द्यायचा " ही टॕगलाईन घेऊन महामार्गावरचा सातबारा काँग्रेस मांडणार आहे.   रस्त्यांची दुरावस्था असताना टोल वसुल केला जात आहे.  हे आंदोलन‌ काँग्रेसचे जेष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या  नेतृत्वाखाली  केले जात आहे. 

VidhanSabha Elections - विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वूमीवर भाजप ॲक्शन मोडवर, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन नाशिक दौऱ्यावर

VidhanSabha Elections - विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वूमीवर भाजप ॲक्शन मोडवर

- ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन नाशिक दौऱ्यावर

- आज घेणार विधानसभा मतदार संघाचा आढावा

- भाजपची जिल्हास्तरीय आढावा बैठक पार पडणार

- *जिल्ह्यातील सर्व 15 मतदार संघांचा घेणार आढावा

- लोकसभेच्या पराभवाची देखील होणार कारणमीमांसा

Vidhansabha Election : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची मोर्चेबांधणी सुरू

Vidhansabha Election : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची मोर्चेबांधणी सुरू


आजपासून राज्यभर भाजपच्या जिल्हास्तरीय अधिवेशनाला सुरूवात


भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत आज वर्धा, भंडाऱ्यात अधिवेशन


विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रशेखर बावनकुळेंच्या नेतृत्त्वात मोर्चेबांधणी

Nashik - नाशिक शहर परिसरात सकाळ पासून पावसाची संततधार, धरणांच्या पाणीसाठयात वाढ

Nashik - नाशिक शहर परिसरात सकाळ पासून पावसाची संततधार
- इगतपुरी आणि  त्र्यंबकेश्वरमध्ये होत असलेल्या पावसाने धरणांच्या पाणीसाठयात वाढ
- नाशिकच्या गंगापूर  धरणाचा पाणीसाठा 70 टक्यावर

Mumbai Local Mega Block : रविवारी तिन्ही रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक; काही लोकल रद्द, काही ट्रेन विलंबाने धावतील

Mumbai Local Mega Block : रविवारी तिन्ही रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक; काही लोकल रद्द, काही ट्रेन विलंबाने धावतील


मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाच्यावतीने  रविवारी 4 ऑगस्ट रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी उपनगरीय रेल्वे मार्गांवर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. 


रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.


मेगाब्लॉकमुळे काही लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. या कालावधीत लोकल ट्रेन विलंबाने धावतील.


माटुंगा ते मुलुंड अप - डाऊन धीम्या मार्गावर


वडाळा रोड-मानखुर्द अप आणि डाऊन मार्गावर


वसई रोड ते भाईंदर अप- डाऊन धीम्या मार्गावर


तिन्ही रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक असेल

Pune : मुसळधार पावसामुळे ताम्हिणी घाट खचला, 5 ऑगस्टपर्यंत रस्ता बंद

Pune : मुसळधार पावसामुळे ताम्हिणी घाट खचला, 5 ऑगस्टपर्यंत रस्ता बंद


मुसळधार पावसाने रायगड-पुणे जिल्ह्याला जोडणारा  ताम्हिणी घाट खचला


ताम्हिणी घाट खचल्याने दुरुस्तीसाठी  5 ऑगस्ट सकाळी आठ वाजेपर्यंत येथील वाहतूक बंद करण्यात आली आहे. 


पुणे जिल्हाधिकारी यांनी याबाबत सूचना जाहीर केली आहे. 

Mumbai Local : कसाराहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणाऱ्या लोकल 5 ते 10 मिनिटे उशीरा, कल्याण स्थानकावर गर्दी

Mumbai Local : लांब पल्ल्याच्या गाड्यामुळे कसारा कडून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणाऱ्या लोकल 5 ते 10 मिनिटे उशिरा 


कामावर जाणाऱ्या चाकरमान्याची कल्याण स्थानकावर गर्दी

Nashik : नाशिक शहर खुनाच्या घटनेने हादरले, सिन्नर फाटा परिसरात एकाचा खून

Nashik - नाशिकच्या सिन्नर फाटा परिसरात एकावर प्राणघातक हल्ला प्रकरण ...


हल्ल्यात गंभीर जखमी असलेल्या प्रमोद वाघचा मृत्यू...


हल्ल्याचा सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल ...


काल सायंकाळी सिन्नर फाटा येथे प्रमोद वर तिघांनी केला होता हल्ला ...


नाशिक शहर खुनाच्या घटनेने हादरले...


जुन्या वादातून प्रमोदचा खून झाल्याची माहिती...


नाशिक रोड भागात गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू..

Chiplun : लोटे MIDC  मेहता कंपनीतील वायू गळती अपडेट, सातत्याने होणाऱ्या घटनांची रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली गंभीर दखल.

Chiplun : लोटे MIDC  मेहता कंपनीतील वायू गळती अपडेट.


सातत्याने होणाऱ्या घटनांची रत्नागिरी जिल्हाधिकारी यांनी घेतली गंभीर दखल.


अपघातांची माहिती घेऊन संबधित कंपन्यांवर कारवाई करण्याची शक्यता.


परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर उशिराने महाराष्ट्र पर्यावरण प्रदूषण नियंत्रण महामंडळ चे अधिकारी घटनास्थळी दाखल.


हवेतील प्रदूषणाचे प्रशासनाकडून मोजमाप.


MIDC मधील वाढत्या अपघातांच्या मालिकेनंतर स्थानिक नागरिक देखील आक्रमक.

Chandrapur : चंद्रपुरात शिवसेना उबाठा युवासेना जिल्हाप्रमुखाच्या घरून सापडला काडतुसांचा साठा...

Chandrapur : शिवसेना उबाठा युवासेना जिल्हाप्रमुखाच्या घरून सापडला काडतुसांचा साठा...


युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे याच्या घरी पोलीस पथकाची कारवाई,


एकूण 40 काडतुसे सापडल्यामुळे चक्रावले पोलिस,


शहरातील इंदिरानगर भागातील घरात 4 तास राबविले गेले शोध अभियान,


चंद्रपूर जिल्ह्यातील गेले काही दिवस गोळीबारांच्या घटनात वाढ झाली आहे ,


या पार्श्वभूमीवर पोलिसांनी अग्निशस्त्र व हत्यार विरोधी विशेष अभियान सुरू केले आहे


 

Pune Rain : खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात होणार विसर्ग वाढवला, 21 हजार 142 क्यूसेक करण्यात आला

Pune Rain : खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात होणार विसर्ग वाढवला


खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून  मुठा नदीपात्रात होणार विसर्ग वाढवून पहाटे ५.०० वाजता २१ हजार १४२ क्यूसेक करण्यात येत आहे.


पावसाच्या प्रमाणानुसार विसर्ग कमी/जास्त करण्याची शक्यता आहे. - उपविभागीय अभियंता, मुठा कालवा पाटबंधारे उपविभाग पुणे.

Bigg Boss OTT finale Winner : सना मकबूल ठरली बिग बॉस ओटीटीच्या तिसऱ्या पर्वाची विजेती

Bigg Boss OTT finale Winner : सना मकबूल ठरली बिग बॉस ओटीटीच्या तिसऱ्या पर्वाची विजेती



Bigg Boss OTT finale Winner : बिग बॉस ओटीटीच्या तिसऱ्या पर्वाचा विजेता मिळाला आहे. 


 या पर्वाची विजेता सना मकबूल 25 लाख रुपयांचे बक्षीस मिळाले आहे.


गेल्या सहा आठवड्यांपासून चालू असलेले Bigg Boss OTT चे तिसरे पार्व फारच उत्कंठावर्धक राहिले. 


या तिसऱ्या पर्वात कोण विजयी ठरणार याची सर्वांनाच उत्सुकता लागली होती. 


 

पार्श्वभूमी

Maharashtra Breaking 3rd August LIVE Updates: राज्यासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे वेगवान अपडेटस् आणि बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा...

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.